मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विकावी म्हणतोय लुना…

चुकलामाकला · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
या 'मुक्तकांना' प्रस्तावानेची गरज भासू नये असे वाटते . सर्व प्रतिक्रियाकाराना ही सादर अर्पण ! यात मिपाकरांनी अजून भर घालावी ही नम्र विनंती . _/\_ खिळखिळीत झाली सीट लिफ़्टा देऊन पोरींना जुनी झाली आता, विकावी म्हणतोय लुना… धुक्यामध्ये ताम्हिणीच्या घाटात जायचं टाळतो आजकाल टेनिस सोडून बाकी खेळ खेळतो … ओळखलत का म्याडम मला पावसात आला कोणी पावसकर म्याडमच्या तेव्हा डोळा आले पाणी … बिबळ्या कधी कुणाला फुकाफुकी दिसतो? निसर्गाचा कॉल येताच मी कात्रज गाठतो… एक होता गवई तो येताजाता लसूण खाई गुरू कोण त्याच्या, तर म्हणे ठकार बाई …

वाचने 21201 वाचनखूण प्रतिक्रिया 75

पैसा 04/02/2015 - 11:25
कहर आहे! ते गाडीत बसलेलं मांजर कुठे गेलं म्हणे?

बबन ताम्बे 04/02/2015 - 11:34
यात "नाचणारी लिफ्ट" पण येऊ द्यात. :-)

In reply to by चुकलामाकला

बबन ताम्बे 04/02/2015 - 14:17
बाय द वे, तो सकाळ मुक्तपिठ मधील कॉमेंटमधे उच्छाद घालणारा वेगळा विदर्भवादी बबन मी नव्हे. :-)

In reply to by बबन ताम्बे

बॅटमॅन 09/10/2015 - 15:04
यावरच्या प्रतिक्रिया अवश्य वाचाव्यात. अदनान सामी नामक आयडीची कमेंट- "हाजी अलीला साकडे घालायचे, मुझ को भी तू लिफ्ट करा दे." =))

In reply to by जेपी

चुकलामाकला 05/02/2015 - 14:56
एक सफारी द्या मज आणुनी ,जपेन मी ती स्वप्राणानी रोज रात्री घेऊन जाईन , पार्क कराया राजस्थानी

अरुण मनोहर 04/02/2015 - 13:01
वेगळा विदर्भ झालाच पाहिजे...

स्पंदना 04/02/2015 - 14:01
हे बघा! जर लुना विकली तर आर नाही तर पार व्हाव लागेल हे लक्षात घ्या. उगा येथे आमच्या बैलगाडीत बसायच, आणि लुनाचे गोडवे गायचे चालायच नाही काय? आणि अमच्या ढवळ्या पवळ्याच्या चालीबद्द्ल तर एक सुद्धा कमेंट ऐकुन घेतली जाणार नाही. आता उगा बैलगाडीमागन पळताय म्हणुन आधीच सांगीतल. आमच्य अगाडीचा बावकडा धरुन लुनावर बसलायसा ते ठिक, पण उद्या गाडीत शीट मिळवुन मग लुना लुना करायच नाही.

नाखु 04/02/2015 - 14:09
मिपा एक विद्यापीठ वाचकांचं फेक गुळ्पीठ प्रसादाचं नेक थालीपीठ शिल्लक ते (च) ते मुक्तपीठ. मिपा एक विद्यामंदीर! त्यातला एक लहान्सा उंदीर !

बॅटमॅन 04/02/2015 - 19:11
विकावी म्हणतोय लुना लाविला मजसि चुना झालो चारहजारी उणा फजिती सांगू अहो कुणा....

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 04/02/2015 - 19:20
(चालः सुंदरा मनामधे भरली) विकावी म्हणतोय लुना, लावला चुना, चारहजारी उणा, झालो बेभान गड्या हौस नाही सरली, लुना फिरली, म्हणोनी जिरली, कुणाची सांग

In reply to by चुकलामाकला

नाखु 05/02/2015 - 12:41
खरा यजमान ! पावन्यांच्या "रेशीपी" ला मनापासून स्वागत करणारा ! एक्डाव भेटाव लागेल न चुकता-माकता. स्वगतः या बॅट्याचं काय कराव आता !! कहर आहे नुसता !

