सत्याचा जय...
लेखनप्रकार
पूर्वपिठिका:
नुकतेच मिपावरच्या एका धाग्यावरच्या डॉ सुबोध खरे यांच्या प्रतिसादात खालील वाक्य वाचले...
नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो. नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतोच असे नाही. परिश्रम घेतल्याविना असे काही झाल्यास तो योगायोग समजावा.
याचा अर्थ विजयासाठी असत्याने वागायला पाहिजे असा अजिबात नाही तर असत्याचा पराभव करण्यासाठी लागणारी अक्कलहुशारी आणि ताकद बाळगणे जरूर आहे असा आहे.
सितेला पळवून नेल्यावर पश्चाताप झाला म्हणून रावणाने तिला सन्मानाने परत पाठवले नव्हते. रामाला रावणाबरोबरचे युध्द जिंकूनच सत्याचा विजय सिद्ध करावा लागला होता.
२. गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते. हा चलाख श्रीमंतांनी गरीबाला कायम गरीब ठेवण्यासाठी आणि त्याच्या जीवावर स्वतः कायम श्रीमंत राहण्यासाठी पसरवलेली खोटी कल्पना आहे. या खोडलेल्या विधानाचा मानसिक सुखांशी ओढून ताणून संबंध लाउन (वडाची साल पिंपळाला लाउन) आर्थिक अपयशाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला जातो.
सत्य हे आहे की लाडू हा नेहमीच भाकरीपेक्षा गोड असतो आणि श्रीमंती ही नेहमीच गरिबीपेक्षा जास्त सुखकारक जीवन शक्य करते. मात्र ऐहीक सुख समाधानकारक पद्धतीने भोगण्यासाठी, "जर तो पैसा सरळ मार्गाने मिळवलेला असला तर" खूप मदत होते.
पैशाबद्दल सत्य असे आहे की त्याला ऋण/नकारार्थी (negative) मुल्य आहे. म्हणजे थोडक्यात असे "तो नसला तर नक्कीच दु:खदायक असतो, पण असला तर सुखदायक होईलच असे नाही." मात्र पैसा योग्य मार्गाने मिळवलेला असला तर त्याचे फायदे उपभोगताना न्युनगंड / पकडले जाण्याच्या भितीचा अभाव तरी नक्की राहील.
३. लुळीपांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी. हे एक भंपक विधान आहे. लुळेपांगळेपणा-धडधाकटपणा आणि श्रीमंती-गरिबी यांचा अर्थाअर्थी अथवा सरळ-सरळ काहीच संबंध नाही.
सत्य हे आहे की, या जगात अनेक लुळेपांगळे गरीब आहेत आणि धडधाकट श्रीमंत आहेत. शिवाय अनेक पंगु श्रीमंत त्याच्या श्रीमंतीमुळे उत्तम/बरे जीवन जगत आहेत आणि त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त प्रमाणात असलेले धडधाकट गरीब हालाखीचे जीवन जगत आहेत.
वैध मार्गाने कमावलेली सधनता तुम्हाला अश्या अनेक सुखकारक गोष्टी मिळवून देऊ शकते, ज्यांची गरीब स्वप्नेही बघू शकत नाही.
४. "लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" हे सुद्धा वरच्या भोंदू वाक्यांइतकेच... किंबहुना त्यांच्यापेक्षा जरा जास्तच... भोंदू वाक्य आहे.
जगात असत्य, अनिती वगैरेचा मार्ग पकडून धन आणि यश कमावणारे अनेक लोक आहेत पण त्याबरोबरच सत्य आणि नीतिच्या मार्गावर चालून सधन आणि यशस्वी झालेले लोकही कमी नाहीत. मात्र आपण दुसर्याची परिस्थिती पडताळून पाहत असताना वापरलेले सधनतेचे आणि यशाचे निकष आपले नसून त्या व्यक्तीचे असायला हवे; स्वतःबद्दल पडताळणी करायची असेल तेव्हाच स्वतःचे निकष वापरणे योग्य होईल; इतके तारतम्य ठेवणे जरूर आहे. कारण सधनतेची आणि यशाची व्याख्या माणसागणीक वेगळी असू शकते.
वर केवळ चारच वाक्ये उदाहरणाखातर दिली आहेत. जरा आजूबाजूला पाहिले तर अशी अनेक भंपक वाक्ये "चलाख लोक स्वत:च्या फायद्यासाठी" किंवा "स्वघोषित विचारवंत चार टाळ्या कमवायला" वापरताना दिसतील.
