बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका
बायल्यावाणी कायले मरतं? मर्दावाणी मरं!
सरणावरुन उठ... आनं... मशाल हाती धर ...!!
तुह्यावाणी लाखो मेले... काही फ़रक पडला?
येथे सारे निगरगट्ट ... काही बदल घडला?
त्यायच्यावाणी तू बी... फ़ुक्कट जाशीन मरून
संसाराची धूळधान... व्हईन आणखी वरून
लढल्याबिगर मोक्ष नाय.. कृष्णवचन स्मर ...!!
कर्जपाणी, घेणंदेणं... आता चिंता सोड
आला दिवस तसा... मानून घे तू गोड
कुणी आला ’यम’ दारी... शब्द त्याचे छाट
“पिकलं तवा लुटलं”... झालं फ़िट्टमफ़ाट
धमन्यामंधी बारुद भर... आनं... आवाज मोठा कर ...!!
जेव्हा पाय चालणारा... रस्ता जातो खुटून
श्वासाभरल्या विचारांचा... धागा जातो तुटून
तेव्हा तरी निग्रहाने... विवेकाला स्मर
ज्यांनी केली दुर्गती... त्यांची यादी कर
एकटा नको मरू... संग... दहा घेऊन मर ...!!
कायदा तुह्या विरोधात... ’अभय’ नाही तुले
म्हूनशान लढले भाऊ.... शरद जोशी - फ़ुले
तुह्यी हाक घेण्यासाठी... सरकार मूकं-बह्यरं
आपण सारे मिळून लढू... करू त्याले सह्यरं
लुटारुंचे रचू थर... आनं... नाचू गच्चीवर ...!!
- गंगाधर मुटे ’अभय’
------------------------------------------------------
In reply to व्वा! by विटेकर
In reply to मस्तंय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सहमत!! by चुकलामाकला
In reply to उचित अन झणझणीत कविता..! by सस्नेह
In reply to ओ अनहिता by विटेकर
In reply to मुटे साहेब by विटेकर
ज्यांनी केली दुर्गती... त्यांची यादी कर एकटा नको मरू... संग... दहा घेऊन मर ...!!
In reply to शेतकर्यांना तुमच्या सारख्या by काळा पहाड
In reply to मुटे साहेब by विटेकर
लुटारुंचे रचू थर... आनं... नाचू गच्चीवर ...!!काय डोळ्या समोर चित्र येत नाही हो. लुटारू म्हणजे सावकार गव्हर्मेंट म्हट्ले तर त्यांचे थर कुठे लावणार? गच्चीवर की थरावरून गच्चीवर जाणार?
In reply to लुटारुंचे रचू थर... आनं... by काळा पहाड
In reply to गच्ची म्हणजे मान, गळा. by संदीप डांगे
In reply to स्त्रीत्वाशी संबंध नाही. by गंगाधर मुटे
In reply to स्त्रीत्वाशी संबंध नाही. by गंगाधर मुटे
In reply to शब्दांच्या कितीही कोलांटउड्या by संदीप डांगे
In reply to सर्वप्रथमः बायकांना by गवि
In reply to कविता अथवा लेखनात असे by बाळ सप्रे
In reply to इथे कवी हे पात्र शेतकरी या by गवि
In reply to प्रथमवचनी शैली म्हणजेच ते by बाळ सप्रे
प्रथमवचनी शैली म्हणजेच ते शब्द/विचार तुमचे स्वतःचे असताततृतीय किंव अन्य कोणत्याही वचनी शैलीतही ते लेखकाचेच विचार असतात. इथेही कवी हा एक पात्रच आहे हे मी अधोरेखित करु इच्छितो. हा अग्रलेख किंवा एखाद्या समितीचा शिफारस अहवाल किंवा न्यायालयाचे निकालपत्र नाही की ज्यामधे बॅलन्स साधला जावा. सारवासारवीलाच माझा विरोध आहे. जे लिहिलं त्या शब्दाच्या योग्यतेविषयी कारणमीमांसा करावी. शब्दाचा अर्थ तसा अभिप्रेत नव्हता असं नंतर म्हणणं हा योग्य डिफेन्स नव्हे हे मान्यच आहे.
In reply to आक्षेपार्ह काय आहे? by प्रभाकर पेठकर
In reply to स्त्रीसुलभ हालचाली/दिसणे by बाळ सप्रे
In reply to शारीरिक अक्षमताच भितीचे कारण... by प्रभाकर पेठकर
In reply to आक्षेपार्ह काय आहे? by प्रभाकर पेठकर
In reply to आक्षेपार्ह काय आहे? by प्रभाकर पेठकर
त्यामुळे 'बायल्या' ह्या शब्दप्रयोगाने कांही आभाळ कोसळलं नाही. असे शब्दप्रयोग तीव्रतेने खटकावेत असे नाहीत. हल्ली स्त्रीयांना कोणीच कमी लेखत नाही, लेखू नये. समानतेच्या ह्या काळातही कांही असमानताही राहणारच.
