मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अर्रे पांडुब्बा ..

टवाळ कार्टा · · जे न देखे रवी...
वर्जीनल कवी, लाडके मिपावासी स्पा आणि उल्लेखलेल्या समस्त मिपाकरांची मापी मागून आम्ची पेर्णा - http://www.misalpav.com/node/29893 --------------------------------------------------------------------------------- माताय, अंगातल्या टवाळकीमुळे खूप जिल्ब्यांसोबत मिपावर परत लिहायला सुरूवात करतोय. टैम्पास करून घ्या मंडळी ... \m/ ************************************************** किती आठवणीने वाचावे तुझे लेख मी "ते" वाचून चित्त घाबरे अता भुलवावे जगा किती पांडुब्बा कोणालातरी भान यावे अता नसे शुद्ध उल्हास न पावन किनारे नको ठाकुर्ली आता नको कल्याण ते कोणत्याही स्टेशना मिळे ठोकरा ’सीट’ मिळणेच आख्यान व्हावे अता सुक्या देहाशी प्याक फुटावे किती सीटप्स माराव्या पुन्हा तुला सगळ्यांनी पहावे भजावे पुजावे, जळो दंभ हा, (अशी) बाडी करावी स्वत: नको हनुमाना न भीमा हवी मज उराशी हवा आर्नोल्ड तो स्वत:चे स्पर्श स्वत:च्या अंगास तैसे करूनच मसल्स पहावे अता तुला भावते ती जूनी न्हाव्याची सखी बोबडी रे (, कशी रे) तुझी टवळ्या आहेच ती अडाणी..., तिची एक शीवी, झणझणीत(,) दूर अज्ञान व्हावे अता नसे तू आत्मुदा, नसे तू विसोबा, नसे फक्त गोरा बैटू तू स्वत: आळशी पांडू तू मिपाचा असे ज्ञान तुम्हास व्हावे अता जरी "अच्चा अच्च जाल तल" देतोस पृच्छेविना (,) तू सापडच माझ्या हाती रे पुन्हा वर सांगतो हे नीलकांता कंपूचेच कल्याण व्हावे अता ************************************************** वृत्त : सुमारमाला "लखन"वी : रंपंपं रंपंपं रंपंपं हो … रंपंपं रंपंपं रंपंपं हो … ए जी … ओ जी … टवाळ

वाचने 11353 वाचनखूण प्रतिक्रिया 38

स्पंदना Fri, 01/02/2015 - 13:40
एकच विषय धरुन केलं असत तर विडंबन. यात शब्दा श्बदाला विषय बदलतो आहे. अजिबात जमल नाही. आणि टका, दिसली कविता पाड विडंबन हे काही बरोबर नाही. कधी काही गोष्ते अस्पर्श रहाव्या अस वाटतं, त्यात मूळ कविता येते. इतक सुंदर, वृत्तबद्ध कोठे मिळतय आजकाल वाचायला. प्रेम अन समाजातली घाण सोडून दुसरी कोणती भावना येथे व्यक्त होते? माफ करा पण मला अजिबात नाही आवडल हे विडंबन.

In reply to by स्पंदना

टवाळ कार्टा Fri, 01/02/2015 - 13:45
एकच विषय धरुन केलं असत तर विडंबन. यात शब्दा श्बदाला विषय बदलतो आहे. अजिबात जमल नाही.
हे मला सुध्धा वाटलेले...बरे झाले मोकळेपणाने सांगितले...पुढल्यावेळी लक्षात ठेवीन
आणि टका, दिसली कविता पाड विडंबन हे काही बरोबर नाही. कधी काही गोष्ते अस्पर्श रहाव्या अस वाटतं, त्यात मूळ कविता येते.
अरे मग कवींनी कवीतेखाली पाटी लावावी..."विडंबन करण्यास मनाई"...नाही हात लावत त्या कवीतांना आणि विडंबन केल्याने मूळ कवीता तेव्हाच विसरलली जाते जेव्हा विडंबन "अत्युत्तम" असते...वर तुम्हीच लिहिले आहे की हे विडंबन इतके जमले नाही (जे मलासुध्धा थोडेफार जाणवलेले)...मग मूळ कवीता चांगलीच वाटणार

