सुरूवातीपासून शेवटपर्यंत उद्धव ठाकर्यांनी व पर्यायाने शिवसेनेने अत्यंत चुकीची पावले टाकली आणि त्यातूनच आज शिवसेनेची अवस्था 'युद्धात हरले आणि तहातही हरले' अशी केविलवाणी झाली आहे. १५ वर्षे सत्तेपासून लांब राहिल्यावर सत्ता अगदी हातातोंडाशी येऊनही आपल्याच चुकीमुळे घास तोंडात जाताजाता हातातून पडून मातीत मिळावा आणि पुन्हा एकदा उपाशी रहावे लागण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. आणि ही वेळ शिवसेनेनेच स्वतःवर ओढवून घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लगेचच भाजपने जागावाटपाचा फॉर्म्युला बदलण्याची मागणी करायला सुरूवात केली होती. 'महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच असणार' असे त्यावेळी कै. गोपीनाथ मुंड्यांनी जाहीररित्या सांगितले होते. केंद्रात सेनेला अत्यंत बिनमहत्त्वाचं फक्त १ मंत्रीपद देऊन भाजपने आपलं भविष्यातील धोरण स्पष्ट केलं होतं. भाजपचे धोरण ओळखूनच शिवसेनेने आपल्या चाली आखायला हव्या होत्या. परंतु सेना नेते आपल्याच अहंकारात, भ्रमात व नसलेल्या ताकदीच्या जोषात राहिले.
भाजप जास्त जागा लढविण्यासाठी दबाव आणणार हे मे २०१४ मध्येच स्पष्ट झाले होते. अशावेळी मे ते सप्टेंबर या काळात शिवसेनेने धोरणीपणे विचारमंथन करून आपले डावपेच आखायला हवे होते.
११९ पेक्षा थोड्या जास्त जागा देऊन भाजपचे समाधान करावे, आपण कधीच निवडून आलो नाही व ज्या जागा भाजपलाही जिंकणे अशक्य आहे अशा जागा देऊन त्याग केल्याचा आव आणावा, ११९ पेक्षा थोड्या जास्त जागा देऊन त्या बदल्यात महत्त्वाची मंत्रिपदे देण्याचे जाहीर आश्वासन भाजपकडून घ्यावे व त्या बदल्यात केंद्रात जास्त व महत्त्वाची मंत्रिपदे मागून घ्यावीत, हे सुरू असतानाच मनसे व इतर काही स्थानिक पक्षांशी बोलणी करून भाजपविरूद्ध पर्यायी आघाडी तयार करावी असे अनेक पर्यात शिवसेनेला उपलब्ध असताना शिवसेना नेते गाफील राहिले.
भाजप कदापिही युती तोडणार नाही, ज्या भाजपला आपण २५ वर्षे आपल्या तालावर नाचविले आहे तो भाजप यापुढेही आपल्याच तालावर नाचत राहील, आपण म्हणू तसेच होईल या भ्रमात शिवसेना नेते राहिले. सुरेश प्रभू, मनोहर जोशी इ. समंजस नेत्यांना वाळीत टाकून उद्धव ठाकरे अत्यंत उथळ, वाचाळ, अविचारी असलेल्या व अजिबात दूरदृष्टी नसलेल्या संजय राऊत, रामदास कदम, रावते, प्रेम शुक्ला इ. नेत्यांवर विसंबून राहिले व त्याची फळे शिवसेनेला मिळाली.
४ सप्टेंबरला अमित शहा मुंबईत येणार होते. त्यांनी स्वतःहून मातोश्रीवर येऊन आपली भेट घ्यावी अशी उद्धव ठाकर्यांची इच्छा होती. परंतु त्यांनी अमित शहा व मोदी या जोडगोळीला ओळखण्यात चूक केली. हे दोघे भाजपच्या पूर्वीच्या नेत्यांप्रमाणे प्रादेशिक पक्षांपुढे झुकणारे नसून अत्यंत धोरणी व प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व सहन न करणारे आहेत हे त्यांच्या लक्षातच आले नाहीत. अमित शहा मुंबईत येऊन उद्धव ठाकर्यांना भेटणार नाहीत हे समजल्यावर तिळपापड होऊन शिवसेनेने 'शहाणा हो' ही पोस्टर्स सोशल मिडियातून पाठवायला सुरूवात करून त्यांना डिवचले. अमित शहांना डिवचणे म्हणजे थेट मोदींनाच डिवचण्यासारखं होतं हे सेना नेतृत्वाला कधी समजलंच नाही. अमित शहांनी शहाणपणा दाखवून याकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्यावर शेवटी उद्धव ठाकर्यांना अमित शहांना मातोश्री भेटीचे सन्मानपूर्वक निमंत्रण पाठवावं लागलं आणि इथेच शिवसेना झुकायला आणि डाव हरायला सुरूवात झाली.
