मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सोनुलं

ऊध्दव गावंडे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कायं झालं कसं झालं नाई काईचं कयलं, उभ्या पिकाचं वावरं यकायकी उलंगलं १ आता लोकं डोयापुळे होतं चांदनं खेयतं, यकायकी कुठूनं हा आला अंधार पयतं २ रेती थापटूनं खोपे किती पायावरं केले, पायं काळतां भाईरं सारे खचूनचं गेले ३ मनातले मांडे सारे मनातचं रायले , पोटरकी धांडे नाई ते नाईचं निसयले ४ झाळं पळलं वार्यातं आता कुठची सावली, गेला उळूनं सोनुला रडं रडली माऊली ५

वाचने 1413 वाचनखूण प्रतिक्रिया 6

ऊध्दव गावंडे गुरुवार, 03/19/2015 - 23:57
खूप खूप धन्यवाद,वल्ली, रुपी, यसवायजी प्रतिसादा बद्दल,आभार आपला युकेजी युकेजी= ऊध्दव काशीराव गावंडे मिसळपाव, संमं, तसेच मिपा करांना खूप खूप धन्यवाद!