आमचे प्रेर्नास्तान
------------------
बारका हुतो तवा आज्जाबरबर चंद्रमा थेट्रात जायला मला कद्दीच आवडलं न्हाई, पण त्यो वडत मला घेऊन जायचा. दर शुक्करवारी बच्च्चनचा पिच्चर हमखास लागायचा. दोन-तीन तास तर बसायचं हाय तिथं, पर आज्जाला आधी एवढा वेळ का लागायचा मला त्या टायमाला कद्दीच समजलं न्हाई. त्यो आधी आसपासची जागा बघायचा, कुठं थुकलंय का? *गून्, *तून ठेवलंय का बघायचा. मग रुप्पयाचा एक बंदा घेऊन लाकडी शीटच्या पट्ट्यामधनं फिरवायचा. भौतेक ढेकनं मारत हुता. मग तरुनभारत पेपर शीटवर हातरायचा तवा कुठं तेच्याच शीटवर मला जर्रा जागा मिळायची टेकवायला. इंटर्वेलला मुतारीत लै वास मारतो म्हणत मग आमी एका झाडाखालीच जायचो. मला हे समदं त्या टायमाला कसंतरीच वाटायचं.
काल सिटी प्राईडमधे असाच एक थोडा वेगळ्या रूपातील आजोबा मला पाहायला मिळाला. आजोबा म्हणतोय कारण एक चिमुरडा त्याच्या आजूबाजूला फिरत होता. थ्री-फोर्थ, फंकी टी-शर्ट अशा रूपात तो मल्टीप्लेक्सच्या एका टिकीट काउंटरवर उभा होता. हेडफोन कानात घालून डोलणं चालू होते आणि त्याच्या पर्सनॅलीटीला शोभेल अशा स्मार्टफोनवर, मोठे नख असलेल्या तर्जनीने टचस्क्रिनशी चाळा करत त्याने टिकीटाचा रेफरंन्स नंबर दिला, टिकिटं घेतली. मग फूड काउंटरवर जाउन ओर्डर दिली "३ चीज बर्गर, २ बटर पॉपकॉर्न आणी २ कोक". आणी थेट ऐटीत जाउन बसला आत मौ-मौ सीटवर.
पिच्चर संपला.. हल्ली पाश्चात्यांच्या या असल्या थेरांमुळे थेट्रातली मजाच गेलीय, पण पिच्चर बघताना तसा माहोल आता का नाही याचे उत्तर काल मिळाले मला.


वाचने
7368
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त विडंबन पण ते फंकी टी
खी खी खी
शिर्शक वाचुन लैच अपेक्शेने
आज्जा असल्यामुळे टिशर्ट,
भारतातले आणि डॉइशलांड (आपलं
गंडलय.
थोडासा गंडल्यासारखा मला पण
In reply to गंडलय. by जेपी
हो. गंडल्या लॉजिकनंच लिवलंय.
In reply to थोडासा गंडल्यासारखा मला पण by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to हो. गंडल्या लॉजिकनंच लिवलंय. by यसवायजी
बटर पॉपकॉर्न आणि कोक
दोनचार चणे तोंडात टाकत
In reply to बटर पॉपकॉर्न आणि कोक by साती
,
In reply to बटर पॉपकॉर्न आणि कोक by साती
मस्त!
In reply to बटर पॉपकॉर्न आणि कोक by साती
नखाने टचस्क्रीन??
तेच ना!! मी सुद्धा एकदा
In reply to नखाने टचस्क्रीन?? by आदूबाळ
मीही हल्ली मल्टीप्लेक्स / मॉल
In reply to तेच ना!! मी सुद्धा एकदा by सूड
(No subject)
In reply to तेच ना!! मी सुद्धा एकदा by सूड
जीन्स घातली होती का? नायतर
In reply to तेच ना!! मी सुद्धा एकदा by सूड
(No subject)
In reply to जीन्स घातली होती का? नायतर by अजया
आमच्याकडे आजोबा कध्धीच
त्या आज्याही तसल्याच!!
In reply to आमच्याकडे आजोबा कध्धीच by मार्क ट्वेन
येस!
एक नंबर!
In reply to येस! by पिवळा डांबिस
डांबिस नैतरकोण>>> _/\_
In reply to येस! by पिवळा डांबिस
सॉलिड डांबिस प्रतिसाद. _/\_
In reply to येस! by पिवळा डांबिस
पि.प.
In reply to येस! by पिवळा डांबिस
पाडुकोणास?
In reply to पि.प. by तिमा
एक मिपाकर म्हणून मला शरम
तुम्ही कशाला शरमताय?
In reply to एक मिपाकर म्हणून मला शरम by काळा पहाड
(प्रा.डाँ.ची माफी मागून असं
हा हा हा
आजोबा आणि नातू
आजोबा, फोटो दिसत नाही.
In reply to आजोबा आणि नातू by चित्रगुप्त
चित्रगुप्त.... फोटो "गुप्त"
In reply to आजोबा आणि नातू by चित्रगुप्त
सही विडंबन !
थोडस्सं अजून लांब चाल्लं अस्तं राव