मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खेळ दोन ओळींचा - २

राघव · · जे न देखे रवी...
खेळ मागल्यावेळी सारखाच.. एक ओळ मला सुचली ती अशी - खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव ..... पुढची ओळ काय होऊ शकेल ते आपल्याला सुचतंय तसं प्रतिसादात लिहायचं. हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत. अट एकच, वर लिहिलेल्या पहिल्या ओळीशी निगडीत अशीच दुसरी ओळ असायला हवी! मागल्यावेळी तर भन्नाट डोकी चाललेली.. यावेळी बघुयात कसे काय जमते ते! मुमुक्षु :)

वाचने 4960 वाचनखूण प्रतिक्रिया 20

लिखाळ Tue, 11/18/2008 - 18:28
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव टमरेल नाही तरी 'बसून' घेतो राव -- लिखाळ.

मदनबाण Tue, 11/18/2008 - 18:31
टमरेल नाही तरी 'बसून' घेतो राव च्यामारी लईच घाईत दिसताय राव!!! =)) कृ.ह.घे. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर

कपिल काळे Tue, 11/18/2008 - 19:25
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव कोलीन आली तिकरुन पापलेटचा काय भाव http://kalekapil.blogspot.com/

In reply to by अनामिक

खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव लखलखत्या वीजेमुळे किनारी दिसे नाव वल्हवतवल्हवत कधी जाउं या पल्ल्याड सांग साजणा! कभिन्न रात्र येईल का रे आड www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

विजुभाऊ Wed, 11/19/2008 - 09:49
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव परी काहुर मन आठवते तेच जुने घाव यमकासाठी शब्द : वाव ,डाव, जेव, भाव ,व्हावं ,काव ,पडाव ,ट्यांव. कावकाव ,म्याव , चिव ,उरावं ,प्यावं , सोडावं झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

In reply to by विजुभाऊ

खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव परी विजुभौंना आठवते तेच जुने नांव - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

तृप्ती Wed, 11/19/2008 - 15:48
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव हुर हुर दाटते मनी ,आठवुन तुझे नाव.

निखिलराव Wed, 11/19/2008 - 17:00
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव तिथे किनारी बसलो खात मिसळ पाव

योगी९०० Wed, 11/19/2008 - 19:30
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव खादाडमाऊ मि.पा. वर करतोय म्याव म्याव खादाडमाऊ

मनीषा Wed, 11/19/2008 - 20:13
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव रविकिरणांचा कसा तेथे रंगे डाव |

सागर Wed, 11/19/2008 - 20:28
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव मला काय माहीत कोणाचा हा घाव खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव देवा मंदीने मरतोय रे, आता तरी धाव - सागर

प्राजु Wed, 11/19/2008 - 22:05
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव झुळझुळत्या पाण्याशी झिम्मा खेळते नाव.. - प्राजु - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

राघव गुरुवार, 11/20/2008 - 12:49
वा वा.. मस्त लिहिलंय सगळ्यांनी! येऊ देत अजून.. एक माझाही प्रयत्न - खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव, पैलतीरी उभा माझ्या विठ्ठलाचा गाव! (हसरा) मुमुक्षु

दत्ता काळे Sat, 11/22/2008 - 16:57
एक माझा प्रयत्न खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव, कातळकोरीव घाटावरती क्रुष्ण-केशरी भाव