सत्याचा जय...
शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही.
या वाक्यात सांगीतलेल्या शंभर नंबरी सत्याविरुद्ध समाजात काही वेळेस जाणीवपूर्वक तर इतर काही वेळेस अजाणतेपणाने विचार पसरवला जात असतो आणि त्यामुळे समाजावर किती अनिष्ट परिणाम होतो याबद्दल लिहायचे बरेच दिवस मनात होतेच.
पण, डॉ खरेंच्या प्रतिसादाने हातातले काम बाजूला ठेऊन आजच त्यावर खालील विचार लिहायला भाग पाडले, याबद्दल त्यांचे खास धन्यवाद !
============================================
"नेहमीच सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो.";
"गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते.";
"लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी.";
"लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" वगैरे, वगैरे, वगैरे...
अशी काल्पनिक, फसवी आणि भोंदू विधाने सर्वसामान्य माणसातल्या भोळसट कवीमनाला भुरळ घालतात. डोळे उघडे ठेवून आजूबाजूला पाहिले तर त्यातला फोलपणा दिसायला फार वेळ लागत नाही. दुर्दैवाने भावनेच्या पुरात वाहून जाणार्या माणसाला सर्वसाधारणपणे डोळे उघडे ठेऊन बघणे जरासे कठीणच जाते.
सर्वात वाईट गोष्ट ही की बर्याच वेळेस अशी विधाने आपले अपयश झाकण्यासाठी एक उत्तम पळवाट म्हणून सोईची वाटतात... अश्या फसव्या फुंकरीने मूळ आजारावर (अपयश) उपाय तर होत नाहीच पण तो अधिकच बळावतो (यशासाठी प्रयत्न करण्याऐवजी अपयशाचे समर्थन करून स्वतःचेच मानसिक खच्चिकरण करण्याची वृत्ती बळावते).
जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम परखडपणे सत्याला सामोरे जायची (ब्रूटल ऑनेस्टी) आणि वस्तूस्थितीकडे डोळे उघडे ठेऊन बघण्याची (लॉजिकल थिंकिंग) सवय अंगीकारली पाहिजे. मग त्यावरून झालेल्या बोधाने जो निर्णय पटेल तो ज्याचा त्याने घ्यावा... मात्र जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याच्या परिणामांची तयारी ठेवावी... त्या परिणामांची जबाबदारी झटकून टाकायला काल्पनिक समजूतींचा आधार घ्यायची घातक सवय सोडून देणे आवश्यक आहे. कोणीतरी म्हटले आहेच ना की, "यश म्हणजे अपयशाचा अभाव नाही तर अपयशातून उठून, अंग झटकून, परिस्थितीचा सामना करून तिच्यावर विजय मिळवणे आहे."
म्हणूनच सुरुवातीला दिलेल्या किंवा तत्सम फसव्या वाक्यांऐवजी खालील परखड सत्य स्विकारल्यास "मानसिक खरेपणा" आणि "ऐहीक यश" या दोन्हींची शक्य तेवढी "नैतीक सांगड" घालणे शक्य होईल:
१. प्रतिक्रिया
In reply to उत्तम. by विटेकर
In reply to लेख आवडला.विटुकाकाशी पुन्हा by जेपी
In reply to सहमत by योगी९००
In reply to विटेकरांचा लेख नसतांना त्यांच्याशी असहमती व्यक्त करणार्या by संजय क्षीरसागर
In reply to . by पोटे
In reply to . by पोटे
In reply to काय पोटेसाहेब, प्रत्येक by प्रचेतस
In reply to सिग्रेडी? वाय्झेड्ग्रेडी by प्यारे१
अमुक शिवाय तमुक नाही वगैरे का असतं?
मी माझ्यासाठी अमुक एक करतो/करेन पुरेसं नाही?
याची उत्तरे "आस्तिक-नास्तिक..." लेखाच्या पुढच्या भागात येतील, (जर्रा वेळ मिळू द्या).
आतासाठी फक्त दोनच विधाने:
१. माणूस समाजातले "बेट" (मी माझ्यासाठी अमुक एक करतो/करेन) म्हणण्याइतका वेगळा राहू शकणार नाही... संन्यास घेऊन जंगलात गेला तरी आजच्या काळात ते शक्य नाही. व्यक्ती व समाज यांची क्रिया-प्रतिक्रिया अनिवार्य आहे.
२. एडवर्ड मरो म्हणून गेलाय : "क्लिष्ट गोष्टींची समज आपल्याला काही काळाने येईलच. पण समोर असलेल्या उघडउघड गोष्टीच्या उकलीला त्यापेक्षा जास्त वेळ लागतो असेच दिसते (The obscure we see eventually. The completely obvious, it seems, takes longer)."
