१३ ही संख्या अशुभ का मानतात..? ती खरोखरच अशुभ आहे का?
लेखनप्रकार
१३ ही संख्या अशुभ का मानतात..? ती खरोखरच अशुभ आहे का?
पुढारलेला असो वा मागास, जगातील प्रत्येक समाजात काही न काही अंधश्रद्धा असतातच! अंधश्रद्धा काही प्रमाणात 'जगणं' सुसह्य करतात असंही म्हणता येईल. युरोप-अमेरीकेतील वैज्ञानीक दृष्ट्या पुढारलेला देश असो वा भारतासारखा आध्यात्मीक भगव्या प्रकृतीचा देश असो, अंधश्रद्धा ह्या असायच्याच..!
याच अंधश्रद्धांपैकी एक म्हणजे '१३' या आकड्याला अशुभ मानणं..या आकड्याला अशुभ का मानतात याची उत्तरं त्या त्या संस्कृती देतातच पण आपल्या भारतातही त्याला समर्पक उत्तर सापडतं..! फरक केवळ इतकांच की '१३' या संख्येने भारतात लघुरूप धारण करून '४' हे रूप घेतलंय..आणि या '४' चे जे प्रताप रोजच्या आयुष्यात अनुभवायला ते खरोखर मनोरंजक आहेत..
पाश्चात्य देशात १३ या संख्येला अतिशय घाबरतात. हि संख्या सैतानाशी निगडीत आहे असे त्या अति पुढारलेल्या देशांचे म्हणणे आहे. लंडन मध्ये थेटरात ‘M’ हे अक्षर तेरावे म्हणून तो ‘रो’ नसतो तर अमेरिकेत १३ व मजलाच नसतो..या पूर्णपणे वैज्ञानिक विचार करणाऱ्या देशात घडते.
भारतात १३ हा जरी अशुभ मनाला गेलेला नाहीय तरी भारतीय ज्योतिष शास्त्रात १३ ची बेरीज ४ ही ‘लग्नाच्या’ बाबतीत अशुभ मानतात. ज्योतिषश्रद्धेनुसार ४ हा आकडा ‘हर्शल’ या ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो. ‘हर्शल’ ग्रहाचा शोध हा तुलनेने अगदी अलीकडे लागलेला असल्यामुळे त्याची प्रकृती आणि प्रवृत्ती वैज्ञानिक आहे असे मानले गेलेय. या संख्येच्या प्रभावाचा अनुभव आपल्यालाही घेता येईल.
ज्या व्यक्तींच्या जन्म तारखेची बेरीज (dd-mm-yyyy) ४ येते किंवा ज्यांच्या जन्म तारखेत ४ ही संख्या एकापेक्षा अधिक वेळा आहे त्यांच्या बाबतीत हा प्रभाव जाणवतो. ‘४’ चा स्वामी ‘हर्शल’ हा विज्ञान वादी असल्याने तर्कशुद्ध विचार करणारा आहे. स्वामी विवेकानंद हे उदाहरण म्हणून घेण्यास हरकत नाही (१२.०१.१८६३ = ४). कोणीतरी सांगतो, किंवा पोथीत असे लिहिलेय वा अशी प्रथा-परंपरा आहे म्हणून तो कोणतीही गोष्ट करणार नाही. धर्म, प्रथा, परंपरा याचा नीट विचार करून जर त्याच्या बुद्धीला ते पटले तरच ‘हर्शल’ करणार अन्यथा जमाना कितीही बोंब मरूदे तो ऐकणार नाही..एकाच गोष्टीची नव्याने मांडणी करण्यात हे लोक आघाडीवर असतात..लक्षात घ्या, तुम्ही-आम्ही मळलेल्या वाटेवरून चालणारी नव्हे तर अशीच माणसे इतिहास घडवतात..!!
हर्शल प्रचंड बुद्धिमान आहे. कधी कधी ही बुद्धिमत्ता आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या दृष्टीने विक्षिप्तपणाकडे झुकलेली वाटते. हे जे विचार करतात ते आपल्या कल्पनेतही येऊ शकणार नाहीत. म्हणून यांना समाजात ‘लहरी’ whimsical ठरवले जाते. हे काळाच्या खूप पुढे असतात. बुद्धीच्या कसोटीवर न टिकणारी कोणतीही गोष्ट हे करणार नाहीत.
या संख्यची प्रचीती आपल्याकडे मुख्यतः विवाहाच्या बाबतीत अनुभवायला येते. विवाह हा आपल्या संस्कृतीत एक संस्कार आहे, एका प्रथा-परंपरेचा भाग आहे. ज्यांच्या जन्मतारखेत ‘४’ चा प्रभाव असतो यांची वैवाहिक आयुष्ये खरोखर अभ्यासण्यासारखी असतात. काय काय घडू शकते यांच्या बाबतीत?
