मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आत्म"मुक्ति!

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आज माझ्या आत्म्याला मुक्त मी केले जरी बोलतो माझ्या सवे तो मुक्त तू केंव्हा तरी??? प्राण जातो ज्या कुडितून त्यास का मुक्ति म्हणा? मरण येते परत जनना हाच त्याचा पाळणा. मी विचारी हाय मृत्यो मुक्तिही मजला कुठे? पानंगळं ही तव प्रवाही वाहते..!,सुटते कुठे??? तू न माझ्या अंतरिही मंदिरीही तूच तू. शरिर मिळते त्या निसर्गी बदलता..तू ही ऋतू! सांग मृत्यो खरी मुक्ती तू कधी देशिल का? जर दिली तर तू कधिही..,मृत्यू तरं असशील का? मृत्यू म्हणतो हाय आत्म्या सोडूनी जाऊ नको.. निसर्गाच्या परमं आत्मी तू तिथे राहू नको. अरे तुम्हा तशी मुक्ति देण्यास का रे सांगता? तुम्हा मुक्ति मिळे जेंव्हा होईल माझी-सांगता. मी म्हणालो याच वेळी तू मला मारू नको. मृत्यू म्हणतो , अरे चोरा तू मला तारू नको. जनन मरणी तूच आत्मा मुक्तं तू ही हो खरा. जगी माझे कार्यं करण्या जगू दे मजला जरा. मी हि त्यावरं दया केली सोडुनी गेलो दुरी. आत्म्याला मुक्त केले अतृप्तता धरुनी उरी! मूळं रूपी मुळं प्रवाही मुक्त मी ही जाहलो. अजुनी पुढचा जन्मं येण्या, अत्रुप्त आता राहिलो. ====================================

वाचने 9755 वाचनखूण प्रतिक्रिया 30

प्रचेतस 16/02/2015 - 22:41
अत्यंत सहज सुंदर असे काव्य. आत्म"मुक्ति ची संकल्पना अतिशय सुरेखरित्या समजावून सांगितली आहे. कविता वाचून ह्या श्लोकाची आठवण आली. जितात्मन: प्रशांतस्य परमात्मा समाहित:। शीतोष्णसुखदु:खेषु तथा मानापमानयो:।। खरोखरच आत्ममुक्ती म्हणजे आत्म्यावर एक प्रकारचा विजयच होय.

गणेशा 16/02/2015 - 23:43
छान कविता.. वर्याचदा आपण असेच प्रोफाईल नेम घेत असतो आणि नंतर त्या अनुषंगाने विचार ही करु लागतो. ही कविता अशीच झालेली आहे. आणि प्रोफाईल नावामुळे त्या निमत्ताने आत्म्याशी संवाद ही करुन आला तुम्ही

पदकि 17/02/2015 - 04:00
मस्तच मी हि त्यावरं दया केली सोडुनी गेलो दुरी. आत्म्याला मुक्त केले अतृप्तता धरुनी उरी! : या ओळी वृत्तात नीट बसवायला हव्या!

In reply to by कंजूस

हाडक्या 17/02/2015 - 16:27
आत्मा यांना सोडून गेला अन हे गावभर कवितांचे फ्लेक्स वाटत सुटलेत मी आत्म्याला सोडलं. धूर आणि अत्तरांचा त्याला कंटाळा आला की काय?
अग्गाग्गा .. :))))

सस्नेह 17/02/2015 - 12:32
आमचा सल्ला .. अतृप्ततेच्या संगतीने जगण्यास आहे माधुरी आत्म्याविना मरणाचीही आहे थरारी अधुरी

हाडक्या 17/02/2015 - 16:25
मस्त हो बुवा.. सोडलं म्हणून सुटत असतं आणि मुक्त केलं म्हणून मुक्ति मिळत असती तर काय. असो, प्रयत्न चालू द्या.. :) (अवांतर : त्ये तांब्याधिपती मठाचे काम कोन बगनार मंग अता ? अत्रुप्त की आत्मा ??)

नाखु 17/02/2015 - 17:33
इतक्यात तुम्ही कुणाला म्हटलात काय? ता शीही माझी टकली ठळक शब्दांवर नजर ठेवा "आत्मज्ञान" होईल. बुवा पंखा संघ पिं.चि.शहर शाखा