In reply to "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी" by यसवायजी
In reply to "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी" by यसवायजी
In reply to "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी" by यसवायजी
In reply to यसवायजी. खरेतर मराठी तील हे by विजुभाऊ
तो नसला तर नक्कीच दु:खदायक असतो, पण असला तर सुखदायक होईलच असे नाही.यचा दाहक अनुभव घेतला आहे, घेतोय. अजून एक असंच टुकार वाक्यः जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.
In reply to आरोग्याचे महत्त्व. by प्रभाकर पेठकर
In reply to थिअरेटिकली हे पटतय की, अपयश by कवितानागेश
In reply to खरंतर यात काहीच थिअरेटिकल by डॉ सुहास म्हात्रे
In reply to खरंतर यात काहीच थिअरेटिकल by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अपयशाचे कारन प्रत्येकवेळेस by कवितानागेश
In reply to महत्वाकांक्षी असावे की नसावे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सहसा 'यश' ही गोष्ट भौतिक by कवितानागेश
In reply to सहसा 'यश' ही गोष्ट भौतिक by कवितानागेश
मात्र आपण दुसर्याची परिस्थिती पडताळून पाहत असताना वापरलेले सधनतेचे आणि यशाचे निकष आपले नसून त्या व्यक्तीचे असायला हवे; स्वतःबद्दल पडताळणी करायची असेल तेव्हाच स्वतःचे निकष वापरणे योग्य होईल; इतके तारतम्य ठेवणे जरूर आहे. कारण सधनतेची आणि यशाची व्याख्या माणसागणीक वेगळी असू शकते.In reply to मला ते फळ्यावर लिहिलेले by सुहास..
दुचाकीची मळवटलेली मागची सीट म्हणजे स्वच्छ चारित्र्याच लक्षण "अरारा =)) =)) =)) =)) =))
In reply to माझी हि एक वीट by सुबोध खरे
In reply to माझी हि एक वीट by सुबोध खरे
In reply to "hope is a good thing, maybe by दशानन
In reply to . by पोटे
In reply to एकच मोठी लिस्ट करा की पोटे by प्यारे१
In reply to हा हा हा..!! ठ्ठो... by अस्वस्थामा
In reply to एकच मोठी लिस्ट करा की पोटे by प्यारे१
In reply to . by पोटे
In reply to ह्म्म by विटेकर
In reply to ह्म्म by विटेकर
In reply to सविस्तर प्रतिसादाबद्दल by डॉ सुहास म्हात्रे
In reply to छान by ऋषिकेश
प्रत्येक कोट हा स्थल-काल-व्यक्ती व मुख्यतः प्रसंग सापेक्ष असतो इतके लक्षात घेऊन हे कोट्स एक ललित म्हणून ऐकावे नी सोडून द्यावे. मुख्य मुद्दा हा आहे की "सोडून द्यावे" हेच होत नाही. आळसाने अथवा लाजेकाजेने अयशस्वी लोक अश्या वचनांच्या मागे लपतात व स्वतःचे समाधान करून घेतात आणि चलाख लोक त्या वचनांचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतात.
