शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी महिनाभर राहून मनसोक्त हुंदडायचे,मामेभाऊ व त्याच्या मित्रांबरोबर खेळायचे , टिंगलटवाळ्या करायच्या व सुट्टी संपली की ही आठवणींची शिदोरी घेवून आपल्या घरी परतायचे हा माझा दरवर्षीचा कार्यक्रम असे. अकरावीची वार्षिक परिक्षा संपल्यावर दरवर्षीप्रमाणे आजोळी गेलो. दुपारची वेळ असूनही घरात आजी आजोबांव्यतिरिक्त कोणीच नव्हते. मामेभाऊ-बहीण कोणीही घरात नव्ह्ते, प्रत्येकाने स्वतःला अभ्यासापासून ते पोहण्यापर्यंतच्या क्लासेसमध्ये गुंतवून घेतले होते. हातपाय धूवून फ्रेश होवून आजी-आजोंबांबरोबर थोडावेळ गप्पा मारल्या व बाहेर सटकलो. शेजारी मित्राच्या घरी गेलो तर तोही असाच कुठल्यातरी क्लासला गेला होता, बरोबरीचे कोणीही आजुबाजुला खेळताना दिसत नव्हते, फक्त चिल्लिपिल्ली मुले भर उन्हात खेळत होती. ते रखरखीत ऊन व आजुबाजूचे वातावरण मला अधिक उदास वाटू लागले,ह्याच उन्हात मित्रांबरोबर खेळताना असे कधीही जाणवले नव्हते. संध्याकाळी भावंडांबरोबर बाहेर मॉलमध्ये खरेदी,खादाडणे, इ.व्हायचे. एखाद दोन दिवस हे ठिक वाटले नंतर त्याचाही कंटाळा येवू लागला. अशी मजा मला माझ्या शहरातही मिळत होती. आजोळी मी ज्यासाठी आलो होतो त्या मजेला यंदा मी मुकलो होतो, पहिल्यांदा मी आजोळी कंटाळलो होतो. आजीआजोबांच्या आग्रहामुळे मी कसाबसा एक आठवडा आजोळी काढला.
दरवर्षीप्रमाणे मला निरोप देण्यासाठी बस स्टँडवर आज कोणीही उपस्थीत नव्हते. गर्दी भरपूर होती. मुंबईला जाणारी बस आली. जो तो बसमध्ये चढण्यासाठी दरवाज्यात गर्दी करत होता, मीही त्यात सामील झालो. एव्हाना अर्धी गाडी भरली होती. मी पायरीवर पाय ठेवणार तितक्यात एका उंचपूर्या मजबूत देहयष्टीच्या माणसाने माझ्यासकट सगळ्यांना मागे ढकलून गाडीत शिरकाव केला. मी पुन्हा गाडीत चढण्याचा नाद सोडला व मागे जाऊन हताशपणे गाडीकडे बघत उभा राहिलो. तितक्यात त्या गाडीतील मागून दोन नंबरच्या खिडकीतून कोणीतरी हात काढून मला बोलवत होते. ते दूसरे तिसरे कोणीही नसून ज्यांनी मला ढकलले होते तेच गृह्स्थ होते. त्यांनी माझ्यासाठी जागा पकडली होती. गाडीत पाय ठेवायला जागा नव्हती कसाबसा मी मागे पोहोचलो. ए पोराला रस्ता द्या असे त्या गृह्स्थाने आपल्या खणखणीत आवाजात लोकांना फटकारले. आजुबाजुच्या प्रवाशांच्या चेहर्यावर नाराजीचे भाव स्पष्ट दिसत होते इतक्या गर्दीतही आपल्याला विनासायास बसायला मिळते ह्यामुळे मनातल्या मनात सुखावलो होतो. थँक्यु आजोबा असे म्हणुन मी बसलो. पांढरी टोपी, पांढरा सदरा व पायजामा वय अंदाजे ६५ च्या पुढे असावे. कोण लागत होते हे आजोबा आपले? का आपल्यासाठी जागा पकडली असेल?
