शरयत
लेखनप्रकार
आज सकाळी साळा.
कालच्याला अब्यास न्हौता, लई खेळ्ळो.
तीन पायाच्या शरयतीत नुस्ती पडापड.
तोंडात चम्चा अन चम्च्यात लिंबू ठिवून पळायचीबी येक शरयत.
सोपी नसतीय.
पन माजा पैला नंबर आला.
आज साळंत झेंडा उबारला. समदी झ्याक ‘जनगणमन’ बोल्ली.
कोणकी आजीबाई आलत्या, तेंनी कायबाय सांगितलं.
समजलं नाय काय मला, तरीबी म्या टाळया वाजिवल्या.
मंग बक्शीसं दिली. अंक्याला लब्बर, भान्याला पटटी.
गुर्जीन्नी मला बोलिवलं. म्या आज्जीबाईच्या जवळ ग्येली.
त्या म्हन्ल्या, “बाळ, तुला मोठेपणी काय व्हायचं आहे?”
“शरयतवाली” म्या बोल्ली.
त्या हसल्या.
म्हन्ल्या, “आमचीही शर्यतच चालू आहे कधीपासून. सगळया मुलामुलींना शिकता यावं ही शर्यत.”
म्हन्जे समदे नाय शिकले, तर आज्जीबाई शरयत हरणार?
औघड हाये.
* शतशब्दकथा
वाचने
15263
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
आवडली !!
आंजी रॉक्स..
ये ब्बात. नेहमीप्रमाणेच.
आवडली.
आंजीच्या भावना आणि परिस्थितीचे चपखल वर्णन.
आंजी आवडलीच.
एकदम झकास.
In reply to एकदम झकास. by सौन्दर्य
+++१११
ते 'शरयत' पाहून मला वाटलं अफगाणिस्तानसंबंधीचा लेख आहे की काय. उघडल्यावर आंजीकथा आहे हा उलगडा झाला. ह्यावेळची इतकी भारी नाही, पण शेवट खास आतिवास स्टाइलने.
In reply to शरयत-शरियत! by एस
+१ मीही क्षणभर "शरियत" असं वाचलं.
आजची आंजी उद्याची आज्जी असते
:)
आवडल..
नेहमीप्रमाणेच कडक लेखन.
आवडली कथा.
ते 'शरयत' पाहून मला वाटलं अफगाणिस्तानसंबंधीचा लेख आहे की काय. उघडल्यावर आंजीकथा आहे हा उलगडा झाला. ह्यावेळची इतकी भारी नाही, पण शेवट खास आतिवास स्टाइलने.+१
आवडलं.
दिवसेंदिवस आंजीचे सवाल नेमके होत चाललेत. वाढत्या समजेचा परिणाम?
कथा आवडली
आंजी आपल्या भावना खूप सुंदर रितीने व्यक्त करते! २६ जानेवारी आणि देशाचे भविष्य यांचा मस्त सांगड घातली आहे.
मस्तच!
छान लिहिलंय.
अवांतर -
+३ - मीही क्षणभर 'शरियत' असं वाचलं... तुमचं अफगाणिस्तान लेखन वाचल्याचा परिणाम असावा.
आवडली कथा.
एकच म्हणेन "हार्ड हीटिंग" :)
आहा!
आंजी आणि आज्जी दोन्हीही खासच.
धागा उघडून वाचेपर्यंत वरील अनेकांप्रमाणे शरियतविषयी आहे असे वाटले.
आंजी आणि आज्जी दोन्हीबी जितू दे आपल्या आप्ल्या शरयतीत काय!!
अशा शतशब्दकथांच्या शीर्षकात कथाप्रकाराचा उल्लेख असावा असे सुचवतो. उदा. 'शतशब्दकथा - शरयत'.
ही आंजी आपल्याला खुदकन हसवून लगेच लहानपणात घेउन जाते.
छानच.
शरयत वाचून कंन्फ्युज झालो, म्हणून अजुनपर्यंत धागा उघडला नव्हता!!
कथा आवडली, रच्याकने बर्याच दिवसांनी आंजी उगवली बोर्डावर.
वॉव.. *good*
लई ब्येस !
आन्जीला आमच्याकडनं येक वासाचा लब्बर . . ! :)
सर्वांचे आभार.
शरयत - शरियत गोंधळ होऊ शकतो हे ध्यानात आलं नाही - क्षमस्व!
आवडली !!