आणि मुख्य मुद्दा हा की या सगळ्यात "कृतीची जबाबदारी घेणे (accountability)" ह्या तत्वाला हरताळ फासला जातो. त्यामुळे ही प्रवृत्ती वरवर वाटते त्यापेक्षा अनेक पटींनी धोकादायक आहे.In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to >>> accountability by प्यारे१
In reply to तुमचे उदाहरण "अकाउंटेबिलिटी" by डॉ सुहास म्हात्रे
There was an important job to be done and Everybody was sure that Somebody would do it. Anybody could have done it, but Nobody did it. Somebody got angry about that, because it was Everybody’s job. Everybody thought Anybody could do it, but Nobody realized that Everybody wouldn’t do it. It ended up that Everybody blamed Somebody when Nobody did what Anybody could have.लय भारी :)
In reply to तुमचे उदाहरण "अकाउंटेबिलिटी" by डॉ सुहास म्हात्रे
मला अगदी प्रामाणिकपणाने असे वाटते की,चारित्र्याचे स्थान आयुष्यात नेहमीच अत्यंत वरचे आहे. त्याशिवाय असणारे यश अंतोगतत्वः अपयशाच्या आणि दु:खाच्या खाईतच नेते________________________ इक्कांनी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे लेखाची प्रेरणा, `प्रमोशन' या कथेवरचं डॉक्टर खर्यांच हे वाक्य आहे :
शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही.____________________________ आता कथेचाच संदर्भ घेऊन सगळी उकल कशी होते ते पाहाण्यासारखं आहे : १) मुळात प्रामाणिक माणसाला आपण अयशस्वी झालो असं कधीही वाटतं नाही. स्वतःला अपयशी समजणं हा इन्फिरिऑरिटी कॉप्लेक्स आहे आणि कंपॅरिजन हे त्याचं एकमेव कारण आहे. स्वतःशी प्रामाणिक असलेला, दुसर्याशी तुलना करुन स्वतःच्या यशाचं मोजमाप कधीही करत नाही. तो महत्वाकांक्षेला प्रामाणिकपणाशी तडजोडच करु देत नाही, त्यामुळे त्याची महत्वाकांक्षा सदैव त्याच्या काह्यात असते. ती त्याला कधीही ओवरपॉवर करु शकत नाही. आणि परिणामी, त्याला पश्चात्तापाची वेळ कधीही येत नाही. तो स्वतःच्या महत्वाकांक्षेपायी बायकोला पणाला लावायची बातच सोडा, कुणालाही कधीही वापरत नाही. नित्शेनं म्हटलंय : To use the other is the highest immorality. ___________________________ २) त्याचा शुद्ध हेतूच त्याला साथ देतो त्यामुळे परिणामांची तमा बाळगण्याचं कारणंच राहात नाही. जसा हेतू तशी कृती या न्यायनं त्यानं प्रत्येक प्रसंगात जवाबदारी सहज पेललेलीच असते. त्यामुळे कर्मविपाक, दैव वगैरे दिलासे त्याला लागत नाही. कामात अपयश येणं म्हणजे स्वतः अपयशी होणं अशी निर्बुद्ध कल्पनाच त्यानं केली नसल्यानं, तो परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेतो. स्वतःच चुकलं असेल तर दुरुस्त करतो, दुसरा आपल्यापेक्षा श्रेष्ठ असेल तर त्याच्या यशाचं कौतुक करतो. आणि दुसरा गैरमार्गानं यशस्वी झाला तर त्याला वैषम्य वाटण्याचा संबंधच येत नाही. तस्मात, त्याच्या लेखी, श्रीमंती किंवा गरीबी दैहिक किंवा मानसिक स्वास्थ्याशी रिलेट करुन, स्वतःच्या प्रामाणिकपणाला उजळ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. _____________________ ३) सरते शेवटी, प्रत्येक घटनेला अनंत फॅक्टर्स कारणीभूत आहेत ही उघड गोष्ट प्रामाणिक व्यक्तीला पूर्णपणे माहिती असते. त्यामुळे त्याला एखाद्या कृत्यातल्या अपयशाचा जसा विषाद नसतो तशी यशाची धुंदीही चढत नाही. त्याला फक्त एकच खात्री असते की आपल्या प्रामाणिकपणाचं स्वास्थ्य हे कोणत्याही लौकिक यशापयाशापेक्षा सदैव श्रेष्ठ आहे. आणि त्यासाठी त्याला कोणत्याही क्वोटची किंवा दिलासा देणार्या समर्थनाची यत्किंचितही गरज नसते. ______________________________ सरते शेवटी, `नेहमीच सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो'; याचा अर्थ लेखक समजतो तसा नाही. सत्य म्हणजे प्रामाणिकपणा. तो सदैव विजयी होतो कारण त्याचा विजय लौकिक यशावर अवलंबूनच नसतो. त्यामुळे लेखकानं निर्माण केलेली ही दुही : "मानसिक खरेपणा" आणि "ऐहीक यश" या दोन्हींची शक्य तेवढी "नैतीक सांगड" घालणे शक्य होईल. निरर्थक आहे. मानसिक खरेपणा हेच प्रामाणिकपणाचं दुसरं नांव आहे, त्याला पुन्हा नैतिकतेशी सांगड वगैरे घालावी लागत नाही आणि ऐहिक यशापयाशी त्याची तडजोडच होऊ शकत नाही. एका प्रामाणिकपणा पुढे बाकी सर्व गोष्टी व्यर्थ आहेत आणि हे समजलेला स्वतःला कधीही अपयशी मानत नाही. तस्मात, सत्याला जयापरायची क्षिती नसते. ते कायम विजयीच असतं
In reply to अरे, जिओ मेरे विटेकर बुवा! by संजय क्षीरसागर
१) मुळात प्रामाणिक माणसाला आपण अयशस्वी झालो असं कधीही वाटतं नाही.
