मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

" आईले विचारल म्या "

Sanjay Kokare · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आईले विचारल म्या आपलीपरिस्थिती एवढी गरीब कौन असते?, आईन सांगितल मलेआपनशेतकर्याच्या एथ जन्मलो म्हणुन हे भोगाव लागते !!! आईले विचारल म्या लोक तं आपल्याले जगाचा पोशिंदा म्हणते, आईनं सांगितले कारण त्याईच्या ईथची पोई आपल्या ईथचपिकते !!! आईलाविचारल म्या त्या नेत्याच्या अंगावरले कपडेएवढे पांढरे कसेकाय असते, आईने सांगितले कारण त्यांईच्या कपडाचा कापुस पणआपल्याच मिळते!!! आईले विचारल म्या मग माया अंगावरचे कपडे कौन मयकलेअसते, आईन सांगितले कारण तुया कपडाले कापुस कमी न् घामच जास्त असते!! आईले विचारल म्या मलेशाळेमधुन मास्तर कौन हाकलुन लावते, आईने सांगितल कारण आपल्याजवळ शाळेच्या फी न् कपड्याची सोय नसते!!! आईलाविचारल म्या आये मग आपल्याजवळ पैसे कौन नसते, आईन सांगितल मलेकारण आपल्या वाटणीचा हिस्सा हे पुढारी लोकच खाउन घेते!!! आईले विचारल म्या कौन वर्गातले पोरं म्हले तुया बापान आत्महत्या केली असम्हणते, आईने सांगितले मलेकारण तुया बापान शेती करुनदुसर्याच पोट भरल असते!!!..... ........................................................ ........................................................ कवी............. संजयरा. कोकरे रा. अंबाडा ता. मोर्शी जि. अमरावती मो. नं. 9561730189 Email: S.r.kokare1992@gmail.com Facebook: Www.facebook.com/sanjaykokare

वाचने 5769 वाचनखूण प्रतिक्रिया 22

In reply to by प्रसाद गोडबोले

hitesh Fri, 01/16/2015 - 09:09
जागतिकीकरण : देश कशाला हवा ? आसा त्यानी दुसरा धागाही काढलाय. मग त्याना पुन्हा स्वतंत्र विदर्भ कशाला देताय ?

संदीप डांगे गुरुवार, 01/15/2015 - 22:51
तुमाले वऱ्हाडी लिवाचं अशीन तं जरासक ते सुद्दलेकन बी पावून गिउन घेत जा. अथि आंदीच कोनाले बर्बर म्हाईत नस्ते, त्यात तुमी असं लीवसान तं कसं ज्यमीन भौ?

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे Fri, 01/16/2015 - 21:20
तुमच्या कमेंट्स आमच्या डोक्यावरून गेल्या आहेत, कारण आमची गुडघ्यात असते ना म्हणून… जर इस्कटून सांगाल काय तुमचा पोईण्ट म्हणजे जरासक आमीबी हासु :-)

In reply to by Sanjay Kokare

कविते मध्ये शुद्धलेखन कस करणार भौ मी राहून राहून या प्रश्नाचा विचार करतोय. कविला नक्की काय म्हणायचय तेच कळत नाहीये. म्हणजे शुद्धलेखन कसे करायचे? की 'कवितेत शुद्धलेखन कसे करायचे? की 'कवितेत आणि शुद्धलेखन? की 'शुद्धलेखन (?) नक्की काय , म्हणायचय तरी काय तुम्हाला ?

In reply to by संदीप डांगे

नाखु Fri, 01/16/2015 - 09:59
कवीतेचा आशय विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहे . पहिली गोष्ट म्हणजे कवीतेखाली नाव वेळ संपर्क इ. देऊ नका (आधिच्या "पूर्वसूरींनी" आपली साहित्यकला प्रसार्/प्रचार साठी याच मार्गांचा अवलंब केला त्यामुळे सहवेदना जाऊन फक्त वेदना उरली.) उगा त्यांच्याशी स्पर्धा का करता? :-\ *boredom* *TIRED* |-0 :boredom: निषाणी डावा अंगठा* मधील मोहन आगाशे *beee* :-\ (आम्ही शेतीत अंगठे बहाद्दर आहोत असे जाणकारांचे प्रशस्ती पत्रक प्राप्त)

गणेशा Fri, 01/16/2015 - 16:07
कविता अतिशय छान आहे, भाषा कुठली हे माहीती नाही पण वर्हाडी भाषा आहे का ? आपल्या स्वताच्या भाषेचा फिल खरेच खुप छान असतो.. शिवाय ऐरणी -- खानदेशी वर्हाडी भाषा वाचायला खरेच खुप छान वाटती. कवितेतला मतीत अर्थ खुप छान आहे.. तरी पण मांडणी थोदी सुट्टी सुट्टी करता येइल काय ? उदा. (मी माझ्या भाषेत लिहितोय, तुमची भाषा येत नाही मला) आई ? का ग आपण गरीब ? आपलं बी रगात लालच असतय नव्ह ? कधी भरल ग आपल पोटाच खळगं का आपल्याच घामाच्या सदर्‍याला शंभर ठिगळं ? माझा काळाकुट्ट बा आपल्याच गहान कापसाच्या शेतात राबतोय विनतोय आपला संसार दिसंदिस पांढर्‍या फेक सदर्‍यातल्या मालकास कवा कळतील हे आपल दिस ? का ग आई ? सांगना ? आता हे योग्य आहे असे मी म्हणत नाही, पण वाचक म्हणुन प्रत्येक वेळेस आई म्हणाली, आणि मुलगा म्हणाला हे काव्यात योग्य वाटत नाही ते गद्यात छान वाटते. बाकी भाषा आणि कविता दोन्ही आवडली आपली.