तुझी सोबत.......
लेखनविषय:
तुझी सोबत.......
भुरभुरणाऱ्या पावसाच्या श्रावण सरीसारखी
क्षणात सोबत तर क्षणात कुठतरी गुडूप होणारी , हुरहूर लावणारी ,
हिरमुसले गेले कि अचानक बरसणारी ,
माझ्या मनी अन अंगणी ताल धरणारी पावसाची सरच ती ,
सर जुनं विसरून नव्याने जगायला शिकवणारी , कोवळ्या फुटलेल्या पालवी सारखी,
तुझी सोबत.......
आठवण पक्ष्यांचा नाच बनून राहिलेली , दूरवर कुठंतरी आभाळात रांगोळी सांडलेली .
माझ्या ओंजळभर स्वप्नाचं चांदणं बनून राहिलेली,
आठवणीतच गुंतलेली अन आठवणीतच उसवलेली
तुझी सोबत.......
भावनांचा हीशोब मांडणारी शब्दहीन कवितेची ओळ जशी ,
आभाळभर साठून हि बरसणं विसरलेली सर जशी.
वाचने
2697
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
सुंदर कविता आहे.
एक सूचना
तुझी सोबत....... आठवण पक्षांचा नाच बनून राहिलेली ,या इथे पक्षांचा या ऐवजी पक्ष्यांचा असे हवे होते. तुम्ही हा शब्द "पक्षी" या शब्दाची अनेक वचन म्हणूनच वापरलाय . "राजकीय पक्ष" यातील पक्षाचे अनेकवचन या अर्थाने खचितच वापरलेला नसावा अशी अपेक्षा आहे.
In reply to सुंदर कविता आहे. by विजुभाऊ
धन्यवाद लक्षात आणून दिल्याबद्दल,पुढल्या वेळी काळजी घेईन नक्कीच.
नेहमीच्या गुळगुळीत उपमा-रूपकांपेक्षा थोडे वेगळे काही करण्याचा प्रयत्न करा.
पुलेशु.
गुड वन !
छान...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- LIVE UPDATE - मी देवेंद्र गंगाधर फडणवीस... शपथ घेतो कीआहाहाहाहाहाहा!!!!!!!!!!!!!!!!!!
शब्द नि शब्द ..नुसता स्पर्श करत करत जातोय मनाला!
सुखावह...अल्हाददायक. :)
धन्यवाद :)
मिपा वापरताना थोडा गोंधळ उडतोय, एकदा दिलेला प्रतिसाद तीन तीनदा का दिसत आहे आणि देलेली प्रतिक्रिया काढून टाकण्याची काही सोय आहे का ?
क्या बात!
सुंदर
सुंदर कविता आहे.