महमूद दरवेश या पालेस्तिनी लेखकाच्या
'If Only the Young Were Trees!' या ललितलेखाचा मुक्त अनुवाद.
झाड झाडांचे सहोदर. झाड झाडांचे शेजारी.
मोठी झाडं छोट्या झाडांची काळजी घेतात.
न बोलता, हळूवार त्यांच्यावर सावली धरतात.
एखाद्या छोट्या झाडाला रात्री भीती वाटू नये , म्हणून आपल्या खांद्यावरचा इवला पक्षी त्याच्या खांद्यावर अलगद ठेवतात.
एक झाड दुसऱ्या झाडाच्या फळावर हल्लाबोल करीत नाही.
वांझोट्या झाडाला घेरून, त्याची कुचेष्टा करीत नाहीत.
एक झाड दुसऱ्या झाडावर घाव घालत नाही.
झाडं चुकूनही लाकुडतोड्याचे अनुकरण करीत नाहीत.
झाडाची नाव होते, अन झाड आपसूक पोहायला शिकते.
झाडाचा दरवाजा होतो, अन झाड सगळी गुपितं मुळापर्यंत शोषून घेते.
झाडाची खुर्ची होते, तेव्हा एकेकाळच्या आपल्या माथ्यावरील असीम आकाशाला ते क्षणभरही विसरत नाही.
झाडाचा टेबल होतो, तेव्हा लिहिणार्याला जीव तोडून सांगते, माझ्याबरोबर कधीही लाकुडतोड्या सारखा वागू नकोस.
झाडं म्हणजे क्षमा. झाडं म्हणजे जागृति.
झाडं बेगुमानपणे झोपत नाहीत. झाडं दिवास्वप्नात रमत नाहीत.
माणसांच्या द्रष्टेपणाची ठेव म्हणजे झाडं.
झाडं म्हणजे साक्षात तपश्चर्या. झाडं म्हणजे ऊर्ध्वगामी प्रार्थना.
वादळवाऱ्यात लवतातही झाडं समृद्धपणे!
एरवी उभी असतात झाडं, निष्कलंक योग्याप्रमाणे.
'अष्टपुत्रासौभाग्यवती' ऐवजी 'अष्टवृक्षासौभाग्यवती' असा आशीर्वाद देण्याचे किंचित औदार्य आपल्या पूर्वजांनी दाखवले असते तर........ !
वाचने
6760
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर! हे मूळ भाषेत वाचायला
हे छान झालं यशोधरा. मूळचे
सुरेख!
पैसा, अगदी सुरुवातीलाच केला
ओह सॉरी!
In reply to पैसा, अगदी सुरुवातीलाच केला by शिव कन्या
प्रचंड सुंदर परत परत वाचलं !
+१
In reply to प्रचंड सुंदर परत परत वाचलं ! by आनन्दिता
मस्तच
आवडलं.
सुंदर!
सहमत
In reply to सुंदर! by रुपी
ओह! अरेरे..
In reply to सहमत by श्रीरंग_जोशी
आम्ही वाढदिवसाला झाड लावतो.
सौंदर्य ..
सौंदर्य ..
रुपी.. दुवा आवडला.धन्यवाद .
श्रीरंग जोशी ... सहमत . वाचत
अतिशय तरल!!!!
सुंदर! विचार आणि अनुवाद
किती सुंदर !!!!
स्वैरानुवाद वाचला. आवडला. मग
अतिशय आवडला अनुवाद.मनाला
वरील सर्वांशी+१
शन्का.....
In reply to वरील सर्वांशी+१ by नाखु
काही अतिरोचक शक्यता मनात
In reply to शन्का..... by पुणेकर भामटा
माफि असावि...
In reply to काही अतिरोचक शक्यता मनात by बॅटमॅन
इथे झाड हे रुपक आहे कै?
In reply to काही अतिरोचक शक्यता मनात by बॅटमॅन
टवाळ कार्टा ..... नाही रूपक
ते मी http://www.misalpav.com
In reply to टवाळ कार्टा ..... नाही रूपक by शिव कन्या