मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुढीपाडवा आणि तरुणाई...

bharatm · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
गुढीपाडवा आणि तरुणाई... हवी-हवीशी वाटणारी थंडी मावळत आलेली असते आणि धगधगता उन्हाळा होळीचे रंग उधळून मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी चक्क निसर्गालाच खुणावत असतो. हिंदू कालगणनेनुसार चैत्र मास आपल्या सोबत नवे वर्ष घेऊन येतो. नवी स्वप्ने, नव्या आशा-आकांक्षा याबरोबरच नवं काहीतरी करण्याचा उत्साह, एखादी मोठी खरेदी किंवा गुंतवणूक करण्याचा हा शुभ दिवस म्हणजेच गुढीपाडवा. अशा या मंगलदिनी आपल्या संकल्पकार्याचा शुभारंभ करायला मिळणे ही प्रत्येकासाठीच आनंदाची आणि समाधानाची बाब असते. चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मनाला जातो. आपल्या स्वतंत्र अस्मितेचे हे लक्षण आहे. रामाने रावणाचा बिमोड करून अयोध्येत प्रवेश केला तो दिवस विजयाचे प्रतिक म्हणून आपण गुढी उभी करतो. आपण जसे १५ ऑगस्टला आपला स्वातंत्र्यदिवस उत्साहात साजरा करतो तसाच हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस गुढीरूपी झेंडा आकाशात दिमाखाने फडकवत प्रत्येक घर साजरा करत असते. आपल्याकडे नवीन वर्षाची सुरुवात दोन वेळा केली जाते, एक इंग्रजी कालगणनेनुसार 'Happy New Year' ने आणि दुसरे हिंदू कालगणनेनुसार 'नूतन मराठी वर्षाच्या शुभेच्छा' ने म्हणजेच गुढीपाढव्याने. १ जानेवारी आळसात उजाडतो कारण त्याला ३१ डिसेंबरचा अंमल असतो. १ जानेवारीच्या स्वागतापेक्षा ३१ डिसेंबरच्या रात्रीचीच सगळ्यांना ओढ असते. पण आपला गुढीपाडवा चैतन्य घेऊन उजाडतो. अभ्यंगस्नानांनी सुरु होणारा हा पाडवा प्रत्येक घरातील लहान-थोरांना नटून थटून अलंकाराने सुशोभित होऊन गुढया उभारायचा दिवस असतो. अशा या गुढीपाडवा आणि इतरही धार्मिक, सांस्कृतिक सणांपासून आपली तरुणाई दूर असते असं काही वेळा भासवलं जात. परदेशी संस्कृतीचे अनुकरण करते अशीच ओरड असते, परंतु ते खोटे आहे. महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच भारतामध्ये पाश्चात्य संस्कृतीची वाढत चाललेली जादू पाहता, तरुणांकडून हिंदू आणि मराठी सण मात्र तेवढयाच पारंपारिक पद्धतीने साजरे होताना दिसत आहेत. किंबहुना ते वाढतच आहेत. आत्ताच्या इंग्लिश जमान्यात वावरणारी, सतत सोशल नेटवर्कशी जोडलेली आणि खुली अर्थव्यवस्था, खुली बाजारपेठ यामुळे सतत परदेशी वाऱ्या करणारी किंवा सतत परदेशी घटनांशी निगडीत असलेली ही तरुणाई पश्चात पद्धतीने काही कार्यक्रम नक्कीच करत असतात मात्र आपले सणही आपल्या घरच्यांसोबत तेवढयाच आनंदाने, उत्साहाने आणि पुढाकाराने साजरे करताना दिसतात. त्यातील धार्मिकता काहीशी अंशी कमी झालेली असेलही परंतु आपले सण साजरे करण्याची त्यांची धावपळ मात्र नक्कीच आनंद मिळवून देत असते. १ जानेवारीच्या नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जी तरुणाई पार्ट्यामध्ये बेधुंद होवून जल्लोष, धांगडधिंगाणा करत असते तीच तरुणाई आपल्या हिंदू नववर्षाचे स्वागत मात्र नम्रतेने, शालीनतेने आणि आत्मियतेने करत असतात. सकाळी-सकाळी नटून-थटून फेटे परिधान करून वडिलधाऱ्यासोबत शोभयात्रांमध्येही तेवढयाच आत्मियतेने भाग घेत असतात. त्यामध्ये ते नेहमीच एक पाऊल पुढे असतात. आणि हाच खरा भारतीय आणि पाश्चात संस्कृतीतील फरक आहे. हा वेगळेपणा, ही संस्कृती अशीच टिकून राहिल्यास आणि तरुणाईचा असाच सहभाग राहिल्यास महाराष्ट्रातील सणांचे महत्व त्याचबरोबर मराठी भाषा आणि मराठीची अस्मिता उत्तोरोत्तर बहरत जाईल आणि ती प्रभावीपणे जोपासलीही जाईल यात दुमत नाही. तर मग चला, शुभसंकेताचे पडघम वाजवत येणारा हा आपला नववर्षाचा पाहीला दिवस आपण सर्वजण अगदी मनापासून आणि उत्साहात साजरा करूया. शुभ गुढीपाडवा….!!! भरत माळकर -मुंबई