नंतर प्रत्यक्ष जागावाटपाची बोलणी सुरू असताना सुरवातीला भाजपने १३५-१३५-१८ असा फॉर्म्युला सुचविला होता. भाजपची ताकद शिवसेनेच्या तुलनेत दीडपट होती. त्यानुसार भाजप १६०-१७०, शिवसेना १००-११० व मित्रपक्ष १८ असेच जागावाटप हवे होते. असे असतानाही भाजपची मागणी जास्तीत जास्त १३५ जागांची होती. नंतरच्या चर्चेत भाजप १३०-१४०-१८ व त्यानंतर १२५-१४५-१८ इतका खाली उतरला होती. शिवसेनेला ही उत्कृष्ट संधी होती. भाजप १२५ जागा लढवत असल्याने भाजपला जास्तीत जास्त १०० जागा जिंकता आल्या असत्या व त्यामुळे भाजप बहुमतापासून खूप दूर राहिला असता (आता भाजपने १२२ जागा जिंकल्याने फार थोड्या जागांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज आहे.). शिवसेनेला १४५ जागा लढवून कदाचित भाजपपेक्षा जास्त जागा जिंकण्याची व पर्यायाने मुख्यमंत्रीपद मिळविण्याची संधी होती. जरी भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या तरी उपमुख्यमंत्रीपद व इतर अनेक महत्त्वाची मंत्रिपदे मिळाली असती. युती करून एकत्र लढल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी ला प्रत्येकी ३० पेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या व राष्ट्रवादीला खूप कमी जागा मिळाल्यामुळे भाजपला पाठिंबा देउन उपयोगच झाला नसता. पर्यायाने भाजपला सर्वार्थाने शिवसेनेवरच अवलंबून रहावे लागले असते.
दुर्दैवाने उद्धव ठाकरे स्वतःच्या अहंकाराचे बळी ठरले. युती तुटल्यावर सुद्धा स्वतःच्या अहंकारामुळे मनसेबरोबर नवीन आघाडी त्यांना करता आली नाही. भाजपने आधीच योजना आखून सर्व मित्रपक्षांना स्वतःच्या बाजूला वळवून शिवसेनेला पूर्ण एकाकी पाडले.
युती तुटली ही वस्तुस्थिती मान्य करून हे वास्तव समंजसपणे स्वीकारण्याऐवजी शिवसेनेने प्रचारात असभ्य पातळी गाठली. सामनातून व सभांमधून सातत्याने अमित शहा व मोदींना लक्ष्य करून त्यांच्याविरूद्ध अत्यंत असभ्य व नकारात्मक प्रचार केला गेला. त्यांच्याबरोबरीने मित्रपक्षांचे राजू शेट्टी, रामदास आठवले, जानकर इ. ना ही लक्ष्य केले. शेवटी खडसेंविरूद्धही अत्यंत नकारात्मक प्रचार केला. महाराष्ट्रातील लोकांना मोदी हवे आहेत व काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभारातून मुक्ती हवी आहे हे सेनेने न ओळखता काँग्रेस-राष्ट्रवादी ऐवजी भाजपलाच आपला मुख्य शत्रू मानण्याची घोडचूक केली. मोदींना अफझलखानाची उपमा देणे, अमित शहांना आदिलशहा-कुतुबशहाची उपमा देणे, मोदींच्या तीर्थरूपांचा उद्धार करणे, आदित्य ठाकरे सारख्या पोराला चर्चेसाठी पाठविणे अशा अनेक घोडचुका सेनेने केल्या.
याउलट भाजपने समंजसपणे शिवसेनेच्या प्रचाराकडे दुर्लक्ष करून आपला सकारात्मक प्रचार सुरू ठेवला व सेनेचे आपोआप खच्चीकरण होत गेले. त्याचेच परीणाम निकालात दिसले. भाजपच्या तुलनेत जेमतेम निम्म्या जागा मिळवून युतीतला मोठा भाऊ खरोखर कोण होता याचे जनतेनेच उत्तर दिले.
तरीही भाजपला स्पष्ट बहुमत न मिळणे व आपल्याकडे तब्बल ६३ आमदार असणे हे शिवसेनेकडे हुकमी एक्के होते. त्यांनी आपली पाने नीट खेळली असती तर त्यांना बर्याच गोष्टी मिळविता आल्या असत्या. कदाचित सेनेला अडीच वर्षांकरता मुख्यमंत्रीपदही मिळविता आले असते.
