चार अपशब्द
लेखनविषय:
काव्यरस
(जसे:
दाखव विठ्ठला / तुझे देवपण
नाहीतर घण/ आहे माझा
: विंदा करंदीकर )
खुल्या नभाखाली/ उभा मी नागडा
बोल तो रांगडा / सुनावितो
असे काय मोठे / देवा तुवे दिल्हे ?
आई-बाप नेले/ मृत्युलागी
साऱ्या सजीवांना / वेदना नि कळा
रक्त भळाभळा / वाहते ते
सर्वत्र ही मृत्यू /घालितो थैमान
सोडीला हैवान / मोकळा तो.
धाडिले "प्रेषित"/म्हणे सात-आठ
त्याने काय xट/ बदलले?
साऱ्या सजीवांना / बनविसी हीन
होती मग दीन/ पायी तुझ्या .
आम्हा सजीवांना / करी जे भिकारी
ब्रम्हाची शिसारी/ नाकी माझ्या
माझ्या आयुष्याचा / स्वामी मी बारका
"पोर तो पोरका" / तुझा नाही.
अटळ तो मृत्यू / सर्वांच्या राशीत
घाल ते कांशीत / जग तुझे!
: मिलिंद पदकी
वाचने
3756
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
सुरेख लिहीता हो!!
विशेषतः
माझ्या आयुष्याचा / स्वामी मी बारका "पोर तो पोरका" / तुझा नाही.या ओळी!!
छान .
आवडली !
आवडले अभंग....
-दिलीप बिरुटे
खुप छान.
छान च लिहिली आहे.
कविता म्हणून छानच असली तरी मध्यवर्ती कल्पना मान्य नाही. " त्याने" कधीच सांगितले नाही की तुमचे भले करीन.
उलट अवतार घेऊन पुरुषार्थ गाजवून कसे जगायचे हेच दाखवले आहे. अन्वयार्थ चुकीचा लावण्यात आपण लोक पटाईत असतो. " तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार " असेन तर तक्रार कुणाकडे आणि कशासाठी ?
ग्रहांचे साह्य शूराला , यशश्री पायची दासी
In reply to उत्तम ! by विटेकर
मध्यवर्ती कल्पना मान्य नाही.कविता म्हणून आवडली. तुमचे विचार म्हणून आदर आहे, पण अपेक्षा ठेवू नयेत; अगदी देवाकडूनही!! मग राग येत नाही.
In reply to उत्तम ! by विटेकर
कविता खूप आवडली. @ विटेकर, मध्यवर्ती कल्पना महत्वाचा मुद्दा आहे. मध्यवर्ती कल्पना पटली नाही असं लिहिणं ही आपली इतरांप्रती असलेली कळकळ दर्शवते. कुठेतरी आतमध्ये तुंम्हाला दुसर्या व्यक्तीबद्दल काळजी वाटल्याचं जाणवतं.
मध्यवर्ती कल्पना पटणं किंवा न पटणं हे दोन्हीही साहजिक आहे. आपण सगळेच सततच्या मानसिक/ वैचारिक उत्क्रान्तीतून घडत / बिघडत असतो. कविता कधीही सुचू शकते — उत्क्रान्तीच्या कोणत्याही क्षणी.
तुकाराम महाराजांचे अभंग बघितले तर त्यात हे दिसून येतं, वेगवेगळ्या मनोभुमिकेतून वेगवेगळा दृष्टीकोण मांडणारे, वेगवेगळ्या वेदनांना वाट मोकळी करून देणारे असे पुष्कळ अभंग महाराजांनी लिहिले आहेत. काही अभंगात असाच तक्रारीचा स्वरही जाणवतो.
मस्त
सुंदर ...
कविता म्हणून ठिक आहे. पण आपल्या दुःखाचा राग देवावर का काढायचा?
"कर्ता- करविता जर 'तोच'" असेल, तर मग शिव्याही तोच खाणार, नाही का?
मस्त
आवडली
सुरेख लिहीता हो!!