बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका
लेखनविषय:
काव्यरस
बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका
बायल्यावाणी कायले मरतं? मर्दावाणी मरं!
सरणावरुन उठ... आनं... मशाल हाती धर ...!!
तुह्यावाणी लाखो मेले... काही फ़रक पडला?
येथे सारे निगरगट्ट ... काही बदल घडला?
त्यायच्यावाणी तू बी... फ़ुक्कट जाशीन मरून
संसाराची धूळधान... व्हईन आणखी वरून
लढल्याबिगर मोक्ष नाय.. कृष्णवचन स्मर ...!!
कर्जपाणी, घेणंदेणं... आता चिंता सोड
आला दिवस तसा... मानून घे तू गोड
कुणी आला ’यम’ दारी... शब्द त्याचे छाट
“पिकलं तवा लुटलं”... झालं फ़िट्टमफ़ाट
धमन्यामंधी बारुद भर... आनं... आवाज मोठा कर ...!!
जेव्हा पाय चालणारा... रस्ता जातो खुटून
श्वासाभरल्या विचारांचा... धागा जातो तुटून
तेव्हा तरी निग्रहाने... विवेकाला स्मर
ज्यांनी केली दुर्गती... त्यांची यादी कर
एकटा नको मरू... संग... दहा घेऊन मर ...!!
कायदा तुह्या विरोधात... ’अभय’ नाही तुले
म्हूनशान लढले भाऊ.... शरद जोशी - फ़ुले
तुह्यी हाक घेण्यासाठी... सरकार मूकं-बह्यरं
आपण सारे मिळून लढू... करू त्याले सह्यरं
लुटारुंचे रचू थर... आनं... नाचू गच्चीवर ...!!
- गंगाधर मुटे ’अभय’
------------------------------------------------------
बायल्यावाणी कायले मरतं? मर्दावाणी मरं!
सरणावरुन उठ... आनं... मशाल हाती धर ...!!
तुह्यावाणी लाखो मेले... काही फ़रक पडला?
येथे सारे निगरगट्ट ... काही बदल घडला?
त्यायच्यावाणी तू बी... फ़ुक्कट जाशीन मरून
संसाराची धूळधान... व्हईन आणखी वरून
लढल्याबिगर मोक्ष नाय.. कृष्णवचन स्मर ...!!
कर्जपाणी, घेणंदेणं... आता चिंता सोड
आला दिवस तसा... मानून घे तू गोड
कुणी आला ’यम’ दारी... शब्द त्याचे छाट
“पिकलं तवा लुटलं”... झालं फ़िट्टमफ़ाट
धमन्यामंधी बारुद भर... आनं... आवाज मोठा कर ...!!
जेव्हा पाय चालणारा... रस्ता जातो खुटून
श्वासाभरल्या विचारांचा... धागा जातो तुटून
तेव्हा तरी निग्रहाने... विवेकाला स्मर
ज्यांनी केली दुर्गती... त्यांची यादी कर
एकटा नको मरू... संग... दहा घेऊन मर ...!!
कायदा तुह्या विरोधात... ’अभय’ नाही तुले
म्हूनशान लढले भाऊ.... शरद जोशी - फ़ुले
तुह्यी हाक घेण्यासाठी... सरकार मूकं-बह्यरं
आपण सारे मिळून लढू... करू त्याले सह्यरं
लुटारुंचे रचू थर... आनं... नाचू गच्चीवर ...!!
- गंगाधर मुटे ’अभय’
------------------------------------------------------
वाचने
14201
वाचनखूण
प्रतिक्रिया
56
व्वा!
In reply to व्वा! by विटेकर
धन्यवाद सर
मस्तंय
In reply to मस्तंय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद सर
सहमत!!
In reply to सहमत!! by चुकलामाकला
धन्यवाद सर
उचित अन झणझणीत कविता..!
In reply to उचित अन झणझणीत कविता..! by सस्नेह
ओ अनहिता
In reply to ओ अनहिता by विटेकर
विशेष धन्यवाद सर
जोशपूर्ण कविता! स्नेहांकिताशी
मुटे साहेब
In reply to मुटे साहेब by विटेकर
शेतकर्यांना तुमच्या सारख्या
In reply to शेतकर्यांना तुमच्या सारख्या by काळा पहाड
चिंता नको
In reply to मुटे साहेब by विटेकर
पुष्कळ आहेत
लुटारुंचे रचू थर... आनं...
In reply to लुटारुंचे रचू थर... आनं... by काळा पहाड
गच्ची म्हणजे मान, गळा.
