तुझी सोबत.......
लेखनविषय:
तुझी सोबत.......
भुरभुरणाऱ्या पावसाच्या श्रावण सरीसारखी
क्षणात सोबत तर क्षणात कुठतरी गुडूप होणारी , हुरहूर लावणारी ,
हिरमुसले गेले कि अचानक बरसणारी ,
माझ्या मनी अन अंगणी ताल धरणारी पावसाची सरच ती ,
सर जुनं विसरून नव्याने जगायला शिकवणारी , कोवळ्या फुटलेल्या पालवी सारखी,
तुझी सोबत.......
आठवण पक्ष्यांचा नाच बनून राहिलेली , दूरवर कुठंतरी आभाळात रांगोळी सांडलेली .
माझ्या ओंजळभर स्वप्नाचं चांदणं बनून राहिलेली,
आठवणीतच गुंतलेली अन आठवणीतच उसवलेली
तुझी सोबत.......
भावनांचा हीशोब मांडणारी शब्दहीन कवितेची ओळ जशी ,
आभाळभर साठून हि बरसणं विसरलेली सर जशी.
वाचने
2697
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
सुंदर कविता आहे.
In reply to सुंदर कविता आहे. by विजुभाऊ
धन्यवाद
छान कविता
In reply to छान कविता by एस
नक्कीच
गुड वन !
In reply to गुड वन ! by वेल्लाभट
धन्यवाद
छान...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- LIVE UPDATE - मी देवेंद्र गंगाधर फडणवीस... शपथ घेतो कीआहाहाहाहाहाहा!!!!!!!!!!!!!!!!
धन्यवाद
:(
क्या बात!
सुंदर