मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अमृतसर ३ - लखलखतं सुवर्णमंदीर

सर्वसाक्षी · · भटकंती
इथुन पाय निघत नव्हता हे खरं. फारच त्रोटक दर्शन झालं. अर्थात मी पुन्हा येण्याची तजवीज करुन ठेवली होती. "झाल ते दर्शन दिवसाचं, पण रात्रीचं दर्शन म्हणजे खरं सुवर्णमंदीर पाहणं" असं सांगुन मी दुसर्‍या फेरीला आलो. दुसरी फेरी मिळावी म्हणुन मी पहिल्या फेरीत 'आता बघुन घेउया, दर्शन रात्रीच्या फेरीते घेउ, गर्दीही कमी असेल" असं सांगुन मंडळींना बाहेर काढलं होतं. म्हणजे दुसरी भेट नकी! यावेळी टाउन हॉलवरुन चालत निघालो आणि अकाल तख्तालगतच्या रस्त्याने दाखल झालो. गर्दी कमी असेल हा भ्रम दूर झाला. मात्र कोलाहल नव्हता. लोक पादत्राणं जमा करुन मंदिराच्या दिशेने जात होते. आम्हीही पादत्राणे जमा केली आणि पाय धुवुन मंदिरात शिरलो. n1 n2 n3 n4 n5 n6 n7 n8 n9 n10 n11 n12 n14 n15 n16 n17 n18 n19 n20 n21 n22 n23 प्रदक्षिणा करत फोटो काढताना वेळ कसा गेला समजल नाही. अगदी निवांत दर्शन झालं. आता सगळ्यांनाच पोटातली भूक जाणवू लागली होती. आम्ही हात जोडले आणि बाहेर पडलो.

वाचने 10027 वाचनखूण प्रतिक्रिया 17

स्पार्टाकस 03/01/2015 - 03:17
खूप छान आलेत फोटो! बरीच वर्ष झाली जाऊन! पुढच्या भारतवारीत प्लान करायला हवा!

तुषार काळभोर 03/01/2015 - 08:52
रात्रीचं सुवर्णमंदीर पहिल्यांदाच पाहतोय... लई भारी!!

मुक्त विहारि 03/01/2015 - 10:27
आता अम्रुतसरला निदान २ दिवस तरी रहायला पाहिजे..

नाखु 03/01/2015 - 11:24
जोरदार अनुमोदन. एकूण मंदीर आणि परिसर व्यवस्थीत राखलेला दिसतोय गर्दी असली स्वयंशिस्त दिसतेय. तुळजापूर देवळात चेंगरा-चेंगरीचा अनुभवी.

पैसा 04/01/2015 - 15:24
बोलण्यापलिकडचे आहे हे! डोळ्याचं पारणं फिटलं अगदी!