गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २५
हरं हरं महादेव............................!!!
रणेभेरी वाजू लागतात..मेंदूमधे अनंत विषयांचा कल्लोळ उठतो.. अवघड विषयांचे बुरुज रातोरात पाठांतरांच्या महातोफांनी धडाधड फोडले जातात.संचार-जाणारे जड अध्यायरुपि शत्रू तर हेरून हेरून आणि पिंजून पिंजून ठ्ठार मारले-जातात. सामान्य विषयांची तर फावल्यावेळातंही पाठांतरांचे अश्व चौखूर उधळंवून गाळण-उडवली जाते. अध्यापक-गुरुजि, हे सेनापतिचं रूप धारण करून हल्ल्याची स्थिती आणि गती निश्चित करतात.. कुणी कुठल्या विषयांची आणि कशी मोर्चेबांधणी करावी याचं मार्गदर्शन सुरु होतं. याचं रणंगीतातच वर्णन करायचं झलं...तर.. या बाजूनी तो ही आला,सगळे मिळूनि-तिकडे चाला हत्तीदळांसह मारायाला ,अचानक त्यावर टाकू घाला संचारांचे बुरुज बुलंदी,लावू त्याला भल्या-तोफा मोक्याच्या त्या खुणांमधुनी,सहजी त्यावर आगंचि-ओका नका चुकू रे देऊ जागा,मारुनी टाकू मैदाना ब्रम्ह'ही येता शत्रू म्हणूनी,उडवू त्याची-ही दैना आता मागे फिरायचे ना,शेंडी तुटो वा पारंबी बुद्धीवेदिवर बलिदाना या ,रक्त पडू दे तिजं कुंभी परिक्षेस या जिंकायाचे, हरणे जरीही आले हो मोक्याच्या या-वळणावरती,पुढे पुढे तुज जाणे हो अश्या अवस्थेत सारी पाठशाळा असते,आणि एकंदर महिनाभर कुणाला श्वास घेण्यालाही वेळ नसतो. आहो..घाईघाईत त्याचं धोतर..हा धुतो,आणि ह्याचं तो नेसतो सुद्धा! ( =)) ) आणि मग उगवतो युद्धाचा निर्णायक दिवस...परिक्षेचा...! त्या दिवशी वातावरण असं- सगळी पाठशाळा,ही ढगातून तरंगणार्या कोण्या महालासारखी टेंन्शन्नी हलकी झालेली आहे. गुरुजि..'परिक्षक नावाचा छुपा शत्रू,कधी रणांगणात उतरू पहातोय?', या चिंतेत येरझार्या घालत आहेत. आणि.. विद्यार्थ्यांच्या डोक्यात, 'परिक्षक..आज पहिलं-काय विचारतील?' हा प्रश्न, विवाहोत्सुक तरुणाला वधुवर मेळाव्यात, 'आज नेमकी पहिली(च) समोर येणार-कोण???' ह्या प्रामाणिक-प्रश्नाप्रमाणे,त्याचा अत्यंतिक छळ करत आहे. विद्यार्थीमित्र एकमेकाला 'माझी तेव्हढी तयारी झालेली नाही,पण अमके-तमके अध्याय-दणकून कसे तयार आहेत? याची खरी आणि खोटी,अशी दोन्हीही प्रकारची खात्री देत आहेत. एखाद्या जोरदार परिक्षा देणार्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्याला त्याचे गुरुजि , " दाम्या...गेल्यावेळी सापडला सूर्,आणि अचानक निघाला धूर...असे केलेवतेस...आठवतय ना!?' म्हणून-जागं करत आहेत. तर प्रथमवर्षातली किंवा फक्त नित्यविधी आणि काहि सूक्त तयार झालेली,वय वर्ष ७ ते १० या वयोगटातील बालके, स्विमिंगपूलवर स्पर्धेसाठी-उभं केलेल्या लहान मुलांप्रमाणे हुडहुडी भरलेल्या अवस्थेत परिक्षा-हॉल अगर खोली बाहेर ताटकळत उभी आहेत. अशी ही सगळी अवस्था! मग या युद्धजन्य वातावरणाच्या पार्श्वभूमीवर परिक्षकांचा प्रवेश होतो..आणि,प्रत्यक्ष युद्धभूमीवर (वेगवेगळ्या पाठशाळांमधल्या),सात विद्यार्थ्यांच्या टोळीचा पहिला प्रवेश होतो.. यांची वेद-संहितेची परिक्षा आहे. परिक्षकः- "हं...पाठांतरं केलीयेत ना रे जोरदार?" मुलं:- "होsssssss!" परिक्षकः- "हां...,तसा सोडणार नैय्ये मी कुणाला! ( हॅ..हॅ..हॅ..हॅ..हॅ..!) हम्म्म्म..,म्हणा..