गुढीपाडवा आणि तरुणाई...
लेखनप्रकार
गुढीपाडवा आणि तरुणाई...
हवी-हवीशी वाटणारी थंडी मावळत आलेली असते आणि धगधगता उन्हाळा होळीचे रंग उधळून मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी चक्क निसर्गालाच खुणावत असतो. हिंदू कालगणनेनुसार चैत्र मास आपल्या सोबत नवे वर्ष घेऊन येतो. नवी स्वप्ने, नव्या आशा-आकांक्षा याबरोबरच नवं काहीतरी करण्याचा उत्साह, एखादी मोठी खरेदी किंवा गुंतवणूक करण्याचा हा शुभ दिवस म्हणजेच गुढीपाडवा. अशा या मंगलदिनी आपल्या संकल्पकार्याचा शुभारंभ करायला मिळणे ही प्रत्येकासाठीच आनंदाची आणि समाधानाची बाब असते. चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मनाला जातो. आपल्या स्वतंत्र अस्मितेचे हे लक्षण आहे. रामाने रावणाचा बिमोड करून अयोध्येत प्रवेश केला तो दिवस विजयाचे प्रतिक म्हणून आपण गुढी उभी करतो. आपण जसे १५ ऑगस्टला आपला स्वातंत्र्यदिवस उत्साहात साजरा करतो तसाच हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस गुढीरूपी झेंडा आकाशात दिमाखाने फडकवत प्रत्येक घर साजरा करत असते.
आपल्याकडे नवीन वर्षाची सुरुवात दोन वेळा केली जाते, एक इंग्रजी कालगणनेनुसार 'Happy New Year' ने आणि दुसरे हिंदू कालगणनेनुसार 'नूतन मराठी वर्षाच्या शुभेच्छा' ने म्हणजेच गुढीपाढव्याने. १ जानेवारी आळसात उजाडतो कारण त्याला ३१ डिसेंबरचा अंमल असतो. १ जानेवारीच्या स्वागतापेक्षा ३१ डिसेंबरच्या रात्रीचीच सगळ्यांना ओढ असते. पण आपला गुढीपाडवा चैतन्य घेऊन उजाडतो. अभ्यंगस्नानांनी सुरु होणारा हा पाडवा प्रत्येक घरातील लहान-थोरांना नटून थटून अलंकाराने सुशोभित होऊन गुढया उभारायचा दिवस असतो.
अशा या गुढीपाडवा आणि इतरही धार्मिक, सांस्कृतिक सणांपासून आपली तरुणाई दूर असते असं काही वेळा भासवलं जात. परदेशी संस्कृतीचे अनुकरण करते अशीच ओरड असते, परंतु ते खोटे आहे. महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच भारतामध्ये पाश्चात्य संस्कृतीची वाढत चाललेली जादू पाहता, तरुणांकडून हिंदू आणि मराठी सण मात्र तेवढयाच पारंपारिक पद्धतीने साजरे होताना दिसत आहेत. किंबहुना ते वाढतच आहेत. आत्ताच्या इंग्लिश जमान्यात वावरणारी, सतत सोशल नेटवर्कशी जोडलेली आणि खुली अर्थव्यवस्था, खुली बाजारपेठ यामुळे सतत परदेशी वाऱ्या करणारी किंवा सतत परदेशी घटनांशी निगडीत असलेली ही तरुणाई पश्चात पद्धतीने काही कार्यक्रम नक्कीच करत असतात मात्र आपले सणही आपल्या घरच्यांसोबत तेवढयाच आनंदाने, उत्साहाने आणि पुढाकाराने साजरे करताना दिसतात. त्यातील धार्मिकता काहीशी अंशी कमी झालेली असेलही परंतु आपले सण साजरे करण्याची त्यांची धावपळ मात्र नक्कीच आनंद मिळवून देत असते.