In reply to by टवाळ कार्टा

स्पंदना Fri, 01/02/2015 - 13:55
हे असं कुणी लिहायची गरज नसते. मनाला भावणार्‍या काही गोष्ती आपल्या आपण उलगडाव्यात. जस की सूर्योदय अन सुर्यास्ताचा क्षण. पौर्णीमेच्या रात्री चंद्र भर माथ्यावर असताना एखाद्या माळरानावर दुरुन ऐकू येणारी मंद गीताची धून. बेला के फूल ऐकताना येणारी मंद गुंगी. हे सगळ अस्पर्श रहावं अस मन ठरवत. रातराणीच्या फुलांचा मंद गंध खिडकीत उभा राहून घ्यायचा असतो, तिला उपटुन हातात घेउन नाचायची नसते. प्राजक्ताच्या झाडाखाली उभे राहून वरुन टप टप पडणारी फुलं अनुभवायची असतात, झाडावर चढुन ती ओरबाडुन वास घ्याय्चा नसतो. हे सगळ मन ठरवतं, कारण त्या गोष्टी तेव्हढ्या तरल असतात. नुकत्या जनमलेल्या बाळाला ज्या हळुवारपणे हाताळावं, तश्या असतात काही गोष्टी. आणि हे सगळ मन ठरवतं.

In reply to by स्पंदना

टवाळ कार्टा Fri, 01/02/2015 - 15:19
हे असं कुणी लिहायची गरज नसते. मनाला भावणार्‍या काही गोष्ती आपल्या आपण उलगडाव्यात.
मग याच प्रमाणे प्रत्येकाची आवड वेगळी असते...आणि वाचणार्याला सुध्धा मूळ कवीता वाचायची की विडंबन याचा पर्याय असतो"च"
आणि हे सगळ मन ठरवतं.
मग बोलणचं संपलं की...कारण तुम्ही जे वर लिहिले आहे ते तुमच्यासाठी जरी ग्गोगोड मोरपंखी पान असेल तसेच कोणा दुसर्यासाठी "दवणीय" सुध्धा असू शकते याचा विचारच तुम्ही केलेला नाही

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन Fri, 01/02/2015 - 17:13
कारण तुम्ही जे वर लिहिले आहे ते तुमच्यासाठी जरी ग्गोगोड मोरपंखी पान असेल तसेच कोणा दुसर्यासाठी "दवणीय" सुध्धा असू शकते याचा विचारच तुम्ही केलेला नाही
दुसर्‍याला काय वाटेल याचा विचार करण्यासारखी क्षुद्र गोष्ट त्यांना आवडत नसेल हो. पाप लागत असेल.

In reply to by बॅटमॅन

सूड Fri, 01/02/2015 - 17:16
दुसर्‍याला काय वाटेल याचा विचार करण्यासारखी क्षुद्र गोष्ट त्यांना आवडत नसेल हो. पाप लागत असेल.
हा विचार टकानेही विडंबन पाडताना केलेला दिसत नाही ब्याट्या!!

In reply to by बॅटमॅन

सूड Fri, 01/02/2015 - 17:28
विडंबन टवाळकी असणार हे मान्य, पण तू ज्या मुद्द्यावर सपोर्ट करतोयेस तो मुद्दा चुकीचा वाटला. अर्थात कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मी निरीक्षण नोंदवलं.

In reply to by टवाळ कार्टा

थोडंसं अवांतर ,रिक्षा फिरवतोय म्हणा हवं तर.... ;) सिरियस विडंबन काय असते त्याचे उदाहरण मिळेल काय>>> गंभीर विडंबनाचे उदाहरण, अर्थात माझी रिक्षा ;) खरेसाहेब…माफ़ करा : ३ : दिवस असे की …

In reply to by स्पंदना

सूड Fri, 01/02/2015 - 15:39
आधीच चिर्कुट तशातच पद्य व्याला* मग विडंबनदंश झाला तयाला झाली तशातच त्या आत्मूबाधा काय वर्णू त्याच्या टवाळ्या अगाधा!! *mosking* *या ओळीचा श्रेयअव्हेरः मेवे यांची एक जुनाट खरड. ;)

In reply to by स्पंदना

टवाळ कार्टा Fri, 01/02/2015 - 13:47
आणि टका, दिसली कविता पाड विडंबन हे काही बरोबर नाही.
आणि मिपावर मी इतके जिल्बीपाडू लिखाण बघितले आहे (विषेशतः निवडणूकीच्या काळात)...त्यावेळेस कोणालाही हा उपदेश करण्यात आला नव्हता...ये नाईन्साफी हय :(

In reply to by सूड

@कधीपासून =))))) होतायेत या अशा कविता?>>मागेच केलेलं विधान पुन्हा करतो.हा सुडुक प्रचंड सखोल आहे! =))