In reply to गच्ची म्हणजे मान, गळा. by संदीप डांगे
हां आत्ता उलगडा झाला.
स्त्रीत्वाशी संबंध नाही.
In reply to स्त्रीत्वाशी संबंध नाही. by गंगाधर मुटे
स्प्ष्टीकरणाबद्दल धन्यवाद .
In reply to स्त्रीत्वाशी संबंध नाही. by गंगाधर मुटे
शब्दांच्या कितीही कोलांटउड्या
In reply to शब्दांच्या कितीही कोलांटउड्या by संदीप डांगे
सर्वप्रथमः बायकांना
In reply to सर्वप्रथमः बायकांना by गवि
कविता अथवा लेखनात असे
In reply to कविता अथवा लेखनात असे by बाळ सप्रे
इथे कवी हे पात्र शेतकरी या
In reply to इथे कवी हे पात्र शेतकरी या by गवि
प्रथमवचनी शैली म्हणजेच ते
In reply to प्रथमवचनी शैली म्हणजेच ते by बाळ सप्रे
प्रथमवचनी शैली म्हणजेच ते
अतिशय परखड आणि वास्तव
चर्चेचे स्वागत आहे.
आक्षेपार्ह काय आहे?
In reply to आक्षेपार्ह काय आहे? by प्रभाकर पेठकर
स्त्रीसुलभ हालचाली/दिसणे
In reply to स्त्रीसुलभ हालचाली/दिसणे by बाळ सप्रे
शारीरिक अक्षमताच भितीचे कारण...
In reply to शारीरिक अक्षमताच भितीचे कारण... by प्रभाकर पेठकर
घाबरणे आणि शारिरीक अक्षमता
In reply to आक्षेपार्ह काय आहे? by प्रभाकर पेठकर
+१
In reply to आक्षेपार्ह काय आहे? by प्रभाकर पेठकर
त्यामुळे 'बायल्या' ह्या
त्यामुळे 'बायल्या' ह्या शब्दप्रयोगाने कांही आभाळ कोसळलं नाही. असे शब्दप्रयोग तीव्रतेने खटकावेत असे नाहीत. हल्ली स्त्रीयांना कोणीच कमी लेखत नाही, लेखू नये. समानतेच्या ह्या काळातही कांही असमानताही राहणारच.पेठकरांशी सहमत आहे. स्त्रीवर्गाचा आई-बहिणींचा पूर्ण आदर राखुनही ' केवळ' एखाद्याला बायल्या म्हणल्याने त्यामुळे समस्त स्त्रीजातीचा किंवा स्त्रीत्वाचा अवमान होत नाही.In reply to त्यामुळे 'बायल्या' ह्या by विशाल कुलकर्णी
अवमानाचा प्रश्नच नाही. 'बाई'
ललित लेखनात किंवा कवितेत
कारण पुरुषाने पौरुष्य विसरणे
In reply to कारण पुरुषाने पौरुष्य विसरणे by विशाखा पाटील
+1
In reply to कारण पुरुषाने पौरुष्य विसरणे by विशाखा पाटील
राहता राहिला मुद्दा, टार्गेट
In reply to राहता राहिला मुद्दा, टार्गेट by गवि
"बायल्यावाणी काय मरतोस?" या
In reply to राहता राहिला मुद्दा, टार्गेट by गवि
"बायल्यावाणी काय मरतोस?" या
In reply to "बायल्यावाणी काय मरतोस?" या by बाळ सप्रे
तुम्ही तुमचा मुद्दा उत्तमपणे
In reply to तुम्ही तुमचा मुद्दा उत्तमपणे by गवि
वर ऋशिकेशनेही म्हटल्याप्रमाणे
In reply to राहता राहिला मुद्दा, टार्गेट by गवि
+१
...
In reply to ... by पैसा
+१ अगदी हेच...
बायल्यावाणी कायले मरतं?
In reply to बायल्यावाणी कायले मरतं? by गणेशा
+१ ..
चांगली चर्चा
In reply to चांगली चर्चा by गंगाधर मुटे
आता नका लिहु..... :)
कविता उत्तम
कवीच्या शब्दस्वातंत्र्याबद्दल
तरी अजून मुंटे साहेबांनी
In reply to तरी अजून मुंटे साहेबांनी by संदीप डांगे
द्ये ना सोडून भौ
In reply to द्ये ना सोडून भौ by कपिलमुनी
असं कसं असं कसं
कायच्या काय !
In reply to कायच्या काय ! by डॉ सुहास म्हात्रे
+१ अगदी अगदी.