मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अवेळी असे मेघ दाटून येता.....

चुकलामाकला · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
अवेळी असे मेघ दाटून येता जुन्या वेदनांनी पुन्हा पाझरावे. जरी कष्ट झाले विसरण्यास ज्याना जुन्या त्या क्षणांना पुन्हा आठवावे..... कितीदा पडावे, कितीदा वहावे धडे अनुभवांचे किती साठवावे. किती आर्जवे अन किती ती प्रतीक्षा किती चातकाने मना समजवावे .... पुरे ओढ वेडी घनांची अनावर दुरूनी अता पावसा न्याहळावे.. जपावा मनातील पाऊस थोडा परी भावनांच्या पुरा थोपवावे.... अवेळी असे मेघ दाटून येता मनाच्या नभाला जरा आवरावे....

वाचने 4553 वाचनखूण प्रतिक्रिया 21

भिंगरी 28/02/2015 - 18:52
मनाच्या नभाला कसे आवरावे?

In reply to by भिंगरी

संदीप डांगे 28/02/2015 - 19:30
तुमच्या या प्रश्नाने 'संक्षि'प्त आठवणी दाटून आल्या... :-) (कविता ज्याम आवडली... आताही बाहेर नभ दाटून आले आहेत आणि पाऊस सुरू आहे. कविता एकदम समयोचित झाली.)

In reply to by संदीप डांगे

अत्रुप्त आत्मा 28/02/2015 - 19:41
कविता ज्याम आवडली... आताही बाहेर नभ दाटून आले आहेत आणि पाऊस सुरू आहे. कविता एकदम समयोचित झाली.)
>>> शत प्रतिशत सहमत! :Happy:

चाणक्य 28/02/2015 - 21:19
छान लयबद्ध झालीये. आजच लिहीलीत का? आजही अवेळी पाऊस आलाय म्हणून विचारलं.

शब्दबम्बाळ 01/03/2015 - 02:10
कितीही आवर घातला तरी पाऊस लिहायला भाग पाडतोच! :)

In reply to by शब्दबम्बाळ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 01/03/2015 - 12:48

कितीही आवर घातला तरी पाऊस लिहायला भाग पाडतोच !

सहमत. आवडली कविता. -दिलीप बिरुटे

चलत मुसाफिर 01/03/2015 - 13:07
फारच छान.

मिसळलेला काव्यप्रेमी 01/03/2015 - 18:30
मस्त रचना.. आवडली.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

नाखु 02/03/2015 - 09:23
मागील काही भू छत्रांच्या गर्दीत ही "शब्दवेल" लई भारी !!!!

तिमा 01/03/2015 - 20:38
पुरे ओढ वेडी घनांची अनावर दुरूनी अता पावसा न्याहळावे.. जपावा मनातील पाऊस थोडा परी भावनांच्या पुरा थोपवावे.... ह्या ओळी विशेष आवडल्या.

एक एकटा एकटाच 04/03/2015 - 19:43
भावना अतिशय सुंदर उतरल्या आहेत.