(सोबती) सकारात्मक.
लेखनविषय:
सुचेता ह्यांची सोबती ही कविता वाचली आणि आवडलीही.
तसं पाहिलं तर काव्य करणं हा माझा प्रांत नव्हे. पण मधेच कधीतरी सुरसुरी येते. सुचेता ह्यांची 'सोबती' कविता वाचली आणि आलेल्या सुरसुर्या अवस्थेत एक कविता होऊन गेली.
तुम्हा सर्वांच्या आस्वादार्थ......
सुखाला अनंत सोबती जरी,
दु:खातही तुम्ही एकटे नसता,
मित्र असतो सोबतीला,
सगळेच कडेने पोहणारे नसतात.
ज्याचं त्याने सामोरं जावं,
प्राक्तनाला दोषी का धरावं?
जीद्द अशी बाळगावी,
दैवानेही समोर झुकावं.
अरे हेच चिरंतन सत्य आहे,
पाठ फिरवून पळायचं नसतं.
संघर्ष जो सदैव करीतो,
दैव त्यालाच प्रसन्न होतं.
वाचने
3474
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
काकाश्री! झकास!! सकारात्मक विचार मांडणारी कविता खूप आवडली!!
सुन्दर ...
अरे हेच चिरंतन सत्य आहे,
पाठ फिरवून पळायचं नसतं.
संघर्ष जो सदैव करीतो,
दैव त्यालाच प्रसन्न होतं.
वाह्ह वा... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }मस्त
आवडली.
काका एकदम मस्त कविता.
ज्याचं त्याने सामोरं जावं, प्राक्तनाला दोषी का धरावं? जीद्द अशी बाळगावी, दैवानेही समोर झुकावं.हे आवडलं.
खुद को कर बुलंद इतना...
सुंदर आणि उत्साहवर्धक.
कवितेच्या प्रांतातही जम बसवण्यास हरकत नाही हो काका. छान झालीये.
In reply to कवितेच्या प्रांतातही जम by रेवती
सहर्ष अनुमोदन.
"सुखाला अनंत सोबती जरी,
दु:खातही तुम्ही एकटे नसता,
मित्र असतो सोबतीला,
सगळेच कडेने पोहणारे नसतात."
--------
थोडा बदल....
"सुखाला अनंत सोबती जरी,
दु:खातही तुम्ही एकटे नसता,
मिपाकर असतो सोबतीला,
सगळेच कडेने पोहणारे नसतात."
आमच्या पासून "मिपा आणि मिपाकर" तोडणे शक्य नाही.
सुंदर सकारात्मक कविता !
सोबतीला कुणी आहे याची आठवणही काहींना पुरेशी असते त्यांसाठीच आपण आहोत.
दु:खातही तुम्ही एकटे नसता,
मित्र असतो सोबतीला,
अनुभवतो आहे!!
हि बाजु ही आवडली आहे
मस्त कविता. मुळ कविता आणि हे कविता दोन्ही आवडल्या
वा!