२) त्याचा शुद्ध हेतूच त्याला साथ देतो त्यामुळे परिणामांची तमा बाळगण्याचं कारणंच राहात नाही.
३) सरते शेवटी, प्रत्येक घटनेला अनंत फॅक्टर्स कारणीभूत आहेत ही उघड गोष्ट प्रामाणिक व्यक्तीला पूर्णपणे माहिती असते... त्यामुळे त्याला एखाद्या कृत्यातल्या अपयशाचा जसा विषाद नसतो तशी यशाची धुंदीही चढत नाही.
वरच्या विधानांत तुम्ही "प्रामाणिक माणूस" आणि "स्थितप्रज्ञ माणूस" या दोघांत प्रचंड गल्लत करत आहात. त्यातच वर हायलाईट केलेल्या भागात तुम्ही प्रामाणिक माणूस परिणामांबद्दल निष्काळजी (ज्याला कधी कधी आपण बेजबाबदार असेही म्हणू शकतो) असतो असाही दावा तुम्ही करताय,
त्यात भर म्हणून...
३) सरते शेवटी, प्रत्येक घटनेला अनंत फॅक्टर्स कारणीभूत आहेत ही उघड गोष्ट प्रामाणिक व्यक्तीला पूर्णपणे माहिती असते... त्यामुळे त्याला एखाद्या कृत्यातल्या अपयशाचा जसा विषाद नसतो तशी यशाची धुंदीही चढत नाही.
यातल्या हायलाईट केलेल्या भागामुळे "प्रामाणिक माणूस" आणि "सर्वज्ञानी माणूस" या दोघांत प्रचंड गल्लत करत आहात
तुमचा प्रतिसाद वाचून एकच सांगावेसे वाटते : माझ्या अल्पमतीने लिहीलेल्या या लेखाचा मतितार्थ थोडक्यात आणि सहज समजेल अश्या सोप्या शब्दात याच लेखावरील या प्रतिसादात सांगितला आहे. तो तुम्ही वाचायची आवश्यकता आहे असे वाटते.
लेख आणि प्रतिसादातले सर्व शब्द त्यांचे सर्वमान्य (शब्दकोषातले) अर्थ लक्षात ठेवून वापरले आहेत. नो प्रायव्हेट मिनिंग्ज अँड नो प्रायव्हेट लॉजिक, यु नो ! (तुम्हाला मधून मधून इंग्लिश लिहीणे आवडते, म्हणून हे शेवटचे वाक्य खास तुमच्यासाठी ! आप भी क्या याद करोंगे, सर्जी !)
***
बाकी तुमचे नेहमीचे "प्रायव्हेट लॉजिक" आणि "दुसर्याने न सांगितलेले विचार स्वतः कल्पून त्याच्यावर थोपायची पद्धत" हे दोन्हीही आतापर्यंंत चागले माहित झाल्यामुळे तुमच्या इतर "इमॅजिन्ड/काँकॉक्टेड अॅलिगेशन्स" कडे दुर्लक्ष करत आहे... आण्भवाचं श्यान्पन, दुसरं काय ? :) .
***
(मात्र, हा माझ्या धाग्याचा टीआरपी वाढविण्याचा तुमचा छुपा प्रयत्न आहे की काय ? आणि तसे असल्यास त्याबद्दल धन्यवाद द्यावे काय ? असे विचार मात्र जरूर मनात येउन गेले आहेत, हे नम्रपणे नमूद करत आहे :) =)) )In reply to वा, वा ! सर्जी, आपले धाग्यावर by डॉ सुहास म्हात्रे
ध्येय भौतीक असो अथवा अधिभौतीक असो, त्याला प्रामाणिकपणाचा पाया आवश्यक असतो.यावर दुमत कुठेयं? मतभेद इथे आहे :
"सत्याचा केवळ ते सत्य आहे म्हणून (काही क्षुल्लक योगायोग वगळता) आपोआप विजय आजपर्यंत ना कधी झाला ना भविष्यात होईल. सत्याला असत्याशी झगडल्याशिवाय विजय मिळत नाही."