या आणि अश्या इतर वाक्यांना केवळ निरर्थक अथवा फोल म्हणून सोडण्यात अर्थ नाही. सक्रिय प्रयत्नांनी त्यांना कचर्याचा डबा दाखवणे आवश्यक आहे...
कारण अपयश मागे सारून सतत स्वतःच्या बळावर प्रामाणिक प्रयत्न करून सधन व सुखी होण्याचा प्रयत्न करायला उत्साहीत करण्याऐवजी अशी वाक्ये अपयशाचे भ्रामक समर्थन करत समाजाला पंगू करण्याचे काम करत असतात... सशक्त, विचारी आणि शहाणा समाज बनण्याच्या वाटेत अश्या अंधश्रद्धा फार मोठा अडथळा बनून उभ्या आहेत.
शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही.
या वाक्यात सांगीतलेल्या शंभर नंबरी सत्याविरुद्ध समाजात काही वेळेस जाणीवपूर्वक तर इतर काही वेळेस अजाणतेपणाने विचार पसरवला जात असतो आणि त्यामुळे समाजावर किती अनिष्ट परिणाम होतो याबद्दल लिहायचे बरेच दिवस मनात होतेच.
पण, डॉ खरेंच्या प्रतिसादाने हातातले काम बाजूला ठेऊन आजच त्यावर खालील विचार लिहायला भाग पाडले, याबद्दल त्यांचे खास धन्यवाद !
============================================
"नेहमीच सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो.";
"गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते.";
"लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी.";
"लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" वगैरे, वगैरे, वगैरे...
अशी काल्पनिक, फसवी आणि भोंदू विधाने सर्वसामान्य माणसातल्या भोळसट कवीमनाला भुरळ घालतात. डोळे उघडे ठेवून आजूबाजूला पाहिले तर त्यातला फोलपणा दिसायला फार वेळ लागत नाही. दुर्दैवाने भावनेच्या पुरात वाहून जाणार्या माणसाला सर्वसाधारणपणे डोळे उघडे ठेऊन बघणे जरासे कठीणच जाते.
सर्वात वाईट गोष्ट ही की बर्याच वेळेस अशी विधाने आपले अपयश झाकण्यासाठी एक उत्तम पळवाट म्हणून सोईची वाटतात... अश्या फसव्या फुंकरीने मूळ आजारावर (अपयश) उपाय तर होत नाहीच पण तो अधिकच बळावतो (यशासाठी प्रयत्न करण्याऐवजी अपयशाचे समर्थन करून स्वतःचेच मानसिक खच्चिकरण करण्याची वृत्ती बळावते).
जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम परखडपणे सत्याला सामोरे जायची (ब्रूटल ऑनेस्टी) आणि वस्तूस्थितीकडे डोळे उघडे ठेऊन बघण्याची (लॉजिकल थिंकिंग) सवय अंगीकारली पाहिजे. मग त्यावरून झालेल्या बोधाने जो निर्णय पटेल तो ज्याचा त्याने घ्यावा... मात्र जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याच्या परिणामांची तयारी ठेवावी... त्या परिणामांची जबाबदारी झटकून टाकायला काल्पनिक समजूतींचा आधार घ्यायची घातक सवय सोडून देणे आवश्यक आहे. कोणीतरी म्हटले आहेच ना की, "यश म्हणजे अपयशाचा अभाव नाही तर अपयशातून उठून, अंग झटकून, परिस्थितीचा सामना करून तिच्यावर विजय मिळवणे आहे."
म्हणूनच सुरुवातीला दिलेल्या किंवा तत्सम फसव्या वाक्यांऐवजी खालील परखड सत्य स्विकारल्यास "मानसिक खरेपणा" आणि "ऐहीक यश" या दोन्हींची शक्य तेवढी "नैतीक सांगड" घालणे शक्य होईल:
१.
वाचने
55824
वाचनखूण
प्रतिक्रिया
218
उत्तम.
In reply to उत्तम. by विटेकर
हजारो वर्षांची गुलामगिरीची
लेख खुप आवडला.
