अगा पांडुरंगा ..
लेखनविषय:
ज्योताय, तुझ्या हुकूमावरून खूप दिवसानंतर मिपावर परत लिहायला सुरूवात करतोय.
गोड मानून घ्या मंडळी ... _/\_
**************************************************
किती आळवावे स्मरावे तुला मी पुन्हा चित्त बेभान व्हावे अता
भुलावे जगाचे किती पांडुरंगा मनाचे मला भान व्हावे अता
नसे शुद्ध गंगा न पावन किनारे नको मोक्ष आता नको स्वर्ग ते
तुझ्या उंबर्याचा मिळो कोपरा ’मात्र’ जगणेच आख्यान व्हावे अता
पुन्हा देहकोशी धुमारे फुटावे किती पापणीने लवावे पुन्हा
तुला मी पहावे भजावे पुजावे, जळो दंभ हा, ज्ञान व्हावे अता
नको चंद्रभागा न भीमा हवी मज उराशी हवा वेदनाडोह तो
तुझे स्पर्श माझ्या अभंगास जैसे सुखाचेच सोपान व्हावे अता
मला भावते ती जनी नामयाची सखी भाबडी रे तुझी सावळ्या
भले ती अडाणी..., तिची एक ओवी, झणी दूर अज्ञान व्हावे अता
नसे मी तुकोबा, नसे मी विसोबा, नसे भक्त गोरा विठू मी तुझा
भिकारी प्रभो मी तुझ्या पायरीचा असे आस ’उत्थान’ व्हावे अता
जरी सर्व देतोस पृच्छेविना तू तरी आर्त माझ्या मनी ते उरे
पुन्हा मागणे मागतो हे अनंता जगाचेच कल्याण व्हावे अता
**************************************************
वृत्त : सुमंदारमाला
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा
विशाल
वाचने
12219
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
भारी
सुरेख !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds lighter tanks for Tibet border Pakistan should be ready for collateral damages if they fire: BSF Russia looks to boost defence ties with India Final tally: Taxpayers auto bailout loss $9.3B Auto bailout cost the US goverment $9.26B Analysts foresee bad year for U.S. government bonds Google Fiber services may launch in India soon Telcos to make tough calls as spectrum war heats upअप्रतिम!
मस्त
सुंदर
भक्तीरसाचा आल्हाददायक
छान भक्तीरसपूर्ण कविता
In reply to छान भक्तीरसपूर्ण कविता by सस्नेह
+++१११ टू स्नेहातै.
सुंदर कविता विशाल. लिहित रहा.
.
In reply to . by hitesh
हो
In reply to . by hitesh
हितेश, हो सुमंदारमालाच आहे
वा!!!
मस्त..
आवडलं, बर्याच दिवसांनी
अतिशय आवडली पैजारबुवा,
उत्तम.. सकस.
In reply to उत्तम.. सकस. by गवि
धन्यवाद गवि
धन्यवाद ज्योताई
In reply to धन्यवाद ज्योताई by आदिजोशी
ते गुपित आहे
In reply to ते गुपित आहे by पैसा
आड्या, ताईने सांगितले 'क्रमशः
In reply to आड्या, ताईने सांगितले 'क्रमशः by विशाल कुलकर्णी
हेहेहे!
छान अभंग निर्मिती झाली आहे.
मनःपूर्वक आभार मंडळी _/\_
वा!
माऊली माऊली च्या चालीवर
अरे वाह ! काय मस्त !
वृत्तांत बांधलेल्या
धन्यवाद
आशयघन +
धन्यवाद मंडळी _/\_
मस्त