तुमच्या लेखी सत्याला (म्हणजे प्रामाणिकापणाला) असत्याशी (अप्रामाणिकपणाशी) झगडा करुन `विजय' मिळवावा लागतो. आणि मी म्हणतो, प्रामाणिक माणसाला अप्रमाणिकतेशी झगडा करण्याची आवश्यकताच नाही. अप्राणिक माणूस स्वतःच्या मनातल्या अंतर्द्वंदामुळे (सुरुवातीपासून आणि) नेहमी, पराभूतच असतो. मग लौकीकार्थानं तो कितीही यशस्वी असो आणि दुनियेला वरुन काहीही दाखवो. आणि प्रामाणिकपणा इतका सर्वोच्च आहे की त्याला अप्रामाणिकतेचा पराभव करण्याची गरजच नसते, मग लौकिकार्थानं तो कितीही अपयशी असो. _________________________________ "सत्याचा केवळ ते सत्य आहे म्हणून (काही क्षुल्लक योगायोग वगळता) आपोआप विजय आजपर्यंत ना कधी झाला ना भविष्यात होईल...." सत्य (म्हणजे प्रामाणिकपणा) `योगायोगानं विजयी' होत नाही. प्रामाणिक असणं हाच विजय आहे. तो स्वत्वाचा इतका मोठा गौरव आहे की अशी व्यक्ती अंगचोरपणा किंवा लौकिक यशापयश इतक्या शुल्लक गोष्टींचा कधीही विचार करत नाही. __________________________ लौकिकात काहीही करुन यशस्वी झालं पाहिजे या महत्वाकांक्षेपायी (जी निवाळ इन्फिरिऑरिटी काँप्लेक्सचा, पाश्चिमात्यांशी तुलना केल्याचा परिणाम आहे), भारताची मानसिकताच भ्रष्ट झालीये. भारतीय मानसिकतेनं स्वतःचा प्रामाणिकपणा गमावलायं. प्रामाणिकपणा, आपल्याच मौलिक विचारधारेशी फारकत घेऊन येत नाही तर, प्रामाणिकपणा हा सदैव विजयी आहे या नि:संशय विश्वासातून येतो. सत्याचा विजय योगायोगानं कधीही होत नाही, असत्य कायम पराभूत आहे आणि असत्याच्या पराभूत असण्यातच सत्याचा विजय आहे. त्यासाठी सत्याला, असत्याशी झगडण्याची आवश्यकताच नाही! (संपादित)
In reply to इक्का, उपहास मुद्यांचा आभाव दर्शवतो by संजय क्षीरसागर
"सत्याचा केवळ ते सत्य आहे म्हणून (काही क्षुल्लक योगायोग वगळता) आपोआप विजय आजपर्यंत ना कधी झाला ना भविष्यात होईल...."
हे मान्य नाही तर मग मी विटेकरांच्या पहिल्या प्रतिसादाच्या प्रतिसादात जो प्रश्न विचारला आहे त्याचे "प्रामाणिक, लॉजीकल, सरळ-सरळ, मुख्य मुद्द्याला बगल न देता आणि उगाच नको त्या प्रायव्हेट लॉजिक वापरलेल्या विधानांचा वापर करून विपूल लेखन न करता" उत्तर द्या... मग पुढे बोलू. अन्यथा तुम्ही केवळ आमची करमणूक करता आहात, असे समजले जाईल.
बर्याचदा अडचणींचे वाटणारे मुद्दे तुम्हाला दिसेनासे होतात (याला "सोईस्कर अंधत्व" किंवा "कन्व्ह्नियंट ब्लाइंडनेस" असे म्हणतात) आणि नसलेले मुद्दे दिसतात (याला "दिशाभूल करणे" किंवा "डायव्हर्शनरी टॅक्टीक्स" असे म्हणतात). याला उपाय म्हणून ("प्रिव्हेन्शन इझ बेटर दॅन क्युअर") तो प्रश्न तुमच्या सोईकरिता खाली परत देत आहे...
हजारो वर्षांची गुलामगिरीची प्रथा आणि शेकडो वर्षांचा वसाहतवाद या दोन गोष्टी "सत्याचा असत्यावर विजय" होता काय हे सांगा, मग पुढे बोलू...
ज्याना हा प्रश्न विचारला होता त्यानी या प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळून निष्कारण धर्म / अध्यात्म / इ मध्ये आणून सरळ वस्तूस्थितीवर आधारलेल्या या मूळ प्रश्नालाच बगल दिली होती. तरीसुद्धा तुम्हाला त्यात बरेच काही दिसले आणि तुम्ही त्यांत सद्य लेखात अध्याहृत नसलेल्या अनेक गोष्टींची भर टाकून एक लेखवजा प्रतिसाद लिहीला आहे. या प्रश्नाच्या उत्तरात त्याची पुनरावृत्ती होणार नाही अशी "होप अगेन्स्ट होप" अपेक्षा आहे.
=======================
भाग २:
आता तुम्हाला याच विषयावर अजून एक खास प्रश्न...
