मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चार अपशब्द

पदकि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
(जसे: दाखव विठ्ठला / तुझे देवपण नाहीतर घण/ आहे माझा : विंदा करंदीकर ) खुल्या नभाखाली/ उभा मी नागडा बोल तो रांगडा / सुनावितो असे काय मोठे / देवा तुवे दिल्हे ? आई-बाप नेले/ मृत्युलागी साऱ्या सजीवांना / वेदना नि कळा रक्त भळाभळा / वाहते ते सर्वत्र ही मृत्यू /घालितो थैमान सोडीला हैवान / मोकळा तो. धाडिले "प्रेषित"/म्हणे सात-आठ त्याने काय xट/ बदलले? साऱ्या सजीवांना / बनविसी हीन होती मग दीन/ पायी तुझ्या . आम्हा सजीवांना / करी जे भिकारी ब्रम्हाची शिसारी/ नाकी माझ्या माझ्या आयुष्याचा / स्वामी मी बारका "पोर तो पोरका" / तुझा नाही. अटळ तो मृत्यू / सर्वांच्या राशीत घाल ते कांशीत / जग तुझे! : मिलिंद पदकी

वाचन 3756 प्रतिक्रिया 0