Skip to main content

डोळे आमचे आहेत म्हणुनी

लेखक विदेश यांनी बुधवार, 25/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नकोस टाकू कटाक्ष तिरपा मोहकसा ग पुन्हा पुन्हा - नकोस करू गर्व रुपाचा ठुमकत मिरवत पुन्हा पुन्हा - घमेंड तुजला रूपगर्विते दाखवी आरसा पुन्हा पुन्हा - नित्य आवडे आत्मस्तुती मनास कशी पुन्हा पुन्हा - डोळे अमुचे आहेत म्हणुनी रुपडे बघतो पुन्हा पुन्हा - आम्ही नसतो डोळेही नसते विचार कर ग पुन्हा पुन्हा .. !
लेखनविषय:

वाचने 2168
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

आम्ही नसतो डोळेही नसते विचार कर ग पुन्हा पुन्हा .. ! अहाहा, आवडली.

छान!

रुपी, विवेकपटाईत, पॉइंट ब्लँक, अत्रुप्त, मदनबाण - प्रतिसादासाठी आपणा सर्वांचे आभार !

मै खिलाडी तू अनाडी या ऐतिहासिक गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी.... हम दोनो है अलग अलग हम दोनो है जुदा जुदा.... ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ! या नुसार कडव्यांना चाली लावून दोन कडव्यांच्या मधे ओ ओ ओ ओ... चा आलाप (सॉरी ओलाप) म्हणायचा काय सही वाटतेय कविता आता. उडत्या चालीची एकदम. पुन्हा पुन्हा... सिंक्स विथ जुदा जुदा.... खफा खफा