ज्या दिवशी निकाल लागले त्याच दिवशी सेनेने भाजपला पाठिंबा जाहीर करून सर्वप्रथम भाजपला मिळू शकणारी राष्ट्रवादीची रसद रोखायला हवी होती. भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही हे एकदा नक्की करून नंतर भाजपकडून आपल्याला हवे ते सेनेला मिळविता आले असते. एकदा सेनेचा पाठिंबा घेतल्यावर त्यांना लाथाडून नंतर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणे भाजपला अत्यंत अवघड झाले असते. हे न करता शिवसेना पुन्हा एकदा गाफील राहिली. भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही व शेवटी त्यांना आपलेच पाय धरावे लागतील या भ्रमात सेना नेते राहिले. भाजपने चातुर्याने सेनेला बोलण्यात गुंतवून अपक्ष व इतर लहान पक्षांचा पाठिंबा मिळवून आपली गरज जेमतेम ७-८ आमदारांवर आणली व राज्यपाल व सभापती आपल्याच पाठीशी राहणार असे धोरण आखून शिवसेनेच्या मदतीशिवात विश्वासदर्शक ठराव मंजूर करुन घेऊन शिवसेनेचे मानेवरील जोखड कायमचे उतरविले.
भारतीय मतदार व्यक्तिगत असभ्य टीका व नकारात्मक प्रचार कायमच नाकारतो हे शिवसेनेच्या पराभवामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
शिवसेनेच्या जागी मायावती असती तर तिने अत्यंत चातुर्याने पत्ते खेळून स्वत:च्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद मिळविले असते. किंवा राकाँ, काँ बरोबर मोट बांधून स्वतःचाच मुख्यमंत्री बनविला असता. दुर्दैवाने शिवसेना नेत्यांकडे धोरणीपणाचा संपूर्ण अभाव व अहंकार, स्वतःच्या नसलेल्या ताकदीबद्दल भ्रम, उर्मटपणा, अविचारीपणा, प्रक्षोभक शब्द, उथळ्पणा व असंमजपणा याशिवाय दुसरे काहीच नसल्याने शिवसेना युद्ध हरलीच पण तहातही हरली.
ही निवडणुक शिवसेनेच्या अंताचा प्रारंभ ठरणार असे आता वाटत आहे.
वाचने
122124
प्रतिक्रिया
256
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>> बाजपाई
In reply to @गुरुजी - असे पुरावे कधी देता by प्रसाद१९७१
खरे आहे
In reply to वाजपेयींचा भाजप? by क्लिंटन
"मिशन वन फिफ्टी‘ करतोय, लेकाचा!!
अरे कुठ नेउन ठेवलाय
शिवाय या...
In reply to अरे कुठ नेउन ठेवलाय by पिंपातला उंदीर
त्यांचे काम च होते ना ते रुळ
In reply to शिवाय या... by नाखु
ही अतिशय वाईट बातमी आहे.
In reply to अरे कुठ नेउन ठेवलाय by पिंपातला उंदीर
वाईट काय आहे त्याच्यात?
In reply to ही अतिशय वाईट बातमी आहे. by प्रसाद१९७१
सफाईने दुर्लक्ष
In reply to अरे कुठ नेउन ठेवलाय by पिंपातला उंदीर
मी एकच नोंद करतो..
+१ गुरुजींचे आणखी एक शतक
In reply to मी एकच नोंद करतो.. by चौकटराजा
आराम हराम है ?
In reply to मी एकच नोंद करतो.. by चौकटराजा
शतकाबद्दल शुभेच्छा!.. बाकी
१२२ जागा हे फारसे घातक नाही.
