फिनलंडमधील पुढील शैक्षणिक वर्षापासून, कर्सिव हस्तलिपी (cursive handwriting) हा शैक्षणिक घटक, बाद होणार असून, त्याजागी शाळांना (किबोर्ड/टचपॅड वर ) टेक-टायपिंग चा पर्याय देण्यात येणार आहे. हा बदल अमेरिकेतील काही राज्यांनी त्यांच्या शैक्षणिक 'मध्यवर्ती मूल्यात'(core-values) मधे केलेल्या बदलामागोमाग फिनलंडमध्येसुद्धा येवू घातला आहे. शैक्षणिक मंडळाने सुचवलेला हा बदल, अधिकृतपणे २०१५ च्या शरदऋतूपासून कदाचित अमलात येईल असा अंदाज आहे. 'उत्कृष्ठ टायपिंग हे राष्ट्रीय उत्पादकता कौशल्यांचा ऐक महत्वाचा घटक आहे', असा, काही शैक्षणिक मंडळांच्या सदस्यांचा विश्वास आहे. अमेरिकेमध्ये सप्टेंबर २०१३ मधे असा बदल पहिल्यांदा सुचवण्यात आलेला, आणि मग ४३ राज्यांनी (२०१४ च्या आकडेवारीनुसार) सुरुवात केलेली आहे. काहींनी याला विरोध, तर काहींनी पाठींबा दिला. काहींच्यामते 'हाताने लिहिणे महत्वाचे, त्यासाठी कर्सिवमधेच लिहिले पाहिजे हा अट्टाहास नको'. काही भाषातज्ञाच्या मते, किमान 'कागदाच्या ऐका चिटोर्यावर तुम्ही पेन्सिल/पेनाने खरडलेला मजकूर, वाचणार्याला समजायला हवा' , यामध्ये 'वाचणार्याला समजणे' हे महत्वाचे, तुम्ही ते कर्सीलिपीत लिहिता कि साध्या, हे नाही. लेखन करताना किती सुवाच्य, सुंदर, विशिष्ठ स्टाइलने लिहिता हे महत्वाचे नसून, किती स्वयंचलित सहजतेने (Automaticity) लिहू शकता याला आहे, कारण यामध्ये, लिहिण्याच्या पद्धतीपेक्षा, योग्य मेसेज लिहिण्यासाठी मेंदूची जास्त क्षमता वापरता येईल, (अक्षरी रचनेपेक्षा, संवादातील स्पष्टतेवर मेंदूची जास्त क्षमता वापरता येईल), आणि टेक-टायपिंगमुळे हे सहज साध्य करता येवू शकेल. शिवाय टेक-टायपिंग हे कर्सिव हस्तलिपीच्या तुलनेत, खूपच कमी वेळात मुलांना शिकवता येईल, आणि वय ८ वर्षापर्यंतची मुले कर्सिवलिहिण्यापेक्षा टेक-टायपिंग लवकर आत्मसात करतात. सध्याच्या युगातील उदयोन्मुख विचारानुसार शैक्षणिक संस्थांचा भर हा पुस्तकी अभ्यासक्रमाबाहेरील कौशल्यांवर (जस की सहयोग (collaboration ), धैर्य (grit), चिकाटी, संगीत, सृजनशीलता, समस्या-निराकरण) सुद्धा बराच अवलंबून आहे, आणि यामध्ये तंत्रज्ञानाची कास धरायला हवी. 'शालेयजीवनात शिकण्यासारख्या एवढ्या गोष्टी आजूबाजूला असताना, विद्यार्थ्यांच्या जीवनातील बराचसा मूल्यवान कालावधी, पानांच्या थप्प्याच्या थप्या, वह्यांची चळतच्या चळत, गिरगटवण्यात का वाया जावा', हे अनाकलनीय आहे. शेवटी संशोधनाअंती हेच सिद्ध झालंय की, मुलांना एखाद्या गोष्टीत गम्मत वाटत असेल, आवड असेल तरच ती गोष्ठ, ते उत्कृष्ठपणे शिकतात.
आता हे सर्वस्वी तुमच्या निरीक्षणावर अवलंबून आहे की, तुम्हाला मुले टचपॅड हाताळताना जास्ती आनंदी दिसतात, का कर्सिव लिहिताना !
वाचने
12669
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय स्वागतार्ह निर्णय!
बरर्र मग ?
काय बोलावं हे कळेनासं झालय.
काळाबरोबर चालायला काहीच हरकत
हस्ताक्षर हे लहानपणी चांगले
In reply to काळाबरोबर चालायला काहीच हरकत by असंका
>>व्यवस्थितपणाची सवय लागणे
In reply to हस्ताक्षर हे लहानपणी चांगले by रेवती
(नुसते शाई पेन नाही, त्याला
In reply to हस्ताक्षर हे लहानपणी चांगले by रेवती
व्यवस्थितपणा हा संगनकीय
In reply to हस्ताक्षर हे लहानपणी चांगले by रेवती
@व्यवस्थितपणा हा संगनकीय लिखानात ही महत्वाचा आहे.
In reply to व्यवस्थितपणा हा संगनकीय by वगिश
माफ करा
In reply to काळाबरोबर चालायला काहीच हरकत by असंका
होय....पण मग त्याचं काय?
In reply to माफ करा by वेल्लाभट
म्हणूनच तर म्हटलं... :)
In reply to होय....पण मग त्याचं काय? by असंका
:-)
In reply to माफ करा by वेल्लाभट
असं कसं?