तर, यांचा मळलेल्या वाटेवर चालण्यास विरोध असतो. समाजातील प्रस्थापित प्रथा-परंपरा पाळण्याला यांचा विरोध असतो. एक - यांचा प्रेमविवाह झालेला असू शकतो. आता हे मी माझ्या वयाच्या किंवा ज्यांचा जन्म ६० ते ७० च्या दशकात झालेला आहे अशा व्यक्तींबद्दल बोलतोय. त्या वेळेस प्रेमविवाह हि क्वचित घडणारी किंवा एकदम अपवादात्मक व समाजाला मान्य नसणारी घटना होती. खूप पडसाद उठायचे अशा घटनांचे तेंव्हा. आताच्या काळात हा निकष लावायचा झाला तर ज्यांचे ‘अर्रेंज मॅरेज’ होईल त्यांना हा निकष लावावा लागेल. आता प्रेम विवाह, आंतर जातीय – धर्मीय वा आंतर प्रांतीय विवाह हे आम झालेले असून अर्रेंज लग्न ही दुर्मिळ घटना झालेली आहे. थोडक्यात समाजात जे रूढ असेल त्या विरुद्ध वागायचे असा यांचा खाक्या असतो.
दुसरा अनुभव यांच्या बाबतीत येऊ शकतो तो म्हणजे हे लोक लग्नच करत नाहीत. लग्न हि एक प्रथा असल्यामुळे त्यांना ती आंधळेपणाने करणे मान्य नाही. जो पर्यंत त्यांच्या विचाराची दुसरी व्यक्ती सापडत नाही, तो पर्यंत ते लग्नाला हो म्हणत नाहीत आणि समजा तशी व्यक्ती भेटलीच तरी ती त्याच्यासारखीच असल्याने त्यांचे जमणे कठीण..! म्हणतात ना ‘बुद्धिमान किंवा विद्वानामध्येच मतभेद जास्त असतात’ तसा हा प्रकार..!
तीन म्हणजे, हे लग्न न करता एकत्र राहत असतात. सध्या ज्याला Live in Relationship म्हणतात ना तस्स ! अनेकांबरोबर संबंध असणे, घटस्फोट होणं , एकापेक्षा अधिक वेळा लग्न होणं , नवरा बायको पेक्षा वयाने / उंचीने लहान असणे किंवा उलट असणे (उदा. सचिन तेंडूलकर २४.०४.१९७३, पहा ४ ची एका पेक्षा अधिक वेळ उपस्थिती ) असे अनेक प्रकार यांच्या बाबतीत घडू शकतात.
ज्यांच्या जीवनावर ‘४’चा प्रभाव असतो त्यांचे आयुष्य विस्मयकारी घटनांनी भरलेलं असू शकते. आयुष्यात खूप तीव्र चढ-उतार, यु-टर्नस आलेले असू शकतात. एका अर्थाने यांचे आयुष्य ‘अपघाती’ असू शकते. अपघाती म्हणजे कोणतीही चांगली किंवा वाईट घटना कोणताही हास-भास नसताना घडणे. यावर कडी म्हणजे या सर्वाना पुरून ते आपले पाय ठाम पणे रोवून उभेच असतात. कोणी बरोबर असो वा नसो, हे आपल्या तत्वांना तिलांजली देत नाहीत. अर्थात ‘४ ’ या आकड्याबरोबर जन्मतारखेत दुसरे कोणते आकडे आहेत, त्यांचे आपापसात मित्रत्व आहे की शत्रुत्व याचा सारासार विचार करून वरील अनुमाने काढावी लागतात. हे सूत्र घर, वाहन, बँक खाते क्रमांक या सर्वाना सर्वसाधारणपणे लागू होवू शकते.
भयंकर विध्वंस, मोठ्या प्रमाणावर प्राणहानी, सामुदायीक मृत्यू हे या ‘४’ किंवा ‘हर्शल’च्या प्रभावाखाली येतात. म्हणून पाश्चात्य देशात ‘१३’ हा आकडा अशुभ मानतात. १४.०४.१९४४ साली मुंबईतील व्हिक्टोरिया गोदीत झालेला स्फोट आजही भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा स्फोट समजला जातो. या स्फोटात जवळपास २००० माणसे दगावली गेली व जखमी किती झाली याचा नक्की आकडा उपलब्ध नाही.
