अवेळी असे मेघ दाटून येता.....
लेखनविषय:
अवेळी असे मेघ दाटून येता
जुन्या वेदनांनी पुन्हा पाझरावे.
जरी कष्ट झाले विसरण्यास ज्याना
जुन्या त्या क्षणांना पुन्हा आठवावे.....
कितीदा पडावे, कितीदा वहावे
धडे अनुभवांचे किती साठवावे.
किती आर्जवे अन किती ती प्रतीक्षा
किती चातकाने मना समजवावे ....
पुरे ओढ वेडी घनांची अनावर
दुरूनी अता पावसा न्याहळावे..
जपावा मनातील पाऊस थोडा
परी भावनांच्या पुरा थोपवावे....
अवेळी असे मेघ दाटून येता
मनाच्या नभाला जरा आवरावे....
वाचने
4553
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
मनाच्या नभाला कसे आवरावे?
In reply to सुंदर by भिंगरी
तुमच्या या प्रश्नाने 'संक्षि'प्त आठवणी दाटून आल्या... :-)
(कविता ज्याम आवडली... आताही बाहेर नभ दाटून आले आहेत आणि पाऊस सुरू आहे. कविता एकदम समयोचित झाली.)
In reply to तुमच्या या प्रश्नाने 'संक्षि by संदीप डांगे
कविता ज्याम आवडली... आताही बाहेर नभ दाटून आले आहेत आणि पाऊस सुरू आहे. कविता एकदम समयोचित झाली.)>>> शत प्रतिशत सहमत! :Happy:
मस्त गेय आणि सुमधुर कविता.
सुरेख कविता.बाहेर अवेळी पाऊस पडतोय आणि समोर तुमची कविता!जीयो!!
छान लयबद्ध झालीये. आजच लिहीलीत का? आजही अवेळी पाऊस आलाय म्हणून विचारलं.
अतिशय आवडली.
कितीही आवर घातला तरी पाऊस लिहायला भाग पाडतोच! :)
In reply to खूप छान! by शब्दबम्बाळ
कितीही आवर घातला तरी पाऊस लिहायला भाग पाडतोच !
सहमत. आवडली कविता. -दिलीप बिरुटेफारच छान.
सुरेख
मस्त रचना.. आवडली.
In reply to मस्त by मिसळलेला काव्यप्रेमी
मागील काही भू छत्रांच्या गर्दीत ही "शब्दवेल" लई भारी !!!!
मस्तं आहे कविता!
पुरे ओढ वेडी घनांची अनावर
दुरूनी अता पावसा न्याहळावे..
जपावा मनातील पाऊस थोडा
परी भावनांच्या पुरा थोपवावे....
ह्या ओळी विशेष आवडल्या.
सुंदर रचना!!
भावना अतिशय सुंदर उतरल्या आहेत.
धन्यवाद मित्र हो!
ह्या ओळी विशेष...
सुंदर