अमृतसर ३ - लखलखतं सुवर्णमंदीर
इथुन पाय निघत नव्हता हे खरं. फारच त्रोटक दर्शन झालं.
अर्थात मी पुन्हा येण्याची तजवीज करुन ठेवली होती. "झाल ते दर्शन दिवसाचं, पण रात्रीचं दर्शन म्हणजे खरं सुवर्णमंदीर पाहणं" असं सांगुन मी दुसर्या फेरीला आलो. दुसरी फेरी मिळावी म्हणुन मी पहिल्या फेरीत 'आता बघुन घेउया, दर्शन रात्रीच्या फेरीते घेउ, गर्दीही कमी असेल" असं सांगुन मंडळींना बाहेर काढलं होतं. म्हणजे दुसरी भेट नकी!
यावेळी टाउन हॉलवरुन चालत निघालो आणि अकाल तख्तालगतच्या रस्त्याने दाखल झालो. गर्दी कमी असेल हा भ्रम दूर झाला. मात्र कोलाहल नव्हता. लोक पादत्राणं जमा करुन मंदिराच्या दिशेने जात होते. आम्हीही पादत्राणे जमा केली आणि पाय धुवुन मंदिरात शिरलो.
प्रदक्षिणा करत फोटो काढताना वेळ कसा गेला समजल नाही. अगदी निवांत दर्शन झालं. आता सगळ्यांनाच पोटातली भूक जाणवू लागली होती. आम्ही हात जोडले आणि बाहेर पडलो.
प्रदक्षिणा करत फोटो काढताना वेळ कसा गेला समजल नाही. अगदी निवांत दर्शन झालं. आता सगळ्यांनाच पोटातली भूक जाणवू लागली होती. आम्ही हात जोडले आणि बाहेर पडलो.
वाचन
10026
प्रतिक्रिया
17