अर्थात वर केलेलं वर्णन सर्वच ‘४’ वाल्यांना १०० % लागू असेल असे नाही, मात्र स्थूल मानाने असे अनुभव येतात. आपणही आपल्या परिचितांची जन्म तारीख पाहून यावरून खात्री करून घेऊ शकता. साधारणतः १० मधील ७ व्यक्तींना वरील अनुभव येईल याची खात्री आहे. आपली किंवा आपल्या पत्नीची वा अन्य कोणाचीही जन्मतारीख केवट ४,१३ किंवा ३१ आहे याचा अर्थ हे आपल्याला लागू आहे असा कृपया समाज करून घेऊ नये.
-गणेश साळुंखे
९३२१८ ११०९१
वाचन
16475
प्रतिक्रिया
80
१३ ही संख्या अशुभ का मानतात..? ती खरोखरच अशुभ आहे का?
‘४’ चा स्वामी ‘हर्शल’ हा
कमालीचे रोचक विवेचन आहे.
..या धाग्यावर वाचकांनी १२
In reply to ..या धाग्यावर वाचकांनी १२ by गवि
पण गवि चौथा प्रतिसाद तुम्ही
In reply to पण गवि चौथा प्रतिसाद तुम्ही by पॉइंट ब्लँक
..हाय रे खुदा..अब तेरा ही
In reply to ..हाय रे खुदा..अब तेरा ही by गवि
प्रॉब्लेम १३ ला आहे ४ला नाही.
In reply to ..या धाग्यावर वाचकांनी १२ by गवि
तुम्ही भारतीय आणि हिंदु ना?
In reply to तुम्ही भारतीय आणि हिंदु ना? by मृत्युन्जय
.होय की..!!
In reply to .होय की..!! by गवि
दान
४, २२,३१
अरारा!
In reply to अरारा! by पैसा
त्यांच कस हाय- ज्योतिष
In reply to त्यांच कस हाय- ज्योतिष by पॉइंट ब्लँक
थोडी बदलेल?
In reply to थोडी बदलेल? by पैसा
समजा एक गोष्ट घडेल की नाही
In reply to त्यांच कस हाय- ज्योतिष by पॉइंट ब्लँक
ज्योतिष कोरीलेशन स्टडी आहे.
In reply to ज्योतिष कोरीलेशन स्टडी आहे. by सतिश गावडे
दोन गोष्टी, एक तर ज्योतिष
In reply to दोन गोष्टी, एक तर ज्योतिष by पॉइंट ब्लँक
:)
तेरावं
In reply to तेरावं by सुनील
..आकडेशांतीसाठी आता तुम्हाला
In reply to ..आकडेशांतीसाठी आता तुम्हाला by गवि
Psuneiel
In reply to Psuneiel by सुनील
आता u पण एक अक्षर अलीकडे
अमेरिकेत १३ व मजलाच नसतो..}^^
तु 13 देख...
In reply to तु 13 देख... by जेपी
तेरा तेरा तेरा तेरा तेरा सुरूर
मानतात का??? >> हाच प्रश्न
In reply to मानतात का??? >> हाच प्रश्न by अत्रुप्त आत्मा
..असे सांगणारे हे जगातले
In reply to ..असे सांगणारे हे जगातले by गवि
आमचे हे गुरूजी पुढारलेले आहेत
जेव्हा आकडे नव्हते तेव्हा
In reply to जेव्हा आकडे नव्हते तेव्हा by टवाळ कार्टा
सही....
आज 27 तारीख आणी एप्रिल हा 4
येशूचे अंतिम भोजन
In reply to येशूचे अंतिम भोजन by क्लिंटन
+१
आणि १३ तारीख
मी स्वतः ४ आहे, बायको ४ आहे,
In reply to मी स्वतः ४ आहे, बायको ४ आहे, by संदीप डांगे
चढ-उतार..
In reply to चढ-उतार.. by योगी९००
काय तो अभ्यास =))
In reply to काय तो अभ्यास =)) by टवाळ कार्टा
=)) #हीणयाण
In reply to काय तो अभ्यास =)) by टवाळ कार्टा
हाहा
In reply to हाहा by योगी९००
टवाळ आहेस खरा
In reply to चढ-उतार.. by योगी९००
चढ उतार...धक्के?
