अगा पांडुरंगा ..
लेखनविषय:
ज्योताय, तुझ्या हुकूमावरून खूप दिवसानंतर मिपावर परत लिहायला सुरूवात करतोय.
गोड मानून घ्या मंडळी ... _/\_
**************************************************
किती आळवावे स्मरावे तुला मी पुन्हा चित्त बेभान व्हावे अता
भुलावे जगाचे किती पांडुरंगा मनाचे मला भान व्हावे अता
नसे शुद्ध गंगा न पावन किनारे नको मोक्ष आता नको स्वर्ग ते
तुझ्या उंबर्याचा मिळो कोपरा ’मात्र’ जगणेच आख्यान व्हावे अता
पुन्हा देहकोशी धुमारे फुटावे किती पापणीने लवावे पुन्हा
तुला मी पहावे भजावे पुजावे, जळो दंभ हा, ज्ञान व्हावे अता
नको चंद्रभागा न भीमा हवी मज उराशी हवा वेदनाडोह तो
तुझे स्पर्श माझ्या अभंगास जैसे सुखाचेच सोपान व्हावे अता
मला भावते ती जनी नामयाची सखी भाबडी रे तुझी सावळ्या
भले ती अडाणी..., तिची एक ओवी, झणी दूर अज्ञान व्हावे अता
नसे मी तुकोबा, नसे मी विसोबा, नसे भक्त गोरा विठू मी तुझा
भिकारी प्रभो मी तुझ्या पायरीचा असे आस ’उत्थान’ व्हावे अता
जरी सर्व देतोस पृच्छेविना तू तरी आर्त माझ्या मनी ते उरे
पुन्हा मागणे मागतो हे अनंता जगाचेच कल्याण व्हावे अता
**************************************************
वृत्त : सुमंदारमाला
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा
विशाल
वाचने
12222
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
भारी
सुरेख !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds lighter tanks for Tibet border Pakistan should be ready for collateral damages if they fire: BSF Russia looks to boost defence ties with India Final tally: Taxpayers auto bailout loss $9.3B Auto bailout cost the US goverment $9.26B Analysts foresee bad year for U.S. government bonds Google Fiber services may launch in India soon Telcos to make tough calls as spectrum war heats upमिपावर पुन्हा एकदा लिहिते झाल्याबद्दल धन्यवाद रे विशल्या! आणि मनापासून स्वागतही! ही कविता आधी वाचली होती तेव्हाही खूप भावली होती आणि आता पुन्हा वाचतानाही तेवढीच आवडली!
मस्त
सुंदर
भक्तीरसाचा आल्हाददायक अनुभवाबद्दल धन्यवाद. खालील ओळी विशेषतः आवडल्या
...
नको चंद्रभागा न भीमा हवी मज उराशी हवा वेदनाडोह तो
तुझे स्पर्श माझ्या अभंगास जैसे सुखाचेच सोपान व्हावे अता
नसे मी तुकोबा, नसे मी विसोबा, नसे भक्त गोरा विठू मी तुझा
भिकारी प्रभो मी तुझ्या पायरीचा असे आस ’उत्थान’ व्हावे अता
....
जरी सर्व देतोस पृच्छेविना तू तरी आर्त माझ्या मनी ते उरे
पुन्हा मागणे मागतो हे अनंता जगाचेच कल्याण व्हावे अता
छान भक्तीरसपूर्ण कविता
In reply to छान भक्तीरसपूर्ण कविता by सस्नेह
+++१११ टू स्नेहातै. :)
सुंदर कविता विशाल.
लिहित रहा.
सुमंदारमाला वृत्त का ? वृत्ताचे नाव कन्फर्म करावे.
ऐ फूलों की रानी बहारों की मलिका तेरा मुस्कुराना गजब हो गया !
:)
In reply to . by hitesh
तेच वृत्त
In reply to . by hitesh
हितेश, हो सुमंदारमालाच आहे.कवितेच्या खाली लगावलीसह माहिती दिली आहे ना. धन्यवाद :)
वा!!!
छान
आवडलं, बर्याच दिवसांनी मिपाच्या बोर्डावर चांगली कविता आली. नायतर शिंची ती धौतीयोगचूर्णजनित विडंबनं!! वात आणलेनीत नुसता!!
अतिशय आवडली
पैजारबुवा,
उत्तम.. सकस.
याला लिहिते केल्याबद्दल ज्योताईचे आभार.
In reply to उत्तम.. सकस. by गवि
धन्यवाद गवि :)
ह्या माणसाला पुन्हा लिहिते केल्यावद्दत समस्त मिपा वाचक वर्गातर्फे ज्योताइंचे मनापासून आभार. आपण काय धमकी दिलीत ते आम्हालाही सांगावे ही विनंती.
In reply to धन्यवाद ज्योताई by आदिजोशी
त्याच्याआधी आदिजोशी या माणसाला लिहिते करण्यासाठी काय धमकी द्यावी लागेल ते सांगा! =))
In reply to ते गुपित आहे by पैसा
आड्या, ताईने सांगितले 'क्रमशः' लिहीलेस तरी तुला पुढचा भाग कधी असे विचारणार नाही ;)
In reply to आड्या, ताईने सांगितले 'क्रमशः by विशाल कुलकर्णी
=)) अॅड्याभौ पळाले बघ लिहायचा विषय निघाल्यावर!
छान अभंग निर्मिती झाली आहे. आणखी काही डिटेक्टीव्ह स्टोरीज पण येऊ दया आता.
मनःपूर्वक आभार मंडळी _/\_
बर्याच दिवसांनी एक सुंदर कविता आणि तीही अक्षरगणवृत्तात वाचली. आवडली.
माऊली माऊली च्या चालीवर परफेक्ट वाचता आली. आवडली.
अरे वाह ! काय मस्त !
क्या बात है....
विलक्षण आवडली.
वृत्तांत बांधलेल्या बिंधलेल्या कविता कमी वाचायला मिळतात आजकाल.
त्यामुळे विशेष भावलेली आहे.
धन्यवाद :)
अत्यंत तरल सुंदर काव्य.
*good* *THUMBS%%_%%UP* :GOOD: :good: *GOOD* *THUMBS UP*
धन्यवाद मंडळी _/\_
जोरदार....मस्त रचना. कडक एकदम
भारी