मुक्त विहारि 05/02/2015 - 03:34
बादवे, अमेरिका वासी बालमोहन, ह्यांना अनुल्लेखाने मारलत की, विसरलात, की......?

अर्धवटराव 05/02/2015 - 06:48
मीपाशी आम्हि इतकं डिस्क्स्नेक्ट व्हावं ना...एक अक्षर कळलं तर शपथ. काय कविता, काय प्रतिसाद..सगळं डोक्यावरुन गेलं :(

श्रीरंग_जोशी 05/02/2015 - 07:09
वाह. खासंच जमलंय. मराठी साहित्यविश्वात नवे आयाम प्रस्थापित करणार्‍या या लेखाला प्रकाशित होऊन नुकतीच दोन वर्षे होऊन गेली. महागात पडलेलं स्त्रीदाक्षिण्य रसिकांसाठी काही संबंधित दुवे.

चुकलामाकला 05/02/2015 - 14:06
धार जेव्हा सोलकडीची माझिया वाटी पडे याद येती हालणारी चालणारी अमसुले

गणेशा 05/02/2015 - 15:44
ओळखलत का म्याडम मला पावसात आला कोणी पावसकर म्याडमच्या तेव्हा डोळा आले पाणी …
भारी लाईन्स. बाकी मुक्तक खुपच मुक्त झालेत :)

जेपी 05/02/2015 - 15:50
हाफशेंच्युरी निमीत्त धागाकर्ते श्री.चुकलामाकला आणी सर्व प्रतिसादकर्त्यांचा सत्कार एक एक लुना आणी मांजर देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक -जेपी आणी तमाम कार्यकर्ते

In reply to by गणेशा

श्रीरंग_जोशी 06/02/2015 - 06:35
४००० रुपये उसने मागणार्‍या तरुणीसोबत कॉफी पिण्याची संधी. अट एकच लुना घेऊन विद्यापीठाच्या आवारातून बाहेर पडायचं.

बोका-ए-आझम 09/10/2015 - 13:48
या लेखाची लिंक मिळेल का? बाकी मुपीवरच्या बाजार उठवणा-या प्रतिक्रियांचा जवाब नाही!

मांत्रिक 10/10/2015 - 07:56
On 23/05/2013 02:08 PM स्वाती ठकार said: मी पण सायकल चालवते ... ती पण एका चाकावर... प्रचंड वेगानी जाते मी... धुळीचे लोट उडवत... एका हातात तलवार तर दुसर्या हातात पिशवी आणि पिशवीत चिकन.. तोंडात राजभोग.. अश्या अवतारात मी सायकल हाणते आणि हुंदके देते जोरात. आणि कोणी काहीही म्हणाले तरी मी अशीच राहणार.
सायकलच्या प्रसिद्ध लेखावर स्वाती ठकारची अफाट प्रतिक्रिया! कहर आहेत या बाई!

In reply to by बोका-ए-आझम

मांत्रिक 10/10/2015 - 10:28
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=http://72.78.249.126/esakal/20130522/4765173718473397374.htm&ved=0CCYQFjADahUKEwiI15yrjrfIAhXVBI4KHYe2D6Q&usg=AFQjCNFFOjdr71Na-GLHZvXq8Z8W-YLnHA ही घ्या लिंक. आज पहिल्यांदाच प्रयत्न करतोय दुवा द्यायचा. बघा बरोबर आहे का? बाकी या बाईंचं बरंचसं कर्तृत्व उडवण्यात आलंय बहुतेक. कहर कहर होत्या या बाई.

बोका-ए-आझम 10/10/2015 - 18:48
धन्यवादच होत्या या बाई! पोपा मॅडम पण कोपरापासून _/\_

In reply to by हेमंत लाटकर

बोका-ए-आझम 10/10/2015 - 19:55
या दिवशी तो जागतिक दर्जाचा लेख प्रकाशित झालेला आहे. ही घटना कधी घडली ते ब्रम्हदेव आणि ब्रम्हे यांनाच ठाऊक!