सक्सेसयश प्राप्त झाले. तरी काही अनाकलनीय कारणाने हिंदीसारख्या टीनपाट इंडस्ट्रीत यायला लागले. ती स्वभावानुसार वागत आहे. आता 'उतार'वयात गोंधळली आहे. हेच 'चार' अंकाचे गंडांतर. बाकी १ आणि ४ अंकाचे एक उत्तम उदाहरण दिल्याबद्दल धन्यवाद. १ आणि ८, १ आणि ४ असे भन्नाट कॉंबीनेशन असणारे फार कमी माहित आहेत. दोन टोकाचे ग्रह एकत्र कसे फळ देतात हे पाहणे कुतुहलाचे असते. मनोरंजनासाठी माहिती: १+२ = यश, प्रसिद्धी, धनलाभ, नेतृत्व २+३ = लोभी, हळवे, यश. ३+४ = यश यथातथा, शत्रु होण्याची शक्यता जास्त, ४+५ = धाडसी, कलाकार, यश यथातथा, अडचणींचे डोंगर, मनकवडे, बोलघेवडे, बोलण्यात पटाईत. ५+६ = सुंदर व्यक्तीत्व, वक्तृत्व चांगले, व्यवसायात प्रगती, कलेत प्रगती. २ + ८ = व्यवसायात उत्तुंग यश, प्रसिद्धी, मानमरातब, उच्च वर्तुळात वावर. चढ-उतारमय आयुष्य.In reply to चढ-उतार.. by योगी९००
योगा योगाच्या गोष्टी!
In reply to योगा योगाच्या गोष्टी! by योगविवेक
तिच्या शारीरिक चढ-उतारांमुळे
खरं आहे ते. १३ ही संख्या
In reply to खरं आहे ते. १३ ही संख्या by नितिन थत्ते
अहो
१३ तारखेला लग्नाचे हॉल
In reply to १३ तारखेला लग्नाचे हॉल by टवाळ कार्टा
एखाद्या धृतराष्ट्राची तेरावी
=)) तीन तेरा हा मुहुर्त आणि
धागा नक्की १३ वर आहे की ४ वर?
ICU बेड # १३
धागा क्र.
In reply to धागा क्र. by पैसा
मग उडवणार की फक्त झाडू मारणार
In reply to मग उडवणार की फक्त झाडू मारणार by टवाळ कार्टा
कैच नै!
In reply to कैच नै! by पैसा
म्हणजे दोनदा दुर्दैव आले तर
In reply to म्हणजे दोनदा दुर्दैव आले तर by टवाळ कार्टा
ते आमाले काय इच्यारते
आमच्या घराचा नं.१०३,
In reply to आमच्या घराचा नं.१०३, by मार्मिक गोडसे
चोरीला गेलेल्या गाड्यांचे
मी सरकारी नौकरी साठी लेखी
याचा डेटा
In reply to याचा डेटा by मार्मिक गोडसे
इथून मिळालेल्या डेटावरून असं
In reply to इथून मिळालेल्या डेटावरून असं by आदूबाळ
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by मार्मिक गोडसे
हल्ली लिंक देताना मिपा
In reply to हल्ली लिंक देताना मिपा by आदूबाळ
पुन्हा धन्यवाद.
In reply to हल्ली लिंक देताना मिपा by आदूबाळ
http:// नव्हते पहिल्या वेळी
- वाहन चौर्य शोध
- वाहन चौर्य शोध
- वाहन चौर्य शोध
वरीलपैकी पहिला दुवा तुमच्या पहिल्या दुव्यासारखा दिलाय. दुसरा देताना सुरुवातीला http:// जोडलंय. तिसरा देताना सुरुवातीला http:// जोडलंय अन नंतरचं www. काढून टाकलंय. क्रोम ब्राउझरच्या अॅड्रेस बारमधला युआरएल कॉपी करून पेस्ट केल्यावर सुरुवातीचं http:// आपोआप जोडलं जातं. पूर्वपरिक्षणाच्या वेळी दुव्यांवर क्लिक करून नीट उघडताहेत का याची खात्री करून घ्यावी.तुमच्या बुद्धीला खाद्य...
In reply to तुमच्या बुद्धीला खाद्य... by सूड
त्यात काय विशेष? माझ्या पण
In reply to त्यात काय विशेष? माझ्या पण by काळा पहाड
आता ते धागाकर्त्यांना सांगू
In reply to आता ते धागाकर्त्यांना सांगू by सूड
+१ :)
१३
!! श्रीराम जयराम जयजयराम !!
In reply to १३ by प्रसाद गोडबोले
रामालाभालामारामालाभालामारा
रामालाभालामारामालाभालामारा
In reply to रामालाभालामारामालाभालामारा by काळा पहाड
----
रोचक विषय...१२ अंक आणि भारतात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots eruptही एक लिन्क बघा
आपला या १३ संख्येवर अथवा
In reply to आपला या १३ संख्येवर अथवा by कंजूस
मी जेव्हा घर घेत होतो तेव्हा
क्रिस्त /यिझस- चा तेरावा
MH 13 वाले कुणी नाही का इथे?
६६६ बद्दल कै मत आहे? :)
१३ आकड्याचा अनुभव नाय.. पण
In reply to १३ आकड्याचा अनुभव नाय.. पण by मोहनराव
साडेसाती