छायाचित्रणकला: स्पर्धा क्र.७: निकाल
http://www.misalpav.com/node/30186 या सातव्या स्पर्धेलाही अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. अनेक सदस्यांनी आपली उत्तमोत्तम छायाचित्रे सादर केली. सदस्यांनी दिलेल्या गुणांनुसार पुढीलप्रमाणे पहिले ३ विजेते ठरले आहेत.
१) स्पा
.
.
२) यसवायजी
.
३) खेडूत
.
यांच्याशिवाय विनोद१८ आणि समर्पक यांचीही चित्रेही खूप लोकांच्या पसंतीची ठरली आहेत. अगदी मोजक्या गुणांनी हे दोघे जरा मागे राहिले.
किल्लेदार ( स्पर्धेसाठी नसलेले छायाचित्र), वल्ली, इशा१२३, आतिवास, मिनियन आणि वेल्लाभट यांची छायाचित्रेही उल्लेखनीय होती. मात्र ही सर्वच छायाचित्रे त्यांच्या वर्णनाचा संदर्भ घेऊन जास्त परिणामकारक वाटत होती. कदाचित यामुळे कोणत्याही संदर्भाशिवाय इतर छायाचित्रांसोबत पाहताना ती बहुसंख्यांना जरा कमी परिणामकारक वाटली असावीत. वेल्लाभट यांचे सुरुवातीला प्रकाशित केलेले छायाचित्रही उत्तम होते. मात्र विषयाचे आव्हान स्वीकारून त्यांनी दुसरे वेगळे छायाचित्र देण्याची तयारी दाखवली याबद्दल त्यांचे खास कौतुक करत आहोत. या छायाचित्रावर आधारित आदूबाळ यांनी काढलेले चित्र उल्लेखनीय आहे.
सर्व विजेते आणि स्पर्धक यांचे अभिनंदन! स्पर्धक आणि परीक्षक-प्रतिसादकर्ते यांना धन्यवाद! तसेच पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा!
.
२) यसवायजी
.
३) खेडूत
.
वाचन
8067
प्रतिक्रिया
24