वाचने 15553 वाचनखूण प्रतिक्रिया 60

सांगलीचा भडंग Wed, 03/18/2015 - 13:03
मेन कारण आहे कि गुढी पाडव्याला ग्लेमर नाही आहे . हल्ली थोडे थोडे ते वाढत आहे हि खरच चांगली गोष्ट आहे . जिथे क्रिसमस ( ख्रिश्चन साधारण ४-५ टक्के असतील ) सारख्या सणाला जेवढ्या ऑफर मोल/दुकानामध्ये मध्ये असतात तेवढ्या गुढी पाडव्याला नसतात . क्रिसमस साजरा करणे थोडे अप मार्केट समजले जाते तसे गुढी पाडवा ला महत्व यायला पाहिजे. शाळे मध्ये पण तेवढेच महत्व दिले तर नक्कीच गुढी पाडवा एक मोठा सण होईल . ( सध्याहि आहेच पण थोडे जास्त मार्केट आणि हवा होईल) अवांतर : गुढी पाडवा तिथीने साजरा न करता मार्च मधला दुसरा शनिवार टाइप साजरा केला तर :-) . म्हणजे लोकांना लक्षात राहील . गोल्ड सेटरडे / मेंगो सेटरडे सारखे नाव दिले कि फुल मार्केट मिळेल सणाला .

In reply to by सांगलीचा भडंग (verified= न पडताळणी केलेला)

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 03/19/2015 - 00:52
@क्रिसमस साजरा करणे थोडे अप मार्केट समजले जाते तसे गुढी पाडवा ला महत्व यायला पाहिजे. शाळे मध्ये पण तेवढेच महत्व दिले तर नक्कीच गुढी पाडवा एक मोठा सण होईल . ( सध्याहि आहेच पण थोडे जास्त मार्केट आणि हवा होईल) >>>>>>> अगदी ..अगदी. सहमत(च) आहे. आंम्हिही नविन कै तरी काढावे म्हणतो. ताम्रपात्र मध्ये बृहत् काटीक निस्सारण विधी! (मायला, ...जमलं की नावातच! ;) ) भेटा अगर ल्ह्या.. दुकाणः- आत्मंम् भट्ट बांबूतांबेवाले. जुण्या मंडै जवळ. भुरभुरुड आळी. तेल्या मारुतीच्या पाठी,चिक्टोबा नाणे वाड्याजवळ.

In reply to by सांगलीचा भडंग (verified= न पडताळणी केलेला)

गुढी पाडव्याचे "गुडी पाडवा (Goody Padawa)" असे बारसे केल्यास त्याला चांगले दिवस येतील असे वाटते ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

टवाळ कार्टा Mon, 03/23/2015 - 13:20
ऑ लब्बाल गुल्जी...अच्च नै कल्लायच्चं आदी १ घ्यायची...झेपली तर दुस्लीचा विचाल कलायचा...नाहीतरी एकीबद्दल लोक बोल्तातच की झेपेल त्यानेच घ्यावी ;)

In reply to by टवाळ कार्टा

हाडक्या Mon, 03/23/2015 - 21:34
टकाराव, संन्यासानंतर जास्तच चावट, अश्लील झाला आहेस असे नमूद करतो.. ;) भो, शांत हो.. (पक्षी: थंड घे रे भावा..)