कंडक्टरने बेल वाजवली व गाडी सुरू झाली. गर्दीमुळे कंडक्टरला मागे यायला बराच वेळ लागणार होता. तरीही मी पाकिटातून तिकिटाचे नेमके पैसे काढून शर्टच्या खिशात ठेवणार तिततक्यात आजोबा म्हणाले तू तिकिट काढू नकोस तू माझ्याबरोबर आहे असे मी कंडक्टरला सांगीन. तू काळजी करू नकोस. स्वातंत्र्यसैनिकाबरोबर एक व्यक्ति मोफत प्रवास करू शकते हे माहित होते. परंतू आजोबांचे वय ८० च्या आसपासही वाटत नव्हते. मला तर लॉटरीच लागली असे वाटले.
बाळ तू काय करतोस ? आजोबांनी विचारले.
११ वी कॉमर्सची परिक्षा दिली.- मी.
कॉमर्स?? दहावीला कमी मार्क मिळाले का?- आजोबा.
नाही- मी.
मग सायन्सला का गेला नाही, करीअरच्या संधी इ. आजोबांचे लेक्चर सूरू झाले. त्यांच्या बोलण्यातून मला समजले की
आजोबा एका खेड्यात जि.प. च्या शाळेत मुख्याध्यापक होते. गावी बर्यापैकी जमीन आहे. निवृत्तीनंतर शेतीत लक्ष घालू लागले. दोन मुले म.रा.वि.म मध्ये इंजिनिअर आहेत. एक मुलगा बी.एस्सी. अॅग्री. शेती करतो व एका साखर कारखान्याच्या बॉडीवर कुठल्याश्या मोठ्या पदावर आहे. हे सर्व ते मोठ्या अभिमानाने सांगत होते. आजोबांचे भारदस्त व्यक्तिमत्व व स्पष्टवक्तेपणामुळे मी भारावून गेलो होतो त्यांच्याविषयी आदर वाटू लागला होता.
तुम्हाला कुठे जायचे आहे? सहज चौकशी म्हणून मी आजोबांना विचारले. आजोबा म्हणाले मुंबईला.
मुंबईला कोणाकडे ? मी विचारले.
आजोबांनी माझा डावा हात पकडला व त्यांच्या पोटाच्या उजव्या बाजूवर ठेवला. कडक झाकणासारखा हाताला स्पर्श झाला. मला काही समजले नाही हे आजोबांन कळाले. व त्याणीच सांगायला सुरवात केली.
मला पोटाचा कॅन्सर आहे. टाटामध्ये ऑपरेशन करुन खराब झालेले आतडे काढून टाकले. मलविसर्जनाचा नैसर्गीक मार्ग नसल्यामुळे पोटाला छेद घेउन एक छोटी नळी आतड्याला जोडुन शरिराच्या बाहेर जोडली आहे. एक सक्शन पंप जोडून मल बाहेर काढून व नळी साफ करुन त्याला झाकण लावावे लागते. अधून मधून टाटाला यावे लागते उपचारासाठी. हे ऐकल्यावर मला आजोबांविषयी आदराबरोबर सहानुभूती वाटू लागली. मग तुम्ही प्रवासात सोबतीला कोणाला का नाही घेतले? मी विचारले. मला काय गरज कोणाला सोबतीला घ्यायची. मी ठणठणीत आहे, मला कोणाच्या आधाराची गरज नाही, थोड्या घुश्यातच आजोबा गरजले. गाडीत चढताना अनुभव घेतला होताच मी त्यांच्या फिटनेसचा.
आजोबांनी बॅगेतून एक फाईल काढली. त्यात उपचारांची अनेक कागदपत्रे होती त्याच बरोबर अनेक राजकीय व्यक्तिंची शिफरसपत्रे होती. मुलाच्या ओळखीमुळे अल्पभुधारक असल्याचा दाखला होता. ज्यामुळे त्यांचे ऑपरेशनपासून औषधौपचार मोफत मिळाले होते. हे सर्व एक माजी शिक्षक मोठ्या अभिमानाने मला सांगत होते. कॅन्सरचा रुग्ण असल्यामुळे रुग्णाबरोबर एका व्यक्तीला मुळ गावापासून टाटा हॉस्पिटल पर्यंत एस.टी. प्रवास मोफत असल्याचे एक सवलतपत्र माझ्यापुढे धरले. माझ्यामुळे तुझे तिकिटाचे पैसे वाचतील त्यातील थोडे म्हणजे ४० रुपये तू मला दे. टॅक्सिवाला फुकटात थोडाच नेणार आहे मला? आजोबा म्हणाले.
