" आईले विचारल म्या "
लेखनविषय:
काव्यरस
आईले विचारल म्या आपलीपरिस्थिती एवढी गरीब कौन असते?,
आईन सांगितल मलेआपनशेतकर्याच्या एथ जन्मलो म्हणुन हे भोगाव लागते !!!
आईले विचारल म्या लोक तं आपल्याले जगाचा पोशिंदा म्हणते,
आईनं सांगितले कारण त्याईच्या ईथची पोई आपल्या ईथचपिकते !!!
आईलाविचारल म्या त्या नेत्याच्या अंगावरले कपडेएवढे पांढरे कसेकाय असते,
आईने सांगितले कारण त्यांईच्या कपडाचा कापुस पणआपल्याच मिळते!!!
आईले विचारल म्या मग माया अंगावरचे कपडे कौन मयकलेअसते,
आईन सांगितले कारण तुया कपडाले कापुस कमी न् घामच जास्त असते!!
आईले विचारल म्या मलेशाळेमधुन मास्तर कौन हाकलुन लावते,
आईने सांगितल कारण आपल्याजवळ शाळेच्या फी न् कपड्याची सोय नसते!!!
आईलाविचारल म्या आये मग आपल्याजवळ पैसे कौन नसते,
आईन सांगितल मलेकारण आपल्या वाटणीचा हिस्सा हे पुढारी लोकच खाउन घेते!!!
आईले विचारल म्या कौन वर्गातले पोरं म्हले तुया बापान आत्महत्या केली असम्हणते,
आईने सांगितले मलेकारण तुया बापान शेती करुनदुसर्याच पोट भरल असते!!!.....
........................................................
........................................................
कवी.............
संजयरा. कोकरे
रा. अंबाडा ता. मोर्शी
जि. अमरावती
मो. नं. 9561730189
Email: S.r.kokare1992@gmail.com
Facebook: Www.facebook.com/sanjaykokare
वाचने
5769
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
मी काय म्हणतो ... स्वतंत्र
In reply to मी काय म्हणतो ... स्वतंत्र by प्रसाद गोडबोले
.
पण कशासाठी
तुमाले वऱ्हाडी लिवाचं अशीन तं
In reply to तुमाले वऱ्हाडी लिवाचं अशीन तं by संदीप डांगे
अथि आंदीच कोनाले बर्बर म्हाईत
In reply to अथि आंदीच कोनाले बर्बर म्हाईत by बॅटमॅन
कुणाला कशाचं तर बाट्याला
In reply to कुणाला कशाचं तर बाट्याला by प्रचेतस
मला नाय बा. त्यांनी उल्लेख
In reply to मला नाय बा. त्यांनी उल्लेख by बॅटमॅन
तुमच्या कमेंट्स आमच्या
कविते मध्ये शुद्धलेखन कस करणार भौ
In reply to कविते मध्ये शुद्धलेखन कस करणार भौ by Sanjay Kokare
कविते मध्ये शुद्धलेखन कस
कविते मध्ये शुद्धलेखन कस करणार भौमी राहून राहून या प्रश्नाचा विचार करतोय. कविला नक्की काय म्हणायचय तेच कळत नाहीये. म्हणजे शुद्धलेखन कसे करायचे? की 'कवितेत शुद्धलेखन कसे करायचे? की 'कवितेत आणि शुद्धलेखन? की 'शुद्धलेखन (?) नक्की काय , म्हणायचय तरी काय तुम्हाला ?स्वारी सर मी दिलेल्या स्पेस
काय जिलब्या पाडू र्हायला बे
In reply to काय जिलब्या पाडू र्हायला बे by सतिश गावडे
गल्ली चुकली वाट्टे त्याय्ची!
In reply to गल्ली चुकली वाट्टे त्याय्ची! by संदीप डांगे
दूसरी गोष्ट..
In reply to दूसरी गोष्ट.. by नाखु
okkk
चांगलीय !!
आवडली.
कविता अतिशय छान आहे,
okkkk
लिहित रहा
पत्ता, फोन नंबर?
सुरेख