In reply to by टवाळ कार्टा

@आदी १ घ्यायची...झेपली तर दुस्लीचा विचाल कलायचा>> दोन्ही झेपवण्यात आहे अर्थ,नाहितर तुझं जीवनच व्यर्थ! =))

सुनील Wed, 03/18/2015 - 15:16
गुढीपाडव्याची शोभायात्रा हा नक्की काय प्रकार आहे? पूर्वी असले काही केल्याचे/पाहिल्याचे आठवत नाही. गेल्या काही वर्षांपासूनच ऐकतोय. घरगुती गुढीपाडवा असा सार्वजनिक करण्यामागचा उद्देश काय? बाकी, शोभायात्रा म्हणजे मिरवणूकच ना?

In reply to by सुनील

सतीश कुडतरकर गुरुवार, 03/19/2015 - 15:54
ते आम्ही डोंबिवलीकरांनी सुरु केल आहे. आमच पेटंट आहे. नवीन संशोधन करून आम्ही गुढीपाडव्याला पार पाच हजार वर्षांपर्यंत मागे नेल आहे. त्याच्या आधी एखादा राजा सापडला तर तिथपर्यंत पण घेऊन जाऊ. आम्हाला अस तस समजता का राव.

In reply to by सतीश कुडतरकर

टवाळ कार्टा Sat, 03/21/2015 - 23:59
पण मुळात डोंबोलीकरसुध्धा "त्या एका जगप्रसिध्ध" शहरातले आहेत असे जुने डोंबोलीकर म्हणतात असे ऐकून आहे ;)

In reply to by सतीश कुडतरकर

प्रचेतस गुरुवार, 03/19/2015 - 16:24
सातवाहनांचा पण तसा फारसा संबंध येत नाहीच. येतो तो कुशाण कनिष्काचा आणि क्षत्रपांचाच.

In reply to by प्रचेतस

हाडक्या गुरुवार, 03/19/2015 - 19:57
येतो तो कुशाण कनिष्काचा आणि क्षत्रपांचाच.
अन् हे तसे भारतीय उपखंडातले नव्हते म्हणे.. ;)

In reply to by सतीश कुडतरकर

प्रचेतस गुरुवार, 03/19/2015 - 16:49
तसे नाही. हा शक सुरु केला कनिष्काने आणि त्याचे पालन केले शकांनी (क्षत्रपांनी) वास्तविक गौतमीपुत्राने केलेल्या नहपान क्षत्रपाचा विच्छेदाचा काल ह्या कालगणनेशी अजिबात जुळत नाही. शालिवाहन शक हे नाव नंतर कधीतरी ९/१०/११ व्या शतकात चिकटले गेले.

In reply to by प्रचेतस

सतीश कुडतरकर गुरुवार, 03/19/2015 - 17:21
इतिहासकारांमध्येच मतभेद आहेत. माझा आक्षेप धर्माला मध्येच घुसडण्यात आहे. यामुळे चुकीचा संदेश पोहोचतो.

In reply to by सतीश कुडतरकर

प्रचेतस गुरुवार, 03/19/2015 - 20:05
सहमत आहे. मात्र शकनिर्मात्याबाबत बहुतांश संशोधकांमधे मतभेद आहेत पण बहुतेकांचे तो गौतमीपुत्राने तो सुरु केला नाही याबाबत एकमत आहे.

In reply to by प्रचेतस

अर्धवटराव Fri, 03/20/2015 - 23:12
काहि (किंबहुना काहि वगळुन इतर सर्व) विशिष्ट लोकांनी अतिविशिष्ट हेतुने हे इतीहासाचं कुभांड रचलं आहे. सत्य शोधनाचा एकमेव अधिकृत परवाना धारण करणार्‍या अतिएकमेव संस्थेने छ. संभाजीराजांच्या मृत्युशी गुढीपाडव्याचा जो संबंध शोधुन काढला आहे तोच बरोबर आहे. त्याचा अभ्यास करायचा सोडुन हे क्षत्रप, शक, गौतमीपुत्र वगैरे अनाठायी गोष्टीत वेळ दडवु नका.