जर "सत्याचा नेहमीच आपोआप विजय होतो आणि त्यासाठी संघर्षाची गरज नाही" हे सत्य आहे, तर "तुम्ही नेहमी जी अनेक वैश्विक आणि अढळ सत्ये सांगत असता" त्यासंबधात...
अ) तुमची सत्ये दुसर्यांना समजावून सांगायला; "ती सत्ये ठासून-ठासून सांगणारे, सर्वसामान्य लेखक/प्रतिसादक लिहीतात त्यापेक्षा जास्त संख्येने आणि जास्त मोठे लेख/प्रतिसाद लिहायची" गरज तुम्हाला का वाटते * ? हा तुम्हाला पटलेल्या सत्याच्या बाजूने तुम्ही केलेला संघर्ष नाही का ?
आणि इतके करून सुद्धा...
आ) बहुतेक वेळेला ती सत्ये बहुसंख्य लोकांना अमान्य का असतात ? सत्याचा तर आपोआप विजय व्हायला पाहिजे नाही का ?
या प्रश्नाचेही धर्म / अध्यात्म / इत्यादींना मध्ये न आणता "हे मी म्हणतो आहे म्हणून खरेच आहे" या धाटणीत नसलेले, सरळसरळ, वस्तूस्थितीवर आधारलेले लॉजिकल उत्तर अपेक्षित आहे, हेवेसांन.
......
* : इथे तुमच्या लेख/प्रतिसाद लिहीण्यावर काहीच आक्षेप नाही, तो तुमचा मानवी अधिकार आम्हाला पूर्ण मान्य आहे. पण जी गोष्ट आपोआप होते त्याकरिता इतका आटापिटा करण्याचे जे कारण आहे ते अपेक्षित आहे.In reply to भाग १: by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सर, आता तुम्ही प्रतिसाद न वाचता लिहायला लागलात! by संजय क्षीरसागर
In reply to तुमच्या इकडे बघा, तिकडे बघा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to गुलामगिरी, वसाहतवाद यांचा व्यक्तिगत प्रामाणिकपणाशी काहीही संबध न by संजय क्षीरसागर
उत्तरांचा फॉर्मॅट
भाग १: येथे उत्तर लिहा.> भाग २: अ) प्रथम सहमत की असहमत हे सांगा. नंतर तुमच्या निवडलेल्या पर्यायाचे (मनाचे बोल आणि प्रायव्हेट लॉजिक वगळून) समर्थन करा.> अ) प्रथम सहमत की असहमत हे सांगा. नंतर तुमच्या निवडलेल्या पर्यायाचे (मनाचे बोल आणि प्रायव्हेट लॉजिक वगळून) समर्थन करा.> सूचना: १. अँगल्ड ब्रॅकेट्सच्या जागी तुमची उत्तरे अपेक्षित आहेत. २. फक्त मुद्द्याना धरून लिहीणे अत्यंत महत्वाचे आहे... कठीण आहे पण प्रयत्नाने जमते. ३. फक्त संसदिय भाषा वापरा. काही शब्द केलेल्या वाद-प्रतिवादाचे वजन कमी करतात. ४. फक्त तुमचे स्वतःचे मत अपेक्षित आहे. इतरांची मते (यात माझेही मत आलेच) सांगण्यासाठी इतर समर्थ आहेत. ५. प्रश्न फार सरळ आणि सोपे आहेत. उत्तरेही सरळ आणि सोपी अशीच अपेक्षित आहेत... कारण आम्ही काही फार पोचलेले ज्ञानी नाही. तेव्हा सामान्य व्यवहारी लोकांना समजेल अशी उत्तरे अपेक्षित आहेत. ५. "आपल्याला एखादी गोष्ट माहित नाही / आपले चुकले आहे" हे समजणे ही ज्ञानाची / चूक सुधारण्याची पहिली पायरी असते. या जगात सर्वज्ञानी असे कोणीच नाही (त्यांत मी आणि तुम्ही दोघेही आहोतच). तेव्हा ही पहिली पायरी प्रत्येकाला वारंवार चढावीच लागते. ही पायरी उघड्या डोळ्याने पाहून ती चढणे हे सर्व ज्ञानांचे मूलभूत ज्ञान आहे. ========= फॉर्मॅट जरा मोठा झाला. पण त्याचा हेतू उत्तरे सरळ, सोपी आणि प्रामाणिक करण्याचा आहे. उत्तरांची वाट पहात आहे.In reply to अपेक्षेप्रमाणे तुमची उत्तरे by डॉ सुहास म्हात्रे
उत्तरांचा फॉर्मॅट (सुधारित)
भाग १: (उत्तर) भाग २: अ) (प्रथम सहमत आहे / नाही यापैकी मान्य असलेला पर्याय नोंदवावा आणि मग त्या पर्यायाचे थोडक्यात मर्त्य मानवांना समजेल असे साध्या शब्दात समर्थन द्यावे.) आ) (प्रथम सहमत आहे / नाही यापैकी मान्य असलेला पर्याय नोंदवावा आणि मग त्या पर्यायाचे थोडक्यात मर्त्य मानवांना समजेल असे साध्या शब्दात समर्थन द्यावे.) सूचना वर दिल्या आहेतच, फक्त त्यांत अँगल्ड ब्रॅकेट्सऐवजी साध्या साध्या ब्रॅकेट्स असे वाचावे. तसदीबद्दल क्षमस्व.In reply to अरेच्च्या... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अरेच्च्या... by डॉ सुहास म्हात्रे