लेख आवडला.विटुकाकाशी पुन्हा
In reply to लेख आवडला.विटुकाकाशी पुन्हा by जेपी
सहमत
In reply to सहमत by योगी९००
विटेकरांचा लेख नसतांना त्यांच्याशी असहमती व्यक्त करणार्या
In reply to विटेकरांचा लेख नसतांना त्यांच्याशी असहमती व्यक्त करणार्या by संजय क्षीरसागर
लेख विटेकरांचा नाही हे कळतेय हो...
आवडलं लिहिलेलं. आणि पटलंही
'ठेविले अनंते तैसेची रहावे..
+ असंख्य
एकूण लेखाशी अतिशय अतिशय सहमत.
ह्या वाक्यांमधले तुलनात्मक
.
In reply to . by पोटे
बुडाला औरंग्या पापी हे वाक्य
In reply to . by पोटे
काय पोटेसाहेब, प्रत्येक
In reply to काय पोटेसाहेब, प्रत्येक by प्रचेतस
सिग्रेडी? वाय्झेड्ग्रेडी
In reply to सिग्रेडी? वाय्झेड्ग्रेडी by प्यारे१
+१
अमुक शिवाय तमुक नाही वगैरे का
अमुक शिवाय तमुक नाही वगैरे का असतं? मी माझ्यासाठी अमुक एक करतो/करेन पुरेसं नाही?याची उत्तरे "आस्तिक-नास्तिक..." लेखाच्या पुढच्या भागात येतील, (जर्रा वेळ मिळू द्या). आतासाठी फक्त दोनच विधाने: १. माणूस समाजातले "बेट" (मी माझ्यासाठी अमुक एक करतो/करेन) म्हणण्याइतका वेगळा राहू शकणार नाही... संन्यास घेऊन जंगलात गेला तरी आजच्या काळात ते शक्य नाही. व्यक्ती व समाज यांची क्रिया-प्रतिक्रिया अनिवार्य आहे. २. एडवर्ड मरो म्हणून गेलाय : "क्लिष्ट गोष्टींची समज आपल्याला काही काळाने येईलच. पण समोर असलेल्या उघडउघड गोष्टीच्या उकलीला त्यापेक्षा जास्त वेळ लागतो असेच दिसते (The obscure we see eventually. The completely obvious, it seems, takes longer).""लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी"
In reply to "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी" by यसवायजी
साक्षेपी वर्तन ठेवावे.
In reply to "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी" by यसवायजी
त्या वाक्प्रचाराचा अर्थ
In reply to "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी" by यसवायजी
यसवायजी. खरेतर मराठी तील हे
In reply to यसवायजी. खरेतर मराठी तील हे by विजुभाऊ
हो. पैशाचं महत्व मी तरी
क्लास !!!
आरोग्याचे महत्त्व.
In reply to आरोग्याचे महत्त्व. by प्रभाकर पेठकर
याबद्दल माझे मत मी वरच्या एका
थिअरेटिकली हे पटतय की, अपयश
In reply to थिअरेटिकली हे पटतय की, अपयश by कवितानागेश
खरंतर यात काहीच थिअरेटिकल
In reply to खरंतर यात काहीच थिअरेटिकल by डॉ सुहास म्हात्रे
God helps them who help
In reply to खरंतर यात काहीच थिअरेटिकल by डॉ सुहास म्हात्रे
अपयशाचे कारन प्रत्येकवेळेस
In reply to अपयशाचे कारन प्रत्येकवेळेस by कवितानागेश
महत्वाकांक्षी असावे की नसावे
In reply to महत्वाकांक्षी असावे की नसावे by डॉ सुहास म्हात्रे
सहसा 'यश' ही गोष्ट भौतिक
In reply to सहसा 'यश' ही गोष्ट भौतिक by कवितानागेश
+१ आणि +२
In reply to सहसा 'यश' ही गोष्ट भौतिक by कवितानागेश
केवळ सहमतच नाही तर हा मुद्दा
मात्र आपण दुसर्याची परिस्थिती पडताळून पाहत असताना वापरलेले सधनतेचे आणि यशाचे निकष आपले नसून त्या व्यक्तीचे असायला हवे; स्वतःबद्दल पडताळणी करायची असेल तेव्हाच स्वतःचे निकष वापरणे योग्य होईल; इतके तारतम्य ठेवणे जरूर आहे. कारण सधनतेची आणि यशाची व्याख्या माणसागणीक वेगळी असू शकते.@मात्र ऐहीक सुख समाधानकारक
मस्त लेख....