उमेश शास्त्री.. म्हणा... तिसर्या अष्टकातल्या साहाव्या अध्यायातील-चवथा अनुवाक.. म्हणा..!!!" उमेशः- "हरि: ओम... " (अशी सुरवात करून, तो उमेश (सोप्पा) बुरुज फोडायला मिळाल्याच्या आनंदात 'चवथा अनुवाक' दणकवतो!) परिक्षकः- ह्म्म..आता सगळ्या संहितेत वायूसूक्त कुठेकुठे आलेलं आहे? ते सांगा..आणि अध्याय व अनुवाकाच्या क्रमांक सांगून म्हणूनंही दाखवा बरं.. (उमेश १/२ उत्तरे बरोबर देतो..आणि मग पुढे तोच प्रश्न पुट-अप झाल्यावर...सुरेश सगळच्या सगळ बरोब्बर सांगतो,आणि म्हणूनंही दाखवतो!) व्वा... सुरेश.., पाठशाळा कोणती हो आपली? (सुरेश नाव सांगतो,एव्हढ्यावरून परिक्षकांना शिकवणारेही कळतात.आणि मग ते..) "हम्म्म...गुर्जि खमके आहेत तुमचे.म्हणून निभावतय.असो! आता...नितिन शास्त्री जरा अस्यवामस्य...या सूक्तातली शेवटून तिसर्या अनुवाकातली खालून पाचवी ओळ म्हणा बरं! नितीनः- (या अचानक झालेल्या हल्ल्यानी बावरून...) अं............. परिक्षकः- काय??? धूसर झालय की काय सगळं? की अचानक-गायब झालय? नितीनः- नाही गुरुजी... (असं म्हणून..योग्य ओळीची सुरवात करत..अख्खा अनुवाक ठणकावतो) परिक्षकः- हम्म्म...उत्तम हो उत्तम.. आता म्हणा.. मधोर्धारामनुक्षर तीव्रः सधस्थमासदः... नितिनः- मधोर्धारामनुक्षर तीव्रः सधस्थमासदः। चारूर्रृताय पीतये॥ परि सुवानो गिरिष्ठा: पवित्रे सोमो अक्षा:। मदेषु सर्वधा असि॥ त्वं विप्रस्त्वं कविर्मधुप्रजात मन्धसः। मदेषु सर्वधा असि॥ परिक्षकः- थांबा थांबा... आता हे मदेषु सर्वधा असि॥ ह्या सूक्तात कितीवेळा आलय? ते सांगा बरं...! नितिनः- ..................... (बाकिचे विद्यार्थी,नित्याची दांडी-गुल झाल्यामुळे माना खाली घालून हसतात..) परिक्षकः- (सगळ्यांना..) हसू नका. हम्म्म, सुनील..आपण सांगा .. सुनीलः- सात! (असा खणखणीत षटकार ठोकून..त्याच आनंदात आणखिही अशीच स्थळं सांगायला जातो..पण परिक्षक त्याला 'ते विचारलं.....की सांगा हं महर्षी!'.. असा खौट्पणे दगड मारतात.. सुनील वरमतो..) इकडे ही रणधुमाळी चालू असतानाच शेजारच्या खोलीत, त्या बालकांची प्रवेश-परिक्षा सुरु होते. परिक्षकः- "हं म्हणा रे आधी सगळ्यांनी चोविस नावे म्हणा.." सगळी बालकं: -"ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः ................." परिक्षकः- "सौर सूक्त कुणाकुणाला येतं???" सगळे:- "मला...मला,..मला!!!" परिक्षकः- "असं का! बरं बरं.. म्हणा मग इथून... उदुत्यं जातवेदसं..." सगळे:- "देवं वहंती केशवः। दृशे विश्वाय सूर्यम्।।" ..( या पुढे म्हणताना,त्यातली काहि मुलं आंग चोरल्यासारखं 'म्हणत' असतात. आणि हे परिक्षकांच्या लक्षात येतं..किंबहुना 'असे कोण आहेत?' हे हेरण्यासाठीच त्यांनी असा सोप्पा-वाटणारा 'गुगली' टाकलेला असतो..) परिक्षकः- "हम्म्म....थांबा थांबा , नामू..तू पुरुषसूक्तातली शेवटून चवथी ऋचा म्हण.." नामू:- "चंद्रमा मनसो जातः चक्षो:सूर्यो अजायता। मुखादिंद्रः श्चाग्निश्च प्राणाद्वायुर जायता॥" परिक्षकः- "आता ही ऋचा,तुझ्या पोथिच्या वरच्या पानावर येते ,की खालच्या ? ते सांग" नामू:- "वरच्या पानावर..खालून आठवी ओळ" परिक्षकः- " हम्म्म...निर्णयसागर'ची प्रत वाट्टं...? असू दे असू दे. हम्म..आता यशवंता.. प्रातःसंध्येचे उपस्थान म्हण..बरं!" यशवंता:- (कावरा बावरा..) ........................... परिक्षकः- "बरं..