((सहज..))
लेखनविषय:
शब्दाने वाढला शब्द
कडाक्याचे भांडण झाले
मी सुन्न आणि स्तब्ध
अन, ती निघून गेली
न मागे वळून पाहणे
न माघारी ते फिरणे
वादातून तुटला धागा
आता उरले ते झुरणे
मी आशा का ठेवावी?
की जीवनी असेच व्हावे
साथ ही सुखाची
नेहमी मनाजोगे घडावे
ती निघून गेली आता
तिच्या एकल्या मार्गाने
कोमेजून गेली स्वप्ने
मी व्याकुळ इथे विरहाने
भेटेल कुणी कधी तिला
तो मार्ग चालता चालता
दाटूनी कंठ माझा आला
मज काही न ये बोलता
आता माझ्याही नशिबी
हे थांबणे निश्चित आहे
या स्तब्ध आयुष्याचा
मी सहप्रवासी आहे.
==============
संकटग्रस्त..
(चित्र जालावरुन साभार)
वाचने
3757
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
प्रेरणा राहिल्या...
In reply to प्रेरणा राहिल्या... by सतिश गावडे
@प्रेरणा राहिल्या...>>> ++
छान!
अर्थपूर्ण.
खूप छान !!
सुंदर
ह.भ.प.आमिर खान महाराजांच्या
भारी.
धागा..
परत वाचलं. परत आवडलं.
आवडलंच.
विडंबन नाही म्हणता येणार!!
क्या बात!
वाह्ह...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- || अच्युतम केशवं ||स्वतंत्र कविता आहे ही. आणि
In reply to स्वतंत्र कविता आहे ही. आणि by प्यारे१
+१ सुंदर आहे कविता
खूप छान!
दोन दोन कंसमामांच्या
In reply to दोन दोन कंसमामांच्या by डॉ सुहास म्हात्रे
+१
छान कविता आहे.
जिंदगी प्यार मे तेरी रफ्तार