मला ते फळ्यावर लिहिलेले
In reply to मला ते फळ्यावर लिहिलेले by सुहास..
दुचाकीची मळवटलेली मागची सीट
मस्त लेख. अनेक प्रस्थापित
माझी हि एक वीट
In reply to माझी हि एक वीट by सुबोध खरे
+१ सर!!!
In reply to माझी हि एक वीट by सुबोध खरे
+१
.
लेख आवडला
In reply to लेख आवडला by पैसा
.
"hope is a good thing, maybe
In reply to "hope is a good thing, maybe by दशानन
माझा अर्धाच मुद्दा
भारताच्या स्वातंत्र्यानंतर
.
In reply to . by पोटे
एकच मोठी लिस्ट करा की पोटे
In reply to एकच मोठी लिस्ट करा की पोटे by प्यारे१
हा हा हा..!! ठ्ठो...
In reply to हा हा हा..!! ठ्ठो... by अस्वस्थामा
(No subject)
In reply to एकच मोठी लिस्ट करा की पोटे by प्यारे१
.
In reply to . by पोटे
ट्रोलिंग म्हणजे काय हो
वाचतीये.
ह्म्म
In reply to ह्म्म by विटेकर
नाही म्हणता म्हणता बर्याचशा
In reply to ह्म्म by विटेकर
सविस्तर प्रतिसादाबद्दल
In reply to सविस्तर प्रतिसादाबद्दल by डॉ सुहास म्हात्रे
अरे हो. आणि एक महत्वाचा
पटले
छान
In reply to छान by ऋषिकेश
धन्यवाद !
प्रत्येक कोट हा स्थल-काल-व्यक्ती व मुख्यतः प्रसंग सापेक्ष असतो इतके लक्षात घेऊन हे कोट्स एक ललित म्हणून ऐकावे नी सोडून द्यावे.मुख्य मुद्दा हा आहे की "सोडून द्यावे" हेच होत नाही. आळसाने अथवा लाजेकाजेने अयशस्वी लोक अश्या वचनांच्या मागे लपतात व स्वतःचे समाधान करून घेतात आणि चलाख लोक त्या वचनांचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतात. आणि मुख्य मुद्दा हा की या सगळ्यात "कृतीची जबाबदारी घेणे (accountability)" ह्या तत्वाला हरताळ फासला जातो. त्यामुळे ही प्रवृत्ती वरवर वाटते त्यापेक्षा अनेक पटींनी धोकादायक आहे.In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
हे मान्य आहेच.
>>> accountability
In reply to >>> accountability by प्यारे१
तुमचे उदाहरण "अकाउंटेबिलिटी"
In reply to तुमचे उदाहरण "अकाउंटेबिलिटी" by डॉ सुहास म्हात्रे
There was an important job to
In reply to तुमचे उदाहरण "अकाउंटेबिलिटी" by डॉ सुहास म्हात्रे
डिट्टो ऐसाच हो रहेला है!
अरे, जिओ मेरे विटेकर बुवा!
In reply to अरे, जिओ मेरे विटेकर बुवा! by संजय क्षीरसागर
वा, वा ! सर्जी, आपले धाग्यावर
१) मुळात प्रामाणिक माणसाला आपण अयशस्वी झालो असं कधीही वाटतं नाही. २) त्याचा शुद्ध हेतूच त्याला साथ देतो त्यामुळे परिणामांची तमा बाळगण्याचं कारणंच राहात नाही. ३) सरते शेवटी, प्रत्येक घटनेला अनंत फॅक्टर्स कारणीभूत आहेत ही उघड गोष्ट प्रामाणिक व्यक्तीला पूर्णपणे माहिती असते... त्यामुळे त्याला एखाद्या कृत्यातल्या अपयशाचा जसा विषाद नसतो तशी यशाची धुंदीही चढत नाही.वरच्या विधानांत तुम्ही "प्रामाणिक माणूस" आणि "स्थितप्रज्ञ माणूस" या दोघांत प्रचंड गल्लत करत आहात. त्यातच वर हायलाईट केलेल्या भागात तुम्ही प्रामाणिक माणूस परिणामांबद्दल निष्काळजी (ज्याला कधी कधी आपण बेजबाबदार असेही म्हणू शकतो) असतो असाही दावा तुम्ही करताय, त्यात भर म्हणून...