मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रणकला: स्पर्धा क्र.७: निकाल

संपादक मंडळ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
http://www.misalpav.com/node/30186 या सातव्या स्पर्धेलाही अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. अनेक सदस्यांनी आपली उत्तमोत्तम छायाचित्रे सादर केली. सदस्यांनी दिलेल्या गुणांनुसार पुढीलप्रमाणे पहिले ३ विजेते ठरले आहेत. १) स्पा . 1 . २) यसवायजी . 1 ३) खेडूत . 1 यांच्याशिवाय विनोद१८ आणि समर्पक यांचीही चित्रेही खूप लोकांच्या पसंतीची ठरली आहेत. अगदी मोजक्या गुणांनी हे दोघे जरा मागे राहिले. किल्लेदार ( स्पर्धेसाठी नसलेले छायाचित्र), वल्ली, इशा१२३, आतिवास, मिनियन आणि वेल्लाभट यांची छायाचित्रेही उल्लेखनीय होती. मात्र ही सर्वच छायाचित्रे त्यांच्या वर्णनाचा संदर्भ घेऊन जास्त परिणामकारक वाटत होती. कदाचित यामुळे कोणत्याही संदर्भाशिवाय इतर छायाचित्रांसोबत पाहताना ती बहुसंख्यांना जरा कमी परिणामकारक वाटली असावीत. वेल्लाभट यांचे सुरुवातीला प्रकाशित केलेले छायाचित्रही उत्तम होते. मात्र विषयाचे आव्हान स्वीकारून त्यांनी दुसरे वेगळे छायाचित्र देण्याची तयारी दाखवली याबद्दल त्यांचे खास कौतुक करत आहोत. या छायाचित्रावर आधारित आदूबाळ यांनी काढलेले चित्र उल्लेखनीय आहे. सर्व विजेते आणि स्पर्धक यांचे अभिनंदन! स्पर्धक आणि परीक्षक-प्रतिसादकर्ते यांना धन्यवाद! तसेच पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा!

वाचने 8067 वाचनखूण प्रतिक्रिया 24

वेल्लाभट Mon, 03/02/2015 - 10:52
विजेत्यांचे मनापासून अभिनंदन ! या उपक्रमाच्या निमित्ताने एकापेक्षा एक सुरेख छायाचित्रं बघायला मिळत आहेत आणि शिकायला मिळत आहे. त्यामुळे आयोजकांचे आभार. पुढील स्पर्धेच्या प्रतीक्षेत.

असंका Mon, 03/02/2015 - 11:53
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.... सर्व भाग घेणार्‍यांना मनापासून धन्यवाद. सगळेच फोटो इतके सुरेख होते, की आयोजकांनाही अनेक न जिंकू शकलेल्या फोटोंची द्खल घ्यावीशी वाटली... आतापर्यंतची सगळ्यात यशस्वी स्पर्धा असावी ही.

सर्वसाक्षी Mon, 03/02/2015 - 12:06
सर्व स्पर्धक आणि विजेत्यांचे अभिनंदन. या निमित्ताने चांगली चित्रे पाहायला मिळतात

मोहन Mon, 03/02/2015 - 12:55
कठिण विषयावरच्या स्पर्धेत इतका भरभरून प्रतीसाद मिळाल्याने सर्व स्पर्धकांचे व सं.मं चे प्रथम अभिनंदन ! इतक्या संखेने उत्तमोत्त्म छायाचित्रे बघायला मिळाल्याने खूपच आनंद झाला. तीनही विजेते छायाचित्रे अप्रतीम आहेत. पहिल्या व तीस-या क्रमांकाची तर अंतर्मुख करणारी वाटली. लगे रहो सं.मं.

यसवायजी Mon, 03/02/2015 - 23:10
मते देणाऱ्या सर्व सदस्यांचे आभार. खरंतर त्या निसर्गाचेसुद्धा आभार, की काहीही डोकं न चालवता काढलेल्या साध्या पॉइंट एंड शूट फोटोला पसंती मिळाली. :) स्पा आणि खेडूत, मस्त!!!