पेठकरांशी सहमत आहे. स्त्रीवर्गाचा आई-बहिणींचा पूर्ण आदर राखुनही ' केवळ' एखाद्याला बायल्या म्हणल्याने त्यामुळे समस्त स्त्रीजातीचा किंवा स्त्रीत्वाचा अवमान होत नाही. In reply to त्यामुळे 'बायल्या' ह्या by विशाल कुलकर्णी
In reply to कारण पुरुषाने पौरुष्य विसरणे by विशाखा पाटील
In reply to कारण पुरुषाने पौरुष्य विसरणे by विशाखा पाटील
राहता राहिला मुद्दा, टार्गेट ग्रुपचा. ही कविता फक्त शेतकरी पुरुषांसाठी आहे हे मान्य असलं तरी जे चुकीचे समज समाजात आहेत, त्यालाच पुन्हा अधोरेखित केले आहे. तो शेतकरी घरातल्या बाईला एरवी म्हणतोच, 'तुले काय कळते! मी मर्द हाये, गप बस...' त्याच्या पुरुषी अहंकाराला अजूनच हवा.हे सर्व शतप्रतिशत बरोबर. पण साहित्य हा समाजाचा आरसा असतो. साहित्यात समाजाचं प्रतिबिंब दिसतं. ते प्रतिबिंब बोचरं करुन चुका सर्वांना दाखवून देणं हा भाग साहित्य / कलाकृतीतून करता येतो. पण जे काही समाजात सध्या दुरित अप्रिय अयोग्य आहे ते साहित्यात टाळून किंवा उलट प्रकारे दाखवून समाज बदलेल अशी अपेक्षा म्हणजे कोंबडं झाकून सूर्य न उगवण्याची अपेक्षा आहे. इथे केवळ स्त्रीला दिला जाणारा कमीपणा अधोरेखित होऊ नये म्हणून "बायल्यावाणी काय मरतोस?" या नेटिव्ह रचनेऐवजी "भित्र्या व्यक्तीप्रमाणे काय मरतोस?" किंवा "पळपुट्या स्त्री अथवा पुरुषाप्रमाणे काय मरतोस?" किंवा "शूरवीर मानवाप्रमाणे ऊठ" "धाडस असलेल्या स्त्री अथवा पुरुषाप्रमाणे ऊठ" असं म्हणण्याला काय साहित्यिक अर्थ राहील?
In reply to राहता राहिला मुद्दा, टार्गेट by गवि
"बायल्यावाणी काय मरतोस?" या नेटिव्ह रचनेऐवजी "भित्र्या व्यक्तीप्रमाणे काय मरतोस?" असं म्हणण्याला काय साहित्यिक अर्थ राहील?योग्य शब्दरचना सुचत नाही म्हणून कालबाह्य विचाराच्या शब्दरचनेला "नेटिव्ह" म्हणत किती वेळ धरुन बसणार?? योग्य शब्द सुचणे आणि वापरणे हीच तर खरी प्रतिभा..
In reply to राहता राहिला मुद्दा, टार्गेट by गवि
"बायल्यावाणी काय मरतोस?" या नेटिव्ह रचनेऐवजी "भित्र्या व्यक्तीप्रमाणे काय मरतोस?" किंवा "पळपुट्या स्त्री अथवा पुरुषाप्रमाणे काय मरतोस?" किंवा "शूरवीर मानवाप्रमाणे ऊठ" "धाडस असलेल्या स्त्री अथवा पुरुषाप्रमाणे ऊठ"यात दिलेल्या बाकी शब्दरचना अशा दिल्या अहेत की "बायल्यावाणी काय मरतोस?" हे एकद उजव वाटावं.. आणखी प्रयत्न केल्यास याहून चांगलं नक्कीच सुचेल .. पण ते 'बायल्यावाणी' खटकलं तरच !! e.g. भ्याडावानी काय मरतोस. शूरावानी मर ..
In reply to "बायल्यावाणी काय मरतोस?" या by बाळ सप्रे
In reply to तुम्ही तुमचा मुद्दा उत्तमपणे by गवि
In reply to राहता राहिला मुद्दा, टार्गेट by गवि
तुह्यावाणी लाखो मेले... काही फ़रक पडला? येथे सारे निगरगट्ट ... काही बदल घडला? त्यायच्यावाणी तू बी... फ़ुक्कट जाशीन मरून संसाराची धूळधान... व्हईन आणखी वरून लढल्याबिगर मोक्ष नाय.. कृष्णवचन स्मर ...!! कर्जपाणी, घेणंदेणं... आता चिंता सोड आला दिवस तसा... मानून घे तू गोड *** जेव्हा पाय चालणारा... रस्ता जातो खुटून श्वासाभरल्या विचारांचा... धागा जातो तुटून तेव्हा तरी निग्रहाने... विवेकाला स्मरहे भाग आवडले. पण लढा परिस्थितीबरोबर दिला पाहिजे. माणसांबरोबर नव्हे. बाकीची माणसं शेतकर्याचे शत्रू नसतात तर त्याचेच भाऊ, बहिणी, नातेवाईक असतात. यावेळी शेतकर्यांच्या आत्महत्या हा विषय सोडून कवितेसंदर्भात कवितेतील शब्दयोजना आणि भाषा या इतर विषयावर चर्चा झाल्याचे पाहून आनंद झाला!
In reply to ... by पैसा
बायल्यावाणी कायले मरतं? मर्दावाणी मरं!जर एखादा शेतकरी आत्मह्त्या करणार असेन तर त्याला परावृत्त करण्यासाठी त्याच्या मनाला लागेल असे वाक्य म्हणुन कवीने वरती वाक्यरचना केली आहे, त्या शेतकर्याला परावृत्त करताना फक्त तोच डोळ्यासमोर ठेवुन आपल्या भाषेतील शब्द/वाक्य त्याने बोलले आहे त्यावेळेस .. इअतर समाज्/बाई/माणुस यांचा या वाक्याशी अर्थ लावणे कदाचीत विपर्यास वाटतो. मुळ कविता आणि त्याच्या अर्थापलिकडे फक्त शब्दावरुन आलेले रिप्लाय योग्य वाटत नाहित असो.
In reply to बायल्यावाणी कायले मरतं? by गणेशा
In reply to चांगली चर्चा by गंगाधर मुटे
In reply to तरी अजून मुंटे साहेबांनी by संदीप डांगे
In reply to द्ये ना सोडून भौ by कपिलमुनी
In reply to कायच्या काय ! by डॉ सुहास म्हात्रे
व्वा!