३) सरते शेवटी, प्रत्येक घटनेला अनंत फॅक्टर्स कारणीभूत आहेत ही उघड गोष्ट प्रामाणिक व्यक्तीला पूर्णपणे माहिती असते... त्यामुळे त्याला एखाद्या कृत्यातल्या अपयशाचा जसा विषाद नसतो तशी यशाची धुंदीही चढत नाही.यातल्या हायलाईट केलेल्या भागामुळे "प्रामाणिक माणूस" आणि "सर्वज्ञानी माणूस" या दोघांत प्रचंड गल्लत करत आहात तुमचा प्रतिसाद वाचून एकच सांगावेसे वाटते : माझ्या अल्पमतीने लिहीलेल्या या लेखाचा मतितार्थ थोडक्यात आणि सहज समजेल अश्या सोप्या शब्दात याच लेखावरील या प्रतिसादात सांगितला आहे. तो तुम्ही वाचायची आवश्यकता आहे असे वाटते. लेख आणि प्रतिसादातले सर्व शब्द त्यांचे सर्वमान्य (शब्दकोषातले) अर्थ लक्षात ठेवून वापरले आहेत. नो प्रायव्हेट मिनिंग्ज अँड नो प्रायव्हेट लॉजिक, यु नो ! (तुम्हाला मधून मधून इंग्लिश लिहीणे आवडते, म्हणून हे शेवटचे वाक्य खास तुमच्यासाठी ! आप भी क्या याद करोंगे, सर्जी !) *** बाकी तुमचे नेहमीचे "प्रायव्हेट लॉजिक" आणि "दुसर्याने न सांगितलेले विचार स्वतः कल्पून त्याच्यावर थोपायची पद्धत" हे दोन्हीही आतापर्यंंत चागले माहित झाल्यामुळे तुमच्या इतर "इमॅजिन्ड/काँकॉक्टेड अॅलिगेशन्स" कडे दुर्लक्ष करत आहे... आण्भवाचं श्यान्पन, दुसरं काय ? :) . *** (मात्र, हा माझ्या धाग्याचा टीआरपी वाढविण्याचा तुमचा छुपा प्रयत्न आहे की काय ? आणि तसे असल्यास त्याबद्दल धन्यवाद द्यावे काय ? असे विचार मात्र जरूर मनात येउन गेले आहेत, हे नम्रपणे नमूद करत आहे :) =)) )In reply to वा, वा ! सर्जी, आपले धाग्यावर by डॉ सुहास म्हात्रे
इक्का, उपहास मुद्यांचा आभाव दर्शवतो
In reply to इक्का, उपहास मुद्यांचा आभाव दर्शवतो by संजय क्षीरसागर
भाग १:
"सत्याचा केवळ ते सत्य आहे म्हणून (काही क्षुल्लक योगायोग वगळता) आपोआप विजय आजपर्यंत ना कधी झाला ना भविष्यात होईल...."हे मान्य नाही तर मग मी विटेकरांच्या पहिल्या प्रतिसादाच्या प्रतिसादात जो प्रश्न विचारला आहे त्याचे "प्रामाणिक, लॉजीकल, सरळ-सरळ, मुख्य मुद्द्याला बगल न देता आणि उगाच नको त्या प्रायव्हेट लॉजिक वापरलेल्या विधानांचा वापर करून विपूल लेखन न करता" उत्तर द्या... मग पुढे बोलू. अन्यथा तुम्ही केवळ आमची करमणूक करता आहात, असे समजले जाईल. बर्याचदा अडचणींचे वाटणारे मुद्दे तुम्हाला दिसेनासे होतात (याला "सोईस्कर अंधत्व" किंवा "कन्व्ह्नियंट ब्लाइंडनेस" असे म्हणतात) आणि नसलेले मुद्दे दिसतात (याला "दिशाभूल करणे" किंवा "डायव्हर्शनरी टॅक्टीक्स" असे म्हणतात). याला उपाय म्हणून ("प्रिव्हेन्शन इझ बेटर दॅन क्युअर") तो प्रश्न तुमच्या सोईकरिता खाली परत देत आहे...हजारो वर्षांची गुलामगिरीची प्रथा आणि शेकडो वर्षांचा वसाहतवाद या दोन गोष्टी "सत्याचा असत्यावर विजय" होता काय हे सांगा, मग पुढे बोलू...