गोवंशाला अभय द्या : नागपुरी तडका
गोवंशाला अभय द्या...!!
बाता नोको फ़फ़लू बापू, दुभतं करुन पाह्य
तवा तुले माहित पडंन, काह्यले म्हंते गाय....!!
शेणपुंजा, दूध-दोह्यनं, मनके कड़कड़ करते
गोधन चारु चारु राज्या, मांड्या- पोटर्या भरते
तरीबी अमुच्या भगुण्याले, तुमचा देव पावत नाय...!!
फुक्कट चोखू, ढोंगी म्हणती, “गाय आमुची माय”
सस्त्यामंधी दूध मागती अन फुकटामंधी साय
लेकरु माह्य उपाशी; अन थ्ये तुपाशी खाय...!!
गोभक्तांनो! विकत घ्याव्या, तुम्हीच भाकड गायी
कसाब देतो त्याच्या दसपट, करुनिया भरपाई
गोवंशाला ‘अभय’ द्यावया, ह्यो एकच इलाज हाय...!!
- गंगाधर मुटे ‘अभय’
---------------------------------------------------------

वाचने
3612
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
प्रतिक्रिया
मर्मभेदी!
सर्वच कविता सुरेख पण त्यातही,
गोभक्तांनो! विकत घ्याव्या, तुम्हीच भाकड गायी कसाब देतो त्याच्या दसपट, करुनिया भरपाईजबाब नही!!
In reply to सुरेख by पिवळा डांबिस
++++११११
In reply to सुरेख by पिवळा डांबिस
दसपट नाही तरी तेवढीच किंमत द्यावी गाई आणि बैलांनापण. तेवढे देखील पुरे.
विचार फारच चांगला आणि वेगळा..
सुंदर
पटलं :)
आता समजलं! उद्या माणसं भाकड झाल्यावर त्यांना कुठल्या कसाबाकडे नेणार ते पण सांगा!
In reply to बरोबर! by बोका-ए-आझम
काही भाकड माणसांना सरकारी तिजोरीतून पेन्शन वगैरे असते. गायींना केव्हा पेन्शन लागू करणार ते आधी सांगा! ;)
In reply to पेन्शन by गंगाधर मुटे
एक नंबर... :D
In reply to बरोबर! by बोका-ए-आझम
मी काय म्हणतो, जो न्याय गाईला तोच कोंबडी- बकराला व पाना-फळांना व झाडांनाही का नसावा?
संवर्धन हे झालच पाहिजे..
फुक्कट चोखू, ढोंगी म्हणती, “गाय आमुची माय” सस्त्यामंधी दूध मागती अन फुकटामंधी साय लेकरु माह्य उपाशी; अन थ्ये तुपाशी खाय...!!आपलच नाही, या गडबडीत गाईच लेकरुही उपाशीच मरत साल..
आवडली..
फुक्कट चोखू, ढोंगी म्हणती, “गाय आमुची माय”
सस्त्यामंधी दूध मागती अन फुकटामंधी साय
लेकरु माह्य उपाशी; अन थ्ये तुपाशी खाय...!!
हे बेस्टच
वाह!