(लेखणीने)
लेखनविषय:
काथ्याकुटास व्हावे तय्यार लेखणीने
भक्षण घटीपळांचे करण्यास लेखणीने
स्वविरोधी बोलण्याला मातीत लोळवावे
माझे खरे म्हणावे नखदार लेखणीने
मसीहा चितारण्याची अवगत कला करावी
औक्षण जणू स्वत:चे करण्यास लेखणीने
अफवादि निर्मितेला जेथे उभार तेथे
पेरुन बीज यावे रुजण्यास लेखणीने
भाकड-वृथा कथांच्या कक्षेमध्ये फिरावे
अभिजात सृजनाला डसण्यास लेखणीने
वाणी अरण्यरुदनि शिरजोर होई तेव्हा
संपादकांनी यावे धरण्यास लेखणीने
जेव्हा सदस्य करिति वादळ विराट तेव्हा
द्यावे अभय म्हणावे पळण्यास लेखणीने
-अंगावर उठे 'शबय शबय'
वाचने
9240
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
सूड!! शब्द सामर्थ्य अप्रतिम!!
In reply to सूड!! शब्द सामर्थ्य अप्रतिम!! by स्पंदना
+++१११
In reply to +++१११ by अत्रुप्त आत्मा
>>'शबय शबय' >>
In reply to >>'शबय शबय' >> by सूड
अर्थ माहीत नै
In reply to अर्थ माहीत नै by पैसा
मग मस्तच की..
In reply to मग मस्तच की.. by नाखु
=))
In reply to मग मस्तच की.. by नाखु
@बॅट्मन लिखित घरचा वैद्य आणि
वा!!
In reply to वा!! by विटेकर
जरा ओरिजनल लिवा की >>
In reply to वा!! by विटेकर
स्वतःची झायरात करत नाही, पण
स्कोर सेटलिंग ह्यालाच म्हणतात
In reply to स्कोर सेटलिंग ह्यालाच म्हणतात by टवाळ कार्टा
अभ्यास वाढवा
हे पण काव्य उत्तमच...
सूड(भावने)ला डिवचू नका, असे
जरा ओरिजनल लिवा कीला दणकून अनुमोदन ! लै पावर दिसतिया लेखणीत :)In reply to सूड(भावने)ला डिवचू नका, असे by डॉ सुहास म्हात्रे
लै पावर दिसतिया लेखणीत....
काव्यरस: Khuni panja =))
प्रत्ययकारी आणि जोरकस..
In reply to प्रत्ययकारी आणि जोरकस.. by नाखु
+१
खूपच जबरदस्त !!
In reply to खूपच जबरदस्त !! by खटपट्या
नाही एक मात्रा जास्त होईल
लै भारी ....
In reply to लै भारी .... by विशाल कुलकर्णी
=))
In reply to लै भारी .... by विशाल कुलकर्णी
हायला !! गंडलंय का काय
वरिजनल पेक्षा खत्तरनाक भाऊ !
करितो सूडकविता अशी ताकदीची
घरी कमधेनू पूढे ताक मागे, हरी
जबरी कविता रे सूड भावा.