ज्याना हा प्रश्न विचारला होता त्यानी या प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळून निष्कारण धर्म / अध्यात्म / इ मध्ये आणून सरळ वस्तूस्थितीवर आधारलेल्या या मूळ प्रश्नालाच बगल दिली होती. तरीसुद्धा तुम्हाला त्यात बरेच काही दिसले आणि तुम्ही त्यांत सद्य लेखात अध्याहृत नसलेल्या अनेक गोष्टींची भर टाकून एक लेखवजा प्रतिसाद लिहीला आहे. या प्रश्नाच्या उत्तरात त्याची पुनरावृत्ती होणार नाही अशी "होप अगेन्स्ट होप" अपेक्षा आहे. ======================= भाग २: आता तुम्हाला याच विषयावर अजून एक खास प्रश्न... जर "सत्याचा नेहमीच आपोआप विजय होतो आणि त्यासाठी संघर्षाची गरज नाही" हे सत्य आहे, तर "तुम्ही नेहमी जी अनेक वैश्विक आणि अढळ सत्ये सांगत असता" त्यासंबधात... अ) तुमची सत्ये दुसर्यांना समजावून सांगायला; "ती सत्ये ठासून-ठासून सांगणारे, सर्वसामान्य लेखक/प्रतिसादक लिहीतात त्यापेक्षा जास्त संख्येने आणि जास्त मोठे लेख/प्रतिसाद लिहायची" गरज तुम्हाला का वाटते * ? हा तुम्हाला पटलेल्या सत्याच्या बाजूने तुम्ही केलेला संघर्ष नाही का ? आणि इतके करून सुद्धा... आ) बहुतेक वेळेला ती सत्ये बहुसंख्य लोकांना अमान्य का असतात ? सत्याचा तर आपोआप विजय व्हायला पाहिजे नाही का ? या प्रश्नाचेही धर्म / अध्यात्म / इत्यादींना मध्ये न आणता "हे मी म्हणतो आहे म्हणून खरेच आहे" या धाटणीत नसलेले, सरळसरळ, वस्तूस्थितीवर आधारलेले लॉजिकल उत्तर अपेक्षित आहे, हेवेसांन. ...... * : इथे तुमच्या लेख/प्रतिसाद लिहीण्यावर काहीच आक्षेप नाही, तो तुमचा मानवी अधिकार आम्हाला पूर्ण मान्य आहे. पण जी गोष्ट आपोआप होते त्याकरिता इतका आटापिटा करण्याचे जे कारण आहे ते अपेक्षित आहे.In reply to भाग १: by डॉ सुहास म्हात्रे
सर, माझा मुद्दा फार साधायं
In reply to सर, आता तुम्ही प्रतिसाद न वाचता लिहायला लागलात! by संजय क्षीरसागर
तुमच्या इकडे बघा, तिकडे बघा
In reply to तुमच्या इकडे बघा, तिकडे बघा by डॉ सुहास म्हात्रे
गुलामगिरी, वसाहतवाद यांचा व्यक्तिगत प्रामाणिकपणाशी काहीही संबध न
In reply to गुलामगिरी, वसाहतवाद यांचा व्यक्तिगत प्रामाणिकपणाशी काहीही संबध न by संजय क्षीरसागर
अपेक्षेप्रमाणे तुमची उत्तरे
उत्तरांचा फॉर्मॅट
भाग १: येथे उत्तर लिहा.> भाग २: अ) प्रथम सहमत की असहमत हे सांगा. नंतर तुमच्या निवडलेल्या पर्यायाचे (मनाचे बोल आणि प्रायव्हेट लॉजिक वगळून) समर्थन करा.> अ) प्रथम सहमत की असहमत हे सांगा. नंतर तुमच्या निवडलेल्या पर्यायाचे (मनाचे बोल आणि प्रायव्हेट लॉजिक वगळून) समर्थन करा.