मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पांढर्‍या जामचे सरबत

अनन्न्या · · पाककृती
उन्हाळ्यात अनेक प्रकारची फळे येतात. पांढरे जाम ज्यांना आमच्याकडे विलायती जाम म्हणतात ते या दिवसात मोठ्या प्रमाणात होतात. नुसते खायला छान लागतातच, पण काढल्यावर फार दिवस टिकत नाहीत. घरीच झाड असल्याने त्यांचा दुसरा काहीतरी उपयोग म्हणून सरबत करून पाहिले. सरबत चवीला पन्ह्यासारखे लागते, आणि फ्रिजमध्ये दोन दिवस टिकतेही! हा जामचा फोटो! jam साहित्यः पांढरे जाम २०, साखर चार पाच चमचे, मीठ, वेलची पावडर, थंड पाणी. कृती: जाम स्व्च्छ करून घ्यावेत.जामचे दोन भाग करून त्यातील बिया काढून घ्याव्यात. ज्युसर जारमध्ये जामच्या फोडी , मीठ, साखर घालावे. मीठ साखरेचे प्रमाण चवीनुसार कमी जास्त करावे. या जामना किंचीत आंबट चव असते.साधारण वीस जामसाठी एक ग्लास पाणी घालावे. आणि हे सर्व मिक्सरला फिरवावे. गाळून घ्यावे. वेलची पावडर घालून थंडगार सर्व्ह करावे. तयार सरबत! jam

वाचने 8723 वाचनखूण प्रतिक्रिया 22

पैसा 23/04/2015 - 14:46
जाम अगदी रसाळ असतात. सरबत मस्त होणार! (दीपकने कुठचे जाम खाल्ले देवजाणे!)

hitesh 23/04/2015 - 21:31
मुम्बैत मिळतात