मेक्सिको: भाग २ : सफरीची सुरुवात - मेरिदा
भाग १: प्रस्तावना
मेक्सिको विस्ताराने मोठा देश असल्याने एका कोप-यातून सुरुवात करून मग मध्य भागाकडे प्रवास केला. युकेतान द्विपकल्प हा मेक्सिकोचा दक्षिण-पूर्व कोपरा. हा संपूर्ण विभाग भूगर्भीय गुहा, भूमिगत तळी व नद्या अशा जगावेगळ्या वैशिष्ट्यांनी नटलेला आहे. हवामान ऊष्ण-दमट, झाडी बरीच, तीन बाजूंनी चंदेरी वाळूचे कॅरिबिअन किनारे... पूर्वापारचे माया लोकांचे घर.
आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेली दोन मोठी शहरे, मेरिदा व कॅनकून. मेरिदा हे सर्वाधिक माया वंशाचे लोक असलेले शहर आहे, 'त:हो' (T'ho) या मूळ मायन नावाची ही मायानगरी. कॅनकून हे मायामी, हवानाच्या कुळातील 'वाईल्ड पार्टी टाऊन'; निराळ्या अर्थाने 'माया'नगरी! सहलीचा उद्देश वेगळा असल्याने कॅनकूनच्या वाटेला गेलो नाही. जगातील नविन सात आश्चर्यांपैकी 'चिचेन ईत्झा' चे पिरॅमिड म्हणजे या प्रदेशाचे हृदय. मेरिदा पासून सुरुवात करून पुढे या विभागातील महत्वाच्या जागा 'ऊश्माल', 'कबा', 'चिचेन ईत्झा', 'तुलुम' ची सफर व कॅनकूनबद्दलही थोडी माहिती.
वाचने
5470
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
दमदार सुरुवात ! प्राचीन संस्कृतीच्या खुणांच्या प्रतिक्षेत.
पुभाप्र
हॉटेल काय मस्त आहे हो!
शासकीय इमारत, गव्हर्नर निवास, व राहते हॉटेल यांच्या कमानीतील सारखेपणा लक्षात येतो. क्षणभर जुन्या भारतीय इमारतींची आठवण झाली.
खूप छान फोटो..
गर्दी नसलेला स्वच्छ रस्ता, आकर्षक बांधणीचे सुरेख कोरीवकाम असलेले कॅथीड्रल, दिलेला आगळावेगळा लालसर नारिंगी रंग अशा गोष्टी आवडल्या.
बहुधा स्पॅनिश बोलली जात असेल. अमेरिकेच्या सान्निध्यामुळे इंग्रजी चालते का? नाहीतर स्पॅनिश बोलता न येणार्यांची आम्हासारख्यांची पंचाईतच. जेवणाखाण्याचे, राहाण्याचे दर किती महाग आहेत, फसवाफसवी कितीशी आहे ते कृपया पुढील भागात आले तर आनंद होईल. तरी सुरेख लेखन आणि प्रकाशचित्रे. गव्हर्नर महालातले चित्रदालन फारच सुंदर
मस्त!ती लाल सरकारी इमारत ,हिरवळ आणि आकाश दिसणारा फोटो फार सुंदर आलाय.पुभाप्र.
व्वा व्वा व्वा!!! कित्ती छान छान! :HAPPY:
म्युरलवरच्या लेखाची वाट बघत आहे. दिएगो रिव्हेरा आणि त्याची पत्नी/सखी फ्रीदा कालो यांनी मेक्सिकन म्युरल्सना जागतिक प्रतिष्ठा मिळवून दिली हा ऐतिहासिक संदर्भ सोडला तर म्युरल्सबद्दल एक कलाप्रकार म्हणून फार कमी माहिती आहे. तुमच्या लेखातून ती माहिती मिळेलच अशी खात्री आहे!
वाचत आहे .. पुभाप्र
दमदार सुरुवात ! प्राचीन