मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गोवंशाला अभय द्या : नागपुरी तडका

गंगाधर मुटे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
गोवंशाला अभय द्या...!!

बाता नोको फ़फ़लू बापू, दुभतं करुन पाह्य
तवा तुले माहित पडंन, काह्यले म्हंते गाय....!!

शेणपुंजा, दूध-दोह्यनं, मनके कड़कड़ करते
गोधन चारु चारु राज्या, मांड्या- पोटर्‍या भरते
तरीबी अमुच्या भगुण्याले, तुमचा देव पावत नाय...!!

फुक्कट चोखू, ढोंगी म्हणती, “गाय आमुची माय”
सस्त्यामंधी दूध मागती अन फुकटामंधी साय
लेकरु माह्य उपाशी; अन थ्ये तुपाशी खाय...!!

गोभक्तांनो! विकत घ्याव्या, तुम्हीच भाकड गायी
कसाब देतो त्याच्या दसपट, करुनिया भरपाई
गोवंशाला ‘अभय’ द्यावया, ह्यो एकच इलाज हाय...!!

                                      - गंगाधर मुटे ‘अभय’
---------------------------------------------------------




वाचने 3612 वाचनखूण प्रतिक्रिया 13

पिवळा डांबिस Wed, 02/04/2015 - 02:33
सर्वच कविता सुरेख पण त्यातही,
गोभक्तांनो! विकत घ्याव्या, तुम्हीच भाकड गायी कसाब देतो त्याच्या दसपट, करुनिया भरपाई
जबाब नही!!

In reply to by पिवळा डांबिस

हाडक्या गुरुवार, 02/05/2015 - 23:27
दसपट नाही तरी तेवढीच किंमत द्यावी गाई आणि बैलांनापण. तेवढे देखील पुरे.

बोका-ए-आझम Fri, 02/06/2015 - 20:04
आता समजलं! उद्या माणसं भाकड झाल्यावर त्यांना कुठल्या कसाबाकडे नेणार ते पण सांगा!

In reply to by बोका-ए-आझम

गंगाधर मुटे Sun, 02/08/2015 - 00:03
काही भाकड माणसांना सरकारी तिजोरीतून पेन्शन वगैरे असते. गायींना केव्हा पेन्शन लागू करणार ते आधी सांगा! ;)

In reply to by बोका-ए-आझम

शैलेन्द्र Sun, 02/08/2015 - 12:29
मी काय म्हणतो, जो न्याय गाईला तोच कोंबडी- बकराला व पाना-फळांना व झाडांनाही का नसावा? संवर्धन हे झालच पाहिजे..

शैलेन्द्र Sun, 02/08/2015 - 12:31
फुक्कट चोखू, ढोंगी म्हणती, “गाय आमुची माय” सस्त्यामंधी दूध मागती अन फुकटामंधी साय लेकरु माह्य उपाशी; अन थ्ये तुपाशी खाय...!!
आपलच नाही, या गडबडीत गाईच लेकरुही उपाशीच मरत साल..

खंडेराव Tue, 03/24/2015 - 14:35
आवडली.. फुक्कट चोखू, ढोंगी म्हणती, “गाय आमुची माय” सस्त्यामंधी दूध मागती अन फुकटामंधी साय लेकरु माह्य उपाशी; अन थ्ये तुपाशी खाय...!! हे बेस्टच