आता मला माझ्या मोफत प्रवासाचे गुपित उलगडले.मी एकटा आहे हे आजोबांनी (धूर्त) हेरले होते. मी सहज नकार देवू शकणार नाही सोपी शिकार आहे असेही वाटू शकले असेल. मी ह्या आमीषाला बळी पडलो तर एक प्रकारे मी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले असे होइल. घरातून झालेल्या संस्काराचा अवमान केल्यासरखे होइल. कंडक्टर जवळ आला मी एक ठाण्याचे तिकिट काढले. ठाण्याचा का तू? म्हणुनच असा वेडेपणा केलास तू. आजोबांनी संतापाने मला टोमणा मारला. मी उठलो व बाजूच्या प्रवाशाला बसायला जागा दिली. त्या जागेवर बसण्याचा मला काहीही नैतिक अधिकार नव्हता.बाजूच्या प्रवाशांच्या नजरेतून ते मला जाणवत होते. थोड्याच वेळेपूर्वी ज्या वक्तीबद्दल मला आदर व सहनुभूती होती ती आता पुर्णपणे नष्ट पावली होती.
कदाचीत मोफत उपचारांमुळे आजोबांना आजाराचे गांभिर्य समजले नसेल नाहीतर एक शिक्षक असूनही ते जर कॅन्सरसारख्या आजारातही लोभीपणा सोडू शकत नसतील व उलट भ्रष्टाचाराला जन्म देत असतील तर भावी पिढीला ते नक्किच चुकीचा संदेश देत आहेत.
वाचने
13670
प्रतिक्रिया
77
मिसळपाव
प्रतिक्रिया
अवघड आहे
सर्वच
कदाचित चांगले वागुन पण कँसर झाला म्हणुन ....
In reply to सर्वच by तिमा
कठीण आहे! तुम्हाला त्या वयात
(No subject)
काय टंकावे? ........
एक प्रश्न
अगदी
In reply to एक प्रश्न by पॉइंट ब्लँक
नशेमे कौन नही है मुझे बताओ
In reply to अगदी by प्रदीप
नैतिक मुद्द्यांवर लेखकाचे
+१
In reply to नैतिक मुद्द्यांवर लेखकाचे by मृत्युन्जय
सहमत. तसेच त्यांनी कायद्याचे
In reply to नैतिक मुद्द्यांवर लेखकाचे by मृत्युन्जय
+१ अगदी खरं आहे.
In reply to नैतिक मुद्द्यांवर लेखकाचे by मृत्युन्जय
सहमत
In reply to +१ अगदी खरं आहे. by आदूबाळ
+१
In reply to सहमत by आजानुकर्ण
सहमत आहे.
In reply to नैतिक मुद्द्यांवर लेखकाचे by मृत्युन्जय
सिलेक्टीव्ह नैतिकता' हा खास
मार्मिक
यात भ्रष्टाचार काय आहे हे समजले नाही.
म्हणजे मी कायदा मोडला तर?
In reply to यात भ्रष्टाचार काय आहे हे समजले नाही. by hitesh
नैतिकतेच्या चौकटीतच
लेख जरा नीट वाचा
मला तर लॉटरीच लागली असे वाटले.
In reply to लेख जरा नीट वाचा by मार्मिक गोडसे
ह्यात भ्रष्टाचार कोणता ?
In reply to लेख जरा नीट वाचा by मार्मिक गोडसे
मला तर लॉटरीच लागली
.
In reply to मला तर लॉटरीच लागली by मार्मिक गोडसे
नैतिकता
In reply to मला तर लॉटरीच लागली by मार्मिक गोडसे
एखाद्याची आर्थीक परिस्थीती
In reply to नैतिकता by प्रदीप
ते आणि तुम्ही
In reply to एखाद्याची आर्थीक परिस्थीती by मार्मिक गोडसे
.
In reply to एखाद्याची आर्थीक परिस्थीती by मार्मिक गोडसे
हितेश रावगावी बर्यापैकी जमीन
In reply to . by hitesh
ह्या न्यायाने एखाद्या
बघा किती फाटे फुटले. आपलं
लेख नीट वाचून
अस होय...