In reply to शतकाबद्दल शुभेच्छा!.. बाकी by आनन्दा
फुट तर भाजपात पडणार आहे म्हणे
In reply to १२२ जागा हे फारसे घातक नाही. by श्रीगुरुजी
>>> फुट तर भाजपात पडणार आहे
In reply to फुट तर भाजपात पडणार आहे म्हणे by दिवाकर देशमुख
जसे तुम्ही झुलत आहे तसेच
In reply to >>> फुट तर भाजपात पडणार आहे by श्रीगुरुजी
जसे तुम्ही झुलत आहे तसेच ;) छत्तीसगड मधे इतक्या महिला मृत्युमुखी पडल्या आणि आपले परिधान मंत्री वर्ल्डटुरला गेले आहे आणि तिथुन फोटो शेअर करत आहे. साधी ट्विट देखील नाही या गोष्टीवर हेच काँग्रेसच्या राज्यात झाले असते तर छाती बडवत ट्विटचा महापुर आणला असता रोज चॅनल्स वर चर्चेची झडी लावली असती. पण भाजपाच्या राज्यात घडल्याने सगळे चॅनलवाले शेपुट घालुन गुपचुप ऑस्ट्रेलियाला पळुन गेले आनि फालतु बातम्या दाखवायला सुरुवात केली
ह्म्म
हि बातमी वाचून लैच हहपुवा
अशी नौटंकी करण्याची पवारांची
In reply to हि बातमी वाचून लैच हहपुवा by पिंपातला उंदीर
बातमीनुसार...
In reply to अशी नौटंकी करण्याची पवारांची by श्रीगुरुजी
अशा पुड्यांवर आणि अपप्रचारावर
In reply to बातमीनुसार... by अर्धवटराव
२००९ पासुन जेव्हा हारलात
In reply to अशा पुड्यांवर आणि अपप्रचारावर by श्रीगुरुजी
निवडणुकांचा खर्च राज्य सरकार
कर भरणारे नागरीक करतात.
In reply to निवडणुकांचा खर्च राज्य सरकार by अनुप ढेरे
अखेर भाजपने विधानसभेत
>>> अखेर भाजपने विधानसभेत
In reply to अखेर भाजपने विधानसभेत by गजानन५९
फेसबुक सभारः-
राष्ट्रवादीने न मागता
किती ते किती
In reply to राष्ट्रवादीने न मागता by श्रीगुरुजी
wishful thinking
In reply to राष्ट्रवादीने न मागता by श्रीगुरुजी
आजची बातमी (सकाळमधील)
शिवसेनेला बोनस संधी
In reply to आजची बातमी (सकाळमधील) by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
सेनेने विरोधातच बसावे.
श्रीगुरुजी यांना खरच मनापासून विनंती
गजानन भाउ
गुरुजींना भाजप्यांच्या चुका दिसणार नाही
शिवसेना श्रीगुरूजीनी
मला एक गोष्ट समजत नाही. सगळे
हे सगळे मान्य हो..
In reply to मला एक गोष्ट समजत नाही. सगळे by सुबोध खरे
सह्मत हाड्क्या
In reply to हे सगळे मान्य हो.. by हाडक्या
+१००
In reply to हे सगळे मान्य हो.. by हाडक्या
आपले म्हणणे मान्य आहे. मला
In reply to +१०० by कपिलमुनी
भाजप ला ५ आमदार सापडले की जे
दोन मोती
तु हे विचार मौक्तिक वाचल नहिस
In reply to दोन मोती by ३_१४ विक्षिप्त अदिती
चला, मारामारी करू या. ;-)
In reply to तु हे विचार मौक्तिक वाचल नहिस by पिंपातला उंदीर
हमाम
In reply to दोन मोती by ३_१४ विक्षिप्त अदिती
राजकारणच का बरं?
In reply to हमाम by प्रदीप
भारतीय राजकारणातून नैतिकता तर
In reply to दोन मोती by ३_१४ विक्षिप्त अदिती
भारतीय राजकारणातून नैतिकता तर कधीचीच बासनात गुंडाळली आहे.या जगात राजकारणात कोणत्या काळात, कोणत्या जागी स्वच्छ-शुद्ध नैतिकता होती ? किंबहुना हवे ते / फायद्याचे ते करणे आणि त्याला नैतिकतेचा मुलामा देऊन लोकांसमोर ठेवणे यालाच राजकारण म्हणतात :)अजित पवार प्रभृतींची चौकशी सुरू?
+१
In reply to अजित पवार प्रभृतींची चौकशी सुरू? by क्लिंटन
काही नाही हो. सगळी नौटंकी आहे.