> सूचना: १. अँगल्ड ब्रॅकेट्सच्या जागी तुमची उत्तरे अपेक्षित आहेत. २. फक्त मुद्द्याना धरून लिहीणे अत्यंत महत्वाचे आहे... कठीण आहे पण प्रयत्नाने जमते. ३. फक्त संसदिय भाषा वापरा. काही शब्द केलेल्या वाद-प्रतिवादाचे वजन कमी करतात. ४. फक्त तुमचे स्वतःचे मत अपेक्षित आहे. इतरांची मते (यात माझेही मत आलेच) सांगण्यासाठी इतर समर्थ आहेत. ५. प्रश्न फार सरळ आणि सोपे आहेत. उत्तरेही सरळ आणि सोपी अशीच अपेक्षित आहेत... कारण आम्ही काही फार पोचलेले ज्ञानी नाही. तेव्हा सामान्य व्यवहारी लोकांना समजेल अशी उत्तरे अपेक्षित आहेत. ५. "आपल्याला एखादी गोष्ट माहित नाही / आपले चुकले आहे" हे समजणे ही ज्ञानाची / चूक सुधारण्याची पहिली पायरी असते. या जगात सर्वज्ञानी असे कोणीच नाही (त्यांत मी आणि तुम्ही दोघेही आहोतच). तेव्हा ही पहिली पायरी प्रत्येकाला वारंवार चढावीच लागते. ही पायरी उघड्या डोळ्याने पाहून ती चढणे हे सर्व ज्ञानांचे मूलभूत ज्ञान आहे. ========= फॉर्मॅट जरा मोठा झाला. पण त्याचा हेतू उत्तरे सरळ, सोपी आणि प्रामाणिक करण्याचा आहे. उत्तरांची वाट पहात आहे.In reply to अपेक्षेप्रमाणे तुमची उत्तरे by डॉ सुहास म्हात्रे
अरेच्च्या...
उत्तरांचा फॉर्मॅट (सुधारित)
भाग १: (उत्तर) भाग २: अ) (प्रथम सहमत आहे / नाही यापैकी मान्य असलेला पर्याय नोंदवावा आणि मग त्या पर्यायाचे थोडक्यात मर्त्य मानवांना समजेल असे साध्या शब्दात समर्थन द्यावे.) आ) (प्रथम सहमत आहे / नाही यापैकी मान्य असलेला पर्याय नोंदवावा आणि मग त्या पर्यायाचे थोडक्यात मर्त्य मानवांना समजेल असे साध्या शब्दात समर्थन द्यावे.) सूचना वर दिल्या आहेतच, फक्त त्यांत अँगल्ड ब्रॅकेट्सऐवजी साध्या साध्या ब्रॅकेट्स असे वाचावे. तसदीबद्दल क्षमस्व.In reply to अरेच्च्या... by डॉ सुहास म्हात्रे
अग्गाग्गा
In reply to अरेच्च्या... by डॉ सुहास म्हात्रे
इक्काजी, उगीच बावन भागांची सिरियल कशाला काढतायं?
In reply to इक्काजी, उगीच बावन भागांची सिरियल कशाला काढतायं? by संजय क्षीरसागर
येक विचारू का?
In reply to येक विचारू का? by दिनेश सायगल
दिनेशश्री! चर्चा अत्यंत नेमक्या वळणावर आणल्याबद्दल आभार!
In reply to दिनेशश्री! चर्चा अत्यंत नेमक्या वळणावर आणल्याबद्दल आभार! by संजय क्षीरसागर
ओके.
In reply to इक्काजी, उगीच बावन भागांची सिरियल कशाला काढतायं? by संजय क्षीरसागर
माझ्या दोन साध्या प्रश्नांची
In reply to माझ्या दोन साध्या प्रश्नांची by डॉ सुहास म्हात्रे
इकाश्री, आता मात्र हद्द झाली!
In reply to इकाश्री, आता मात्र हद्द झाली! by संजय क्षीरसागर
बर मग मी माझे प्रश्न
In reply to बर मग मी माझे प्रश्न by डॉ सुहास म्हात्रे
इतिहास उगाळण्यात मला रस नाही
In reply to इतिहास उगाळण्यात मला रस नाही by संजय क्षीरसागर
चला भाग १ वर कोणथी उत्तर देण
In reply to चला भाग १ वर कोणथी उत्तर देण by डॉ सुहास म्हात्रे
@इस्पीक चा एक्का -
In reply to @इस्पीक चा एक्का - by पिंपातला उंदीर
धन्यवाद !
In reply to @इस्पीक चा एक्का - by पिंपातला उंदीर
प्रतिसादातले सगळे निकष, स्वतःच्या पोस्टवर अप्रकाशित झालेल्या
In reply to @इस्पीक चा एक्का - by पिंपातला उंदीर
स्वयंघोषित सर्वज्ञ व्यक्तींचे