कारण अपयश मागे सारून सतत स्वतःच्या बळावर प्रामाणिक प्रयत्न करून सधन व सुखी होण्याचा प्रयत्न करायला उत्साहीत करण्याऐवजी अशी वाक्ये अपयशाचे भ्रामक समर्थन करत समाजाला पंगू करण्याचे काम करत असतातआणि (पुढे स्पष्टीकरण देतांना) प्रतिसादात, तुम्ही म्हटलंय :
अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर ध्येय भौतीक असो अथवा अधिभौतीक असो, त्याला प्रामाणिकपणाचा पाया आवश्यक असतोतुम्हाला `प्रामाणिकपणा' म्हणजे काय याची नक्की कल्पनाच नसल्यानं, तुमच्या लेखात कमालीचा वैचारिक गोंधळ झालायं. प्रामाणिकपणाला इंग्रजीत Integrity असं म्हटलंय, कारण इंटेग्रिटी इंटीग्रेटस अ पर्सन! प्रामाणिकाता व्यक्तीला एकसंध करते. प्रामाणिक व्यक्ती स्वतःबद्दल इतकी निर्धास्त असते की तुम्ही लेखात लिहीलेल्या कोणत्याही वाक्याची तिला गरज नसते. मी आतापर्यंत हेच सांगतोयं. आणि तुम्ही स्वतःच्याच प्रतिसादाविरुद्ध लिहितायं! थोडक्यात, प्रामाणिक व्यक्ती (तुम्ही लेखात म्हटल्याप्रमाणे) नाऊमेद होते ही तुमची केवळ व्यक्तिगत आणि निराधार कल्पना आहे. ________________________ आणि मजा म्हणजे, ज्या `समाजाला पंगू करण्याचे काम करणार्या मानसिकतेबद्दल' तुम्ही लिहीलंय, तिचं कारण ती वाक्यं नसून मोठ्याप्रमाणावर बोकाळलेला (व्यक्तिगत) अप्रामाणिकपणाच आहे! थोडक्यात, भारतीय समाजात बोकाळलेला भ्रष्टाचार हे त्याच्या निंद्य होण्याचं उघड कारण आहे. आणि तुम्ही ते (तुम्हालाच नीट अर्थ न कळलेल्या) वाक्यांवर थोपतायं. भ्रष्टाचार हा इन्फिरिऑरिटी काँप्लेक्सचा परिणाम आहे आणि तो ऐहिक सुखाच्या तुलनेमुळे होतो ही उघड गोष्ट आहे. प्रामाणिक व्यक्ती अशा मानसिकतेपासून मुक्त असते. समाज हे व्यक्तिसमूहाचं केवळ नांव आहे. तस्मात, व्यक्ती जर प्रामाणिक झाली तर समाज बदलेल. यापेक्षा सोप्या शब्दात मी लिहू शकत नाही. (संपादित)
In reply to इक्काजी, उगीच बावन भागांची सिरियल कशाला काढतायं? by संजय क्षीरसागर
प्रामाणिक व्यक्ती स्वतःबद्दल इतकी निर्धास्त असते की तुम्ही लेखात लिहीलेल्या कोणत्याही वाक्याची तिला गरज नसते. मी आतापर्यंत हेच सांगतोयं. आणि तुम्ही स्वतःच्याच प्रतिसादाविरुद्ध लिहितायं! हा लेखनातला अंतर्विरोध, लेखन निरुपयोगी ठरवतो.असं तुम्ही म्हणताय. पण प्रामाणिक असून नाउमेद झालेले, आणि व्यवस्थेचा बळी ठरून आत्महत्या केलेल कित्येकजण मला माहिती आहेत. ते तुमच्या मते यशस्वी होते का? क)
भ्रष्टाचार हा इन्फिरिऑरिटी काँप्लेक्सचा परिणाम आहे आणि तो ऐहिक सुखाच्या तुलनेमुळे होतो ही उघड गोष्ट आहे. प्रामाणिक व्यक्ती अशा मानसिकतेपासून मुक्त असते.नक्की का? कित्येक राजकारणी जे वैयक्तिक रीत्या अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे असतात ते पक्षाचा फायदा, पक्षासाठी पैसे गोळा करने अशा कारणांनी उद्योगपतींकडून देणग्या घेतात आणि मग त्याना काही ना काही बदल्यात द्यावेच लागते. यात इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स कुठे आला? शिवाय तो राजकारणी तर वैयक्तिक आयुष्यात अत्यंत प्रामाणिक आहे. मग आता? केवळ कुतुहल म्हणून विचारत आहे. तुम्ही सगळं सोपं करून सांगता असं तुमच्या पानावर लिहिलेलं पाहिलं. शक्य असल्यास या शंकांचे उत्तर देऊन उपकार करावेत.