मग पहिलं मार्जन म्हण." यशवंता:- "ओम..आपोहिष्ठा मयोभुवः । तानऊर्जे दधातना॥ महेरणाय चक्षसे। योवः शिवत मोरसः। तस्यभाजयते हनः॥ उशती रीव मातरः। तस्मा अरंग मामवो । यस्यक्षयाय जिन्वथा॥ अपो जनयथा चनः॥" परिक्षक : -"मग द्वितीय मार्जनात यातलं बदलतं काय..?कसं वेगळं म्हणता तुम्ही? सांगा.." (हा प्रश्न संजू आणि विजय ह्या ८ वर्षीय मुलांना डोक्यावरून जातो. पण नामू परत इथेही षटकार ठोकतो..) नामू:- "ऋचा जोडून येतात.. ओम..आपोहिष्ठा मयोभुवःतानऊर्जे दधातना॥ महेरणाय चक्षसे। योवः शिवत मोरसःतस्यभाजयते हनः॥ उशती रीव मातरः। तस्मा अरंग मामवो यस्यक्षयाय जिन्वथा॥ अपो जनयथा चनः॥" परिक्षकः- "हम्म्म..छान! शाळा कोणति रे तुझी? " नामू:- "परसगाव...जिल्ला-आट्वानी" परिक्षकः- "अस्सं!!! देवसगावकरांच्या शाळेतला काय??? तरीच इतका तयारीचा! आता सगळ्यांनी विष्णू सूक्तातला शेवटचा अनुवाक म्हणा..की..मग झाली तुमची परिक्षा." तर असा हा परिक्षारूपी जिव-लंगं ..तो प्रथम वर्षी माझ्याही आयुष्यात आला... आणि मग मी,गुरुजी आणि बाकिचे सर्व विद्यार्थी, तो परिक्षे आधीचा महिना-फुल्ल तयारी करून..परिक्षा द्यायला निघालो- ते महाराष्ट्राच्या एका महान शहरात... म्हणजे कुठे???? तर ................." ========================== क्रमशः.... मागिल सर्व भागः- भाग-१ .. भाग-२ .. भाग-३ .. भाग-४ .. भाग-५ .. भाग-६ .. भाग-७ .. भाग-८ .. भाग-९ .. भाग-१० .. भाग-११ .. भाग-१२..भाग-१३..भाग-१४..भाग-१५..भाग-१६ .. भाग- १७ (मंगलाष्टक स्पेशल) भाग- १८ भाग- १९ भाग- २० भाग- २१ भाग- २२ भाग- २३ भाग- २४In reply to मी पयला by स्पा
In reply to जबरी लिहिताय बुवा. by प्रचेतस
In reply to जबरी लिहिताय बुवा. by प्रचेतस
संवाद भयानक अवडले.+७८६ अगदी डोळ्यासमोर घडत आहेत घटना असे वाटले ! सुरेख लेखन बुवा :)
In reply to हा पण भाग मस्त.... by मुक्त विहारि
In reply to लेखी म्हणा की तोंडी; जेथे by डॉ सुहास म्हात्रे
(मी दिल्लीला होतो तेव्हा )आमच्या इन्स्टित्युट मध्ये ओपन बुक एक्जॅम्स असायच्या , पुस्तके , नोट्स, चिठ्ठ्या चपाट्या घेवुन परीचपाट्यायेण्याची पुर्ण परवानगी असायची ! पण एकही प्रश्न सिलॅबस मधला पडेल तर शप्पथ ! प्रत्येक प्रश्नावर डोकं आपटायला लागायचं ... तेव्हा कसे बसे पास व्हायचो ! ( ब्यॅट्या सेम कॉलेजातील असल्याने त्याला माझ्या भावना कळतील कदाचित ) असो. नको त्या आठवणी !
In reply to (मी दिल्लीला होतो तेव्हा by प्रसाद गोडबोले
In reply to आमच्या शाळेत गाईड(मार्गदर्शक) by खटपट्या
In reply to आमच्या एका कॉलेजची मला सर्वात by डॉ सुहास म्हात्रे
In reply to (मी दिल्लीला होतो तेव्हा by प्रसाद गोडबोले
In reply to रोचक! by बॅटमॅन
In reply to काय सांगतोस काय ? तुम्हाला by प्रसाद गोडबोले
In reply to लेखी म्हणा की तोंडी; जेथे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to लेखी म्हणा की तोंडी; जेथे by डॉ सुहास म्हात्रे
"वाचा/ऐका/पहा --> स्वतंत्र विचार करा आणि प्रश्न विचारा --> विषय समजून-उमजून घ्या --> ज्ञान व्यवहारात वापरात आणा" या सर्व पायर्या ज्ञानार्जनात असल्या तरच ते खरे ज्ञानार्जन होईल.
In reply to "वाचा/ऐका/पहा --> स्वतंत्र by अत्रुप्त आत्मा
हे काय रे पांडू? लेख कसा