सतीश कुडतरकर Fri, 03/20/2015 - 10:50
डोंबिवलीमध्ये शोभायात्रा सुरु करण्यात आली तेंव्हा माझी उत्सुकता जागी झाली. कारण आतापर्यंत शालिवाहन शक १९०० साल अस काहीसं माहिती होत. पण जेंव्हा शोभायात्रेमध्ये तेच युगाब्ध ५००० वगैरे वाचलं आणि म्हणालो हे काय गौडबंगाल आहे. रामाचा संबंध लहानपणापासून ऐकून आहे. तरीही एक प्रश्न उरतोच. राम उत्तरेचा आणि तिकडे गुढी उभारण वगैरे प्रकार नाही. इतिहासकारांमध्ये कुशाण/सातवाहन याबाबत मतभेद असले तरी गुढीपाडव्याचा संबंध धर्म/राम यांच्याशी नाही याबाबत एकमत नक्कीच आहे.

वेल्लाभट Fri, 03/20/2015 - 11:06
धाग्याच्या शीर्षकाला साजेस्सं उदाहरण आज बघितलं. ट्रेनमधे एक मराठी (?) मुलगा एका अमराठी मुलाला सांगत होता, 'अरे कल आजा! मस्त राईड (शोभायात्रा) रहता है.. फुल क्राउड मस्त. और हमारे इधर तो बँड बिंड भी होता है (बहुदा ढोलपथक). झंडा लेके नाचनेका ढाकचिक ढाकचिक.' मस्तच म्हणजे. चालेल! आनंद आहे.

In reply to by वेल्लाभट

मराठी_माणूस Fri, 03/20/2015 - 11:53
ह्यात जर राजकीय लोक उतरले तर दहीहंडी सारखा प्रकार व्हायला नको. त्या ढाकचिक ढाकचिक चा फार वैताग येतो.

In reply to by वेल्लाभट

तुषार काळभोर Fri, 03/20/2015 - 14:46
झंडा लेके नाचनेका "ढिन्च्याक ढिच्याक". !!! असं?? लोल!! मराठी लोकांसाठी "ढिन्च्याक ढिच्याक" चा अर्थच बदललाय मागच्या दोन वर्षात.

In reply to by सतीश कुडतरकर

खटपट्या Sat, 03/21/2015 - 00:14
आमच्यातर्फे सुद्धा वाढदीवसाच्या शुभेच्छा ! रच्याकने - वाढदीवस तीथीप्रमाणे करता की ईंग्रजी कॅलेंडर प्रमाणे ? माझ्या वडीलांचा जन्म रामनवमीचा. पण आम्ही दोन्ही दिवशी करतो. तीथी आणी ईंग्रजी कॅलेंडर...

In reply to by खटपट्या

सतीश कुडतरकर Mon, 03/23/2015 - 11:23
तसो वाढदिवस आम्ही कधी साजरो करुक नाय. पण आता तुम्ही म्हणतास तर तिथीनुसार करुचो इचार करतव. माझ्या बायकोचो जन्म १४ ऑगस्टचो. पाकीस्तानचो स्वातंत्र्यदिन. पण तिथीनुसार गोकुळ अष्टमी. त्येका पण सांगाक होया तिथीनुसार करुक. उगाच guilty फील येता. *lol*

विवेकपटाईत Sat, 03/21/2015 - 10:23
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी वैदिक काळात इंद्र्ध्वजाची पूजा होत होती. प. उत्तर प्रदेश्यातल्या काही गावांत आज ही परंपरा आहे. देवराज इंद्राला आपण विसरून गेलो पण आपण आज ही गुडी उभातोच.

अशा या शोभा यात्रेत , बहुतेक वापरण्यात येणारे पेट्रोल लयी म्हंजे लयीच स्वस्त असले पाहीजे ! इतर वेळेला आम्ही " वाढलेले पेट्रोलचे भाव कमी करा हो माय बाप सरकार " असे ओरड्ण्यास मोकळे असतो ना?

नशीब की अजून एखाद्या पुढार्‍याच्या डोक्यात " आपल्या पोराच्या वाढदिवसानिमित्त , ढोल ताशांची मिरवणुक " काढण्याचे खूळ आलेले नाही , नाहीतर वर्षातील ३६५ दिवस आणि सकाळ / संध्याकाळ मिरवणुकाच मिरवणूका पहावयास मिळाल्या असत्या. तेही दिवस फार दूर असतील असे मला तरी वाटत नाही. चला, रोजगाराच्या नव्या वाटा ! !