लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!
आता तयार व्हावे लढण्यास लेखणीने
रक्षण अबोलतेचे करण्यास लेखणीने
अभ्यास चिंतनाला शास्त्रात घोळवावे
कसदार शब्दशेती फुलण्यास लेखणीने
वास्तव चितारण्याची अवगत कला करावी
भक्कम नवीन पाया रचण्यास लेखणीने
नवज्ञान निर्मितेला जेथे उभार तेथे
आशय हळूच न्यावा भिजण्यास लेखणीने
भाकड-वृथा कथांच्या कक्षेपल्याड जावे
अभिजात सृजनाला पुजण्यास लेखणीने
लटकी-पुचाट वाणी शिरजोर होत आहे
यावे रणात गच्ची धरण्यास लेखणीने
जेव्हा चहूदिशांनी वादळ विराट तेव्हा
द्यावे अभय दिव्याला जळण्यास लेखणीने
- गंगाधर मुटे 'अभय'
--------------------------------------------------
In reply to मुटे कुल-सुताची ही स्वीकार मुक्त कविता! by विटेकर
In reply to तुमची कविता मी 'गे माय भू by अन्या दातार
In reply to तुमची कविता मी 'गे माय भू by अन्या दातार
In reply to आनंदकंद वृत्त by गंगाधर मुटे
In reply to "अए दिल मुझे बता दे, तू किस by वैभव जाधव
In reply to "आठशे खिडक्या नऊशे दारं" ही by काळा पहाड
In reply to अल्ताफ राजाच्या "तुम तो ठेहरे by सतिश गावडे
In reply to मी तर 'या गो दांड्यावरना नवरा by सूड
In reply to "अए दिल मुझे बता दे, तू किस by वैभव जाधव
In reply to मला वाटतय , by प्रसाद गोडबोले
In reply to स्कोअर सेटल चाल्लय by कपिलमुनी
In reply to स्कोअर सेटल चाल्लय by कपिलमुनी
नवज्ञान निर्मितेला जेथे उभार तेथे आशय हळूच न्यावा भिजण्यास लेखणीनेह्या ओळी आवडल्या. पण कदाचित जिथे अशी अनुकूल परिस्थिती नाही तिथेही नव्या ज्ञानाच्या जोपासनेसाठी मशागत करणे हेही लेखणीचेच काम म्हटले पाहिजे. कविता छान आहे. पुलेशु.
In reply to आशय हळूच न्यावा... by एस
In reply to व्वा, छान. by आयुर्हित
In reply to वा वा वा वा ! by वेल्लाभट
In reply to छान कविता by पैसा
In reply to धन्यवाद मॅडम. आभारी आहे. by सस्नेह
लेखणी आणि तलवार