१ जानेवारीच्या नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जी तरुणाई पार्ट्यामध्ये बेधुंद होवून जल्लोष, धांगडधिंगाणा करत असते तीच तरुणाई आपल्या हिंदू नववर्षाचे स्वागत मात्र नम्रतेने, शालीनतेने आणि आत्मियतेने करत असतात. सकाळी-सकाळी नटून-थटून फेटे परिधान करून वडिलधाऱ्यासोबत शोभयात्रांमध्येही तेवढयाच आत्मियतेने भाग घेत असतात. त्यामध्ये ते नेहमीच एक पाऊल पुढे असतात. आणि हाच खरा भारतीय आणि पाश्चात संस्कृतीतील फरक आहे. हा वेगळेपणा, ही संस्कृती अशीच टिकून राहिल्यास आणि तरुणाईचा असाच सहभाग राहिल्यास महाराष्ट्रातील सणांचे महत्व त्याचबरोबर मराठी भाषा आणि मराठीची अस्मिता उत्तोरोत्तर बहरत जाईल आणि ती प्रभावीपणे जोपासलीही जाईल यात दुमत नाही.
तर मग चला, शुभसंकेताचे पडघम वाजवत येणारा हा आपला नववर्षाचा पाहीला दिवस आपण सर्वजण अगदी मनापासून आणि उत्साहात साजरा करूया. शुभ गुढीपाडवा….!!!
भरत माळकर -मुंबई
वाचन
15553
प्रतिक्रिया
60
चान चान निबंध
In reply to चान चान निबंध by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हो, पण काकांना नक्की काय
गुढी पाडव्याला ग्लेमर नाही आहे
In reply to गुढी पाडव्याला ग्लेमर नाही आहे by सांगलीचा भडंग (verified= न पडताळणी केलेला)
@क्रिसमस साजरा करणे थोडे अप
In reply to गुढी पाडव्याला ग्लेमर नाही आहे by सांगलीचा भडंग (verified= न पडताळणी केलेला)
गुढी पाडव्याचे "गुडी पाडवा
In reply to गुढी पाडव्याचे "गुडी पाडवा by डॉ सुहास म्हात्रे
"गुडी गुडी पाडवा (Goody Goody
In reply to "गुडी गुडी पाडवा (Goody Goody by डॉ सुहास म्हात्रे
*lol*
या निमित्ताने
In reply to या निमित्ताने by वेल्लाभट
टाका टाका, हिरवळीचे पण फोटो
In reply to टाका टाका, हिरवळीचे पण फोटो by सूड
ख्याक्क !
In reply to ख्याक्क ! by वेल्लाभट
हीच का ती शोभा (यात्रा)
In reply to हीच का ती शोभा (यात्रा) by यसवायजी
ह्या फोटोमधल्या एकीवर अतिशय
In reply to ह्या फोटोमधल्या एकीवर अतिशय by कॅप्टन जॅक स्पॅरो
आणि दुसरीवर माझे
In reply to आणि दुसरीवर माझे by टवाळ कार्टा
माझे दोघिंवर...
In reply to माझे दोघिंवर... by अत्रुप्त आत्मा
ऑ लब्बाल गुल्जी...अच्च नै
In reply to ऑ लब्बाल गुल्जी...अच्च नै by टवाळ कार्टा
टकाराव, संन्यासानंतर जास्तच
In reply to ऑ लब्बाल गुल्जी...अच्च नै by टवाळ कार्टा
आवरा!! दुष्काळातनं आला असलात
In reply to आवरा!! दुष्काळातनं आला असलात by सूड
खिक्क
In reply to आवरा!! दुष्काळातनं आला असलात by सूड
अगदी अगदी
In reply to ऑ लब्बाल गुल्जी...अच्च नै by टवाळ कार्टा
@आदी १ घ्यायची...झेपली तर
In reply to @आदी १ घ्यायची...झेपली तर by अत्रुप्त आत्मा
माझ्याकडे ३ आहेत
In reply to माझ्याकडे ३ आहेत by टवाळ कार्टा
माझ्याकडे ३ आहेत
In reply to माझ्याकडे ३ आहेत by टवाळ कार्टा
@माझ्याकडे ३ आहेत >> मग तरी
In reply to @माझ्याकडे ३ आहेत >> मग तरी by अत्रुप्त आत्मा
तीघीतल्या "चालू" कीती आहेत ते
In reply to तीघीतल्या "चालू" कीती आहेत ते by खटपट्या
आगागाग्गाग्गागागा!