In reply to अजित पवार प्रभृतींची चौकशी सुरू? by क्लिंटन
हो ना म्हणूनच 'सध्या तरी
In reply to काही नाही हो. सगळी नौटंकी आहे. by बबन ताम्बे
आजची परिस्थिती
+१
In reply to आजची परिस्थिती by समीरसूर
भाजपची प्रतिमा
महत्वाच्या प्रश्नांना भिडून
In reply to भाजपची प्रतिमा by समीरसूर
अधिक वेळ
In reply to महत्वाच्या प्रश्नांना भिडून by सव्यसाची
रामपाल महाराज आणि शरद पवार
गुप्त मतदान टाळुन शिवसेनेनी
तुम्हाला कसे कळले
In reply to गुप्त मतदान टाळुन शिवसेनेनी by प्रसाद१९७१
पेपर ला आले होते. बिधीमंडळाची
In reply to तुम्हाला कसे कळले by कपिलमुनी
पेपर
In reply to पेपर ला आले होते. बिधीमंडळाची by प्रसाद१९७१
गंगाधर ही शक्तिमान है
राज्यपालसुद्धा अंधारात
सांगा गुरुर्जी
इथले भक्त आणि भगत यांना नक्कीच आकडा माहीत असेल खरतर माहिती इथे मिपावर विचारायला हवी होती गुरुजींनी नक्कीच सांगितली असती. गुरुजी तर बहुमत आहे असे छातीठोकपणे सांगत आहे इतके तर फडणवीस साहेब देखील कधी सांगत नसतील
बहुमत
In reply to सांगा गुरुर्जी by दिवाकर देशमुख
बहुमत आहे पण आमदार संख्या माहीत नाही
In reply to बहुमत by कपिलमुनी
कोण तुम्ही ?
अचानक उद्भवलेल्या प्रकृतीच्या
शुभेच्छा...!
In reply to अचानक उद्भवलेल्या प्रकृतीच्या by श्रीगुरुजी
लौकर बरे व्हा
In reply to अचानक उद्भवलेल्या प्रकृतीच्या by श्रीगुरुजी
प्रभाकर पेठकर, कपिलमुनी,
In reply to लौकर बरे व्हा by कपिलमुनी
भाजप-शिवसेना चर्चेचे गुर्हाळ
मला नाहि वाटत.
In reply to भाजप-शिवसेना चर्चेचे गुर्हाळ by श्रीगुरुजी
नान्दा सौ़ख्यभरे
ते होणारच होते
In reply to नान्दा सौ़ख्यभरे by रघुपती.राज
भाजपचे हसे झाले का अब्रूचे
In reply to ते होणारच होते by समीरसूर
हे बाकी भारी !
In reply to भाजपचे हसे झाले का अब्रूचे by श्रीगुरुजी
शिवसेनेचे
In reply to भाजपचे हसे झाले का अब्रूचे by श्रीगुरुजी
पण त्यामुळे शिवसेना भाजपच्या
In reply to शिवसेनेचे by समीरसूर
>>> ज्यांचा विरोधी पक्ष नेता
In reply to शिवसेनेचे by समीरसूर
तंतोतंत खरे.
In reply to >>> ज्यांचा विरोधी पक्ष नेता by श्रीगुरुजी
लग्न नाही म्हणता येणार.
In reply to नान्दा सौ़ख्यभरे by रघुपती.राज
अरे काय चाललंय सध्या हे!
गुर्जी तुम्ही भाजप च्या
आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे,
पक्षातील फूट टाळण्यासाठीच
In reply to आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे, by दुश्यन्त
आपला प्रत्येक रिप्लाय हा खुप
In reply to पक्षातील फूट टाळण्यासाठीच by श्रीगुरुजी
चाहता विरुद्ध कार्यकर्ता असा
In reply to आपला प्रत्येक रिप्लाय हा खुप by गणेशा
२.
In reply to पक्षातील फूट टाळण्यासाठीच by श्रीगुरुजी
भाजपला सरकार चालवण्यासाठी
भाजपला अफझलखान संबोधून आणि
>>> भाजपला अफझलखान संबोधून
In reply to भाजपला अफझलखान संबोधून आणि by दुश्यन्त
बाकी बरेच मुद्दे मान्य केले
In reply to >>> भाजपला अफझलखान संबोधून by श्रीगुरुजी
कशाला भान्ड्ताय?
http://www.loksatta.com
कंटाळा
In reply to http://www.loksatta.com by श्रीगुरुजी
अहो तो लेख गिरिश कुबेरांचा
In reply to कंटाळा by कपिलमुनी
दोषी
In reply to अहो तो लेख गिरिश कुबेरांचा by मृत्युन्जय
मी गाळले असतील तर तुम्ही टाका
In reply to दोषी by कपिलमुनी
अवघ्या राज्यात गाजलेल्या
आरोप
In reply to अवघ्या राज्यात गाजलेल्या by श्रीगुरुजी
राष्ट्रवादीच्या कुबड्या
In reply to आरोप by कपिलमुनी
ते तर होणारच होतं...
In reply to अवघ्या राज्यात गाजलेल्या by श्रीगुरुजी
श्रीगूर्जिना बोलवा राव