पांढर्या जामचे सरबत
उन्हाळ्यात अनेक प्रकारची फळे येतात. पांढरे जाम ज्यांना आमच्याकडे विलायती जाम म्हणतात ते या दिवसात मोठ्या प्रमाणात होतात. नुसते खायला छान लागतातच, पण काढल्यावर फार दिवस टिकत नाहीत. घरीच झाड असल्याने त्यांचा दुसरा काहीतरी उपयोग म्हणून सरबत करून पाहिले. सरबत चवीला पन्ह्यासारखे लागते, आणि फ्रिजमध्ये दोन दिवस टिकतेही! हा जामचा फोटो!
साहित्यः पांढरे जाम २०, साखर चार पाच चमचे, मीठ, वेलची पावडर, थंड पाणी.
कृती: जाम स्व्च्छ करून घ्यावेत.जामचे दोन भाग करून त्यातील बिया काढून घ्याव्यात. ज्युसर जारमध्ये जामच्या फोडी , मीठ, साखर घालावे. मीठ साखरेचे प्रमाण चवीनुसार कमी जास्त करावे. या जामना किंचीत आंबट चव असते.साधारण वीस जामसाठी एक ग्लास पाणी घालावे. आणि हे सर्व मिक्सरला फिरवावे. गाळून घ्यावे. वेलची पावडर घालून थंडगार सर्व्ह करावे.
तयार सरबत!

वाचने
8723
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
मस्तच!
मस्त
हे तर पेढ्यांसारखे दिसत आहेत! मस्त गार वाटलं सरबत पाहुन !!
हरेश्वर आठवलं!
जाम अजाबात आवडत नाहीत पण पन्हे खुप आवडते.
त्यामुळे नक्कीच जामचे सरबत करुन पिण्यात येईल
जाम खूपच आवडतात! भारी लागत असेल हे सरबत!
जाम कुठुन मिळवु आता,झाडंच लावते!
फोटो भारी आहेत.जाम पाच प्रकारचे खाल्ले आहेत श्रीवर्धनला.विलायती? बरं बरं.
सरबत आवडले. मौसमी फळांचा योग्य उपयोग केलाय.
In reply to सरबत आवडले. मौसमी फळांचा by रेवती
मौसमी फळाचा छान उपयोग. मुंबईला गेले असताना लोकलमध्ये काही बायका ही फळे विकताना दिसल्या होत्या.
मस्त.
काय छान दिसतंय सरबत. जाम आवडतात पण सरबत कधीच ट्राय नाही केले ,आता कसे प्यायचे हे मस्तं मस्तं सरबत सांग तूच.
In reply to काय छान दिसतंय सरबत. जाम by सानिकास्वप्निल
तेवढाच मिनी कट्टा पण होईल!
सो हे सरबत कितपत आवडेल याबबत जरा साशंक आहे....पण आयडिया भारी आहे.
जाम अगदी रसाळ असतात. सरबत मस्त होणार! (दीपकने कुठचे जाम खाल्ले देवजाणे!)
हेच म्हणणार होते. आता सरबत प्यायला रत्नागिरीस या, जामही मिळतील आणि सरबतही!
मुम्बैत मिळतात
जाम आवडत फळ..मस्तच लागत असणार..
सररबत अतिशय सुन्दर दिसते आहे.पाहुनच थंडावा जाणवतोय.
प्रचंड आवडणार्या फळांपैकी एक, सरबत करुन बघणेत येईल.
जाम खाताना याचे सरबत सुद्धा होउ शकेल असा विचार कधीच केला नव्हता ! वेगळा प्रयोग आवडला. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots eruptमस्त दिसतय सरबत.अजुन हे फळ कधी खाल्ले नाहिये.
मस्तच!