In reply to हीच का ती शोभा (यात्रा) by यसवायजी
डॉक्टर
In reply to टाका टाका, हिरवळीचे पण फोटो by सूड
सूड
नूतन मराठी वर्षाच्या शुभेच्छा
शोभायात्रा?
In reply to शोभायात्रा? by सुनील
आपण कुठे राहता?
In reply to शोभायात्रा? by सुनील
आमच पेटंट आहे.
In reply to आमच पेटंट आहे. by सतीश कुडतरकर
पण मुळात डोंबोलीकरसुध्धा
या वर्षी
राम, रावण, हिंदू कशाला यांना
In reply to राम, रावण, हिंदू कशाला यांना by सतीश कुडतरकर
सातवाहनांचा पण तसा फारसा
In reply to सातवाहनांचा पण तसा फारसा by प्रचेतस
येतो तो कुशाण कनिष्काचा आणि
In reply to येतो तो कुशाण कनिष्काचा आणि by हाडक्या
अगदी अगदी.
सातवाहन x क्षत्रप
In reply to सातवाहन x क्षत्रप by सतीश कुडतरकर
तसे नाही.
In reply to तसे नाही. by प्रचेतस
इतिहासकारांमध्येच मतभेद आहेत.
In reply to इतिहासकारांमध्येच मतभेद आहेत. by सतीश कुडतरकर
सहमत आहे.
In reply to सहमत आहे. by प्रचेतस
एकदम चुक. तुम्ही इतीहासाची अशी मोडतोड करु नका.
In reply to एकदम चुक. तुम्ही इतीहासाची अशी मोडतोड करु नका. by अर्धवटराव
(No subject)
डोंबिवलीमध्ये शोभायात्रा सुरु
धाग्याच्या शीर्षकाला साजेस्सं
In reply to धाग्याच्या शीर्षकाला साजेस्सं by वेल्लाभट
ह्यात जर राजकीय लोक उतरले तर
In reply to ह्यात जर राजकीय लोक उतरले तर by मराठी_माणूस
ते ढाकचिक ढाकचिक म्हणजे DJ
In reply to ते ढाकचिक ढाकचिक म्हणजे DJ by सतीश कुडतरकर
ते ढाकचिक ढाकचिक
In reply to ते ढाकचिक ढाकचिक by तुषार काळभोर
तो तेच म्हणाला, मीच आपला
In reply to तो तेच म्हणाला, मीच आपला by वेल्लाभट
म्हणजे?
In reply to म्हणजे? by तुषार काळभोर
हो ना! हे सिनेमाचं यश म्हणावं
In reply to ते ढाकचिक ढाकचिक म्हणजे DJ by सतीश कुडतरकर
नक्कीच. वेगळाच अनुभव असतो.
माझा जन्मच मुळी गुढी
In reply to माझा जन्मच मुळी गुढी by सतीश कुडतरकर
बरंय राव!! तिथीनुसारच्या
In reply to माझा जन्मच मुळी गुढी by सतीश कुडतरकर
आमच्यातर्फे सुद्धा
In reply to आमच्यातर्फे सुद्धा by खटपट्या
खटपट्या
In reply to खटपट्या by सतीश कुडतरकर
करा करा तीथीपरमान करा.. तुमचे
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी
अशा या शोभा यात्रेत , बहुतेक
नशीब की अजून एखाद्या पुढार्