In reply to लेख नीट वाचून by मार्मिक गोडसे
मार्मिक आपण नैतिकतेच्या नशेत
In reply to लेख नीट वाचून by मार्मिक गोडसे
घाटपांडे साहेब
In reply to मार्मिक आपण नैतिकतेच्या नशेत by प्रकाश घाटपांडे
वर मृत्युंजय यांची
In reply to घाटपांडे साहेब by सुबोध खरे
आजोबा एका खेड्यात जि.प. च्या
हे सगळ वाचलेले आहेच.मला
In reply to आजोबा एका खेड्यात जि.प. च्या by सुबोध खरे
+ १
In reply to हे सगळ वाचलेले आहेच.मला by प्रकाश घाटपांडे
अशा क्षमाशील स्वभावाची जनता
In reply to + १ by कपिलमुनी
मार्मिक आपण नैतिकतेच्या
माझा मुख्य मुद्दा एवढाच होता
In reply to मार्मिक आपण नैतिकतेच्या by मार्मिक गोडसे
अपेक्षा ?
In reply to मार्मिक आपण नैतिकतेच्या by मार्मिक गोडसे
पुन्हा आर्थिक ?
आजारपणात इलाजासाठी येणार खर्च
In reply to पुन्हा आर्थिक ? by मार्मिक गोडसे
कॉपी पेस्ट फक्त तुमच्यासाठी
In reply to आजारपणात इलाजासाठी येणार खर्च by प्रकाश घाटपांडे
इतक्या गर्दीतही आपल्याला
लोकल ट्रेन मध्ये
मुद्द क्र. १, २, ३ मध्ये
In reply to लोकल ट्रेन मध्ये by मार्मिक गोडसे
अहो कुठे नेताय विषयाला?
+ ११११
In reply to अहो कुठे नेताय विषयाला? by असंका
अहो कुठे नेताय विषयाला?
ऑ ? कुठे नेला विषय ? तो आहे
In reply to अहो कुठे नेताय विषयाला? by हाडक्या
बाब्बौ.. चांगलंच झोंबलेलं
In reply to ऑ ? कुठे नेला विषय ? तो आहे by असंका
कोणी साठीच्या
In reply to बाब्बौ.. चांगलंच झोंबलेलं by हाडक्या
(कोणी साठीच्या आतला
In reply to कोणी साठीच्या by मार्मिक गोडसे
पटले ते घ्या
या निमित्ताने काही प्रश्न...
थोडक्यात एखादी गोष्ट कायदेशीर
In reply to या निमित्ताने काही प्रश्न... by संदीप डांगे
अगदी बरोबर. त्यामुळेच त्यावर
In reply to थोडक्यात एखादी गोष्ट कायदेशीर by प्रकाश घाटपांडे
अगदी अगदी!
In reply to अगदी बरोबर. त्यामुळेच त्यावर by संदीप डांगे
अनैतिक आहे असे म्हणता येत
In reply to थोडक्यात एखादी गोष्ट कायदेशीर by प्रकाश घाटपांडे
काही प्रश्न...काही उत्तरे
In reply to या निमित्ताने काही प्रश्न... by संदीप डांगे
स्वार्थी व प्रामाणिकतेत गल्लत
In reply to काही प्रश्न...काही उत्तरे by मार्मिक गोडसे
६. खोटी बिले सादर करून एलटीए
स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगात
In reply to ६. खोटी बिले सादर करून एलटीए by सुबोध खरे
त्या सहप्रवाशाचं कृत्य क्षम्य
मी(स्वतः) स्वार्थी आहे
तुम्हाला मुद्दाच समजून
In reply to मी(स्वतः) स्वार्थी आहे by मार्मिक गोडसे
सहमत
In reply to तुम्हाला मुद्दाच समजून by संदीप डांगे
Anti Corruption Bureau ला तक्रार
In reply to मी(स्वतः) स्वार्थी आहे by मार्मिक गोडसे
Anti Corruption Bureau ला
In reply to मी(स्वतः) स्वार्थी आहे by मार्मिक गोडसे
उगा आकांडतांडव करून काय उपयोग?
बंधो, तुम्हास मुद्दा खरंच
नक्किच सांगीन.