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
निर्जीव गोष्टींना लिंगप्रत्यय
In reply to असं कसं? by वेल्लाभट
ही एक
In reply to निर्जीव गोष्टींना लिंगप्रत्यय by बॅटमॅन
कोटिच्या कोटि उड्डाणे!
In reply to ही एक by नाखु
जे जे सोपं आणि उपयोगी ते
माणूस शेपटी वापरायची विसरला, अन
कर्सिव्ह लिहा की आणि कसं,
वळणदार हस्ताक्षराने, काय नंबरप्लेटा रंगवायच्या का आता ?
>>वळणदार हस्ताक्षराने, काय
In reply to वळणदार हस्ताक्षराने, काय नंबरप्लेटा रंगवायच्या का आता ? by पगला गजोधर
अक्षरी रचनेपेक्षा, संवादातील
या न्यायाने निरक्षर
In reply to अक्षरी रचनेपेक्षा, संवादातील by संदीप डांगे
असा निष्कर्ष काढत असाल तर मग
In reply to या न्यायाने निरक्षर by असंका
आपल्या लक्षात नाही आलं...ते
In reply to असा निष्कर्ष काढत असाल तर मग by संदीप डांगे
तुम्ही अपवादाला नियम म्हणत
In reply to आपल्या लक्षात नाही आलं...ते by असंका
साक्षर निरक्षर वाद आलाच कुठून
In reply to तुम्ही अपवादाला नियम म्हणत by संदीप डांगे
सहमत!
In reply to साक्षर निरक्षर वाद आलाच कुठून by असंका
पण निरक्षर मानवजातीनेच हस्तलिखाणाचा शोध लावला नं ?
In reply to असा निष्कर्ष काढत असाल तर मग by संदीप डांगे
प्रतिसाद आवडला
In reply to अक्षरी रचनेपेक्षा, संवादातील by संदीप डांगे
कातळ, भुर्जपत्रेे,कागद अन आता
In reply to अक्षरी रचनेपेक्षा, संवादातील by संदीप डांगे
@ डांगे साहेब "मेंदूच्या
In reply to अक्षरी रचनेपेक्षा, संवादातील by संदीप डांगे
+१
In reply to @ डांगे साहेब "मेंदूच्या by सुबोध खरे
गंमत आठवली
काळाबरोबर गोष्टी बदलायच्याच!
हस्तलेखन, टंकन, हँडरायटिंग रिकग्निशन आणि पुढे...
मला शाळेत कर्सिव शिकवलं होतं.
आम्हाला शिकवलेलं नाही
अश्या अक्षराचे वर्णन आमचे
In reply to आम्हाला शिकवलेलं नाही by वेल्लाभट
चेंज इज इनेविटेबल. कशाला
मोबाईल घ्यायला गेलो होतो.
काळंबेरं कशाला?
In reply to मोबाईल घ्यायला गेलो होतो. by वेल्लाभट
चालतो की
In reply to काळंबेरं कशाला? by पैसा
हे बरं आहे!!! मायला!! मी
हा हा.. हा धडा बारावीलाच
In reply to हे बरं आहे!!! मायला!! मी by कैलासवासी सोन्याबापु
तुम्ही ELECTRONICS वाले का?
In reply to हे बरं आहे!!! मायला!! मी by कैलासवासी सोन्याबापु
नाही हो मी कंप्यूटर साइंस
In reply to तुम्ही ELECTRONICS वाले का? by वगिश
मेंदूच्या मुलभूत विकासासाठी
मेंदूच्या मुलभूत विकासासाठी प्रत्यक्ष हस्तकला प्रचंड आवश्यक आहे आणि याला काहीही पर्याय असूच शकत नाही. हा मुद्दा आहे.या मुद्द्याला जीवशास्त्रिय पुरावा नाही. मानवाने वेद-उपनिषदे, इ लेखन करायला सुरुवात होण्याच्या आधी निर्माण केली आणि काही हजार वर्षे केवळ पाठांतर/मौखीक पद्धती वापरून भूर्जपत्रांवर लिहीण्याची प्रथा येईपर्यंत बर्याचश्या प्रमाणात सुव्यवस्थित ठेवली. शिकताना आपण वारंवार वापरलेल्या गोष्टी/पद्धती सहाजिकपणे नंतर आपल्या अंगवळणी पडतात, सोप्या वाटतात आणि त्यांच्याशी आपली जवळीक निर्माण होते. अश्या रितीने निर्माण झालेल्या पूर्वग्रहावर मात करून, केवळ नविन गोष्टींकडेच नाविन्याने/अलिप्तपणे पाहणे नाही तर परिचयाच्या गोष्टींकडेही तसेच पाहणे, हे आपले शिक्षण/प्रगती पुढे चालू राहण्यासाठी आवश्यक असते... यालाच "आऊट ऑफ बॉक्स" विचार करणे म्हणतात.हातानी लिहिलेलं दिर्घ काळ
मला मराठी आणि इंग्रजीमधे
In reply to हातानी लिहिलेलं दिर्घ काळ by कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमत
In reply to हातानी लिहिलेलं दिर्घ काळ by कॅप्टन जॅक स्पॅरो
डोळ्यांसाठी त्रास
तुम्ही डॉक्टर आहात?
In reply to डोळ्यांसाठी त्रास by आजानुकर्ण
असं कुठं म्हटलंय?
In reply to तुम्ही डॉक्टर आहात? by वेल्लाभट
वरील सर्व प्रतिसाद वाचले,
सहमत
कॅलीग्राफी
कैलीग्राफी बद्दल मला पण
In reply to कॅलीग्राफी by पगला गजोधर
शॉर्टह्यांड ?