आत्म"मुक्ति!
लेखनविषय:
आज माझ्या आत्म्याला मुक्त मी केले जरी
बोलतो माझ्या सवे तो मुक्त तू केंव्हा तरी???
प्राण जातो ज्या कुडितून त्यास का मुक्ति म्हणा?
मरण येते परत जनना हाच त्याचा पाळणा.
मी विचारी हाय मृत्यो मुक्तिही मजला कुठे?
पानंगळं ही तव प्रवाही वाहते..!,सुटते कुठे???
तू न माझ्या अंतरिही मंदिरीही तूच तू.
शरिर मिळते त्या निसर्गी बदलता..तू ही ऋतू!
सांग मृत्यो खरी मुक्ती तू कधी देशिल का?
जर दिली तर तू कधिही..,मृत्यू तरं असशील का?
मृत्यू म्हणतो हाय आत्म्या सोडूनी जाऊ नको..
निसर्गाच्या परमं आत्मी तू तिथे राहू नको.
अरे तुम्हा तशी मुक्ति देण्यास का रे सांगता?
तुम्हा मुक्ति मिळे जेंव्हा होईल माझी-सांगता.
मी म्हणालो याच वेळी तू मला मारू नको.
मृत्यू म्हणतो , अरे चोरा तू मला तारू नको.
जनन मरणी तूच आत्मा मुक्तं तू ही हो खरा.
जगी माझे कार्यं करण्या जगू दे मजला जरा.
मी हि त्यावरं दया केली सोडुनी गेलो दुरी.
आत्म्याला मुक्त केले अतृप्तता धरुनी उरी!
मूळं रूपी मुळं प्रवाही मुक्त मी ही जाहलो.
अजुनी पुढचा जन्मं येण्या, अत्रुप्त आता राहिलो.
====================================
वाचने
9757
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
मी पहिला. आता वाचतो आत्मालेस अत्रुप्तांची कविता =))
In reply to मी पहिला. आता वाचतो आत्मालेस by कॅप्टन जॅक स्पॅरो
मी पहिला. आता वाचतो आत्मालेस अत्रुप्तांची कविता=)) अरे...काय रे हे! __/\__ =))
In reply to मी पहिला. आता वाचतो आत्मालेस by अत्रुप्त आत्मा
आयडीच्या बारश्यानिमित्त साभार =))
क्लिष्ट!!
अत्यंत सहज सुंदर असे काव्य.
आत्म"मुक्ति ची संकल्पना अतिशय सुरेखरित्या समजावून सांगितली आहे.
कविता वाचून ह्या श्लोकाची आठवण आली.
जितात्मन: प्रशांतस्य परमात्मा समाहित:।
शीतोष्णसुखदु:खेषु तथा मानापमानयो:।।
खरोखरच आत्ममुक्ती म्हणजे आत्म्यावर एक प्रकारचा विजयच होय.
चांगली आहे पण थोड़ी अवघड वाटली
छान कविता..
वर्याचदा आपण असेच प्रोफाईल नेम घेत असतो आणि नंतर त्या अनुषंगाने विचार ही करु लागतो.
ही कविता अशीच झालेली आहे.
आणि प्रोफाईल नावामुळे त्या निमत्ताने आत्म्याशी संवाद ही करुन आला तुम्ही
In reply to छान कविता.. by गणेशा
हही हही! :)
असेच काहीसे :)
मस्तच
मी हि त्यावरं दया केली सोडुनी गेलो दुरी.
आत्म्याला मुक्त केले अतृप्तता धरुनी उरी!
: या ओळी वृत्तात नीट बसवायला हव्या!
परवा आत्मा राहिला होता, आता अतृप्त!!
कम्मालाय!!
बाकी कवितेबद्दल काय बोलावं.
खिदळता खिदऴ्ता गंभीर होत जाते.
आत्मा यांना सोडून गेला अन हे गावभर कवितांचे फ्लेक्स वाटत सुटलेत मी आत्म्याला सोडलं. धूर आणि अत्तरांचा त्याला कंटाळा आला की काय?
In reply to आत्मा यांना सोडून गेला अन हे by कंजूस
दूष्ष्ष्ष्ट! :-\
In reply to दूष्ष्ष्ष्ट! by अत्रुप्त आत्मा
"दु दु कंजुस काका" असे हवे ना ते?
In reply to "दु दु कंजुस काका" असे हवे ना by सतिश गावडे
ते "दू...दू" आत्मा बोलत असेल ;)
In reply to आत्मा यांना सोडून गेला अन हे by कंजूस
आत्मा यांना सोडून गेला अन हे गावभर कवितांचे फ्लेक्स वाटत सुटलेत मी आत्म्याला सोडलं. धूर आणि अत्तरांचा त्याला कंटाळा आला की काय?अग्गाग्गा .. :))))
अात्मालेस अत्रुप्त अजून सवयीचे नाही वाटत वाचायला!कविता छानच.
In reply to अात्मालेस अत्रुप्त अजून by अजया
सहमतं. म्हणुन तर ते नावं पाडलयं त्यांना =))
आता अत्रुप्त चे त्रुप्त कधी होतायत ते बघू !! :)
In reply to आता अत्रुप्त चे त्रुप्त कधी by खटपट्या
ते तृप्तीच्या प्राप्तीची प्रतिक्षा केव्हाची कर्तायत =))
आहे ती प्रतिक्षा वळणावर उभी।
वाट पाहत आपल्या माणसाची॥
In reply to आहे ती प्रतिक्षा वळणावर उभी। by कंजूस

आमचा सल्ला ..
अतृप्ततेच्या संगतीने जगण्यास आहे माधुरी
आत्म्याविना मरणाचीही आहे थरारी अधुरी
In reply to वा गुर्जी ! by सस्नेह
अता ही माधुरी कोण?
In reply to अता ही माधुरी कोण? by प्रचेतस
अता???
तुम्च्यात पण आत्मा घुस्ला??? =))
In reply to अता ही माधुरी कोण? by प्रचेतस
@अता ही माधुरी कोण? >>> आंsss :-\ हलकट हत्ती! :P
समजायला थोडा वेळ लागला. तरीही आवडली.
पैजारबुवा
मस्त हो बुवा.. सोडलं म्हणून सुटत असतं आणि मुक्त केलं म्हणून मुक्ति मिळत असती तर काय.
असो, प्रयत्न चालू द्या.. :)
(अवांतर : त्ये तांब्याधिपती मठाचे काम कोन बगनार मंग अता ? अत्रुप्त की आत्मा ??)
In reply to मस्त हो बुवा.. सोडलं म्हणून by हाडक्या
त्ये तांब्याधिपती मठाचे काम कोन बगनार मंग अता ?त्यांचे शिष्य आहेत की! ;)
In reply to त्ये तांब्याधिपती मठाचे काम by सूड
ह्म्म्म.. तुमाला अॅडमिशन मिळालेले दिंसतेंय हो.. ;)
इतक्यात तुम्ही कुणाला म्हटलात काय?
अता तशीही माझी सटकली
ठळक शब्दांवर नजर ठेवा "आत्मज्ञान" होईल.
बुवा पंखा संघ
पिं.चि.शहर शाखा
मी पहिला. आता वाचतो आत्मालेस