In reply to येक विचारू का? by दिनेश सायगल
अ) सत्य म्हणजे काय? आणि असत्य म्हणजे काय? तुम्ही जे म्हणता तेच प्रत्येकाचं सत्य असेल का? रामायण ही कथा आहे म्हटलं तरी रामाचं सत्य आणि रावणाचं सत्य एकच असेल का?पहिली गोष्ट, सत्याचा आध्यात्मिक अर्थ बाजूला ठेवू कारण तो चर्चेचा विषय नाही. आणि सत्याच्या प्रचलित अर्थानं विषय पुढे नेऊ. सत्य म्हणजे प्रामाणिकपणा (इक्कानी म्हटलंय तो `मनाचा खरेपणा'). प्रामाणिकपणा हा गुण आहे त्यामुळे तो व्यक्तिपरत्वे बदलत नाही. थोडक्यात, प्रामाणिकपणा महत्त्वाचायं आणि तो सर्वांसाठी एकच आहे. `जे आत तेच बाहेर' ही प्रामाणिकतेची कसोटी आहे. प्रामाणिकपणात नैतिकता अंगभूतच आहे त्यामुळे प्रामाणिक व्यक्ती आपसूक नैतिक असते.
ब) प्रामाणिक व्यक्ती स्वतःबद्दल इतकी निर्धास्त असते की तुम्ही लेखात लिहीलेल्या कोणत्याही वाक्याची तिला गरज नसते. पण प्रामाणिक असून नाउमेद झालेले, आणि व्यवस्थेचा बळी ठरून आत्महत्या केलेल कित्येकजण मला माहिती आहेत. ते तुमच्या मते यशस्वी होते का?तुमच्या निरिक्षणाशी मी सहमत आहे. तरी देखिल आत्महत्त्यामागची कारणमिमांसा लक्षात घेण्याजोगी आहे. मी आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, प्रामाणिकता व्यक्तीला एकसंध करते आणि ही एकसंधता जर कायम राहिली तर व्यक्ती नाऊमेद होणं असंभव आहे. जीवनातलं अपयश म्हणजे `आपण अपयशी ठरलो' असं जेव्हा एखाद्याला वाटतं तेव्हा तो स्वतःपासून विभक्त होतो आणि त्यामुळे स्वतःला संपवण्याचा विचार करतो. थोडक्यात, प्रामाणिक व्यक्तीचा गैरसमज तिला आत्महत्त्येसाठी उद्युक्त करतो, प्रामाणिकपणा नाही. अशा व्यक्तीचा गैरसमज दूर झाला तर ती नाऊमेद होणं अशक्य आहे. दोष विचारसरणीचा आहे, प्रमाणिकपणाचा नाही.
क) भ्रष्टाचार हा इन्फिरिऑरिटी काँप्लेक्सचा परिणाम आहे आणि तो ऐहिक सुखाच्या तुलनेमुळे होतो ही उघड गोष्ट आहे. प्रामाणिक व्यक्ती अशा मानसिकतेपासून मुक्त असते. नक्की का? कित्येक राजकारणी जे वैयक्तिक रीत्या अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे असतात ते पक्षाचा फायदा, पक्षासाठी पैसे गोळा करने अशा कारणांनी उद्योगपतींकडून देणग्या घेतात आणि मग त्याना काही ना काही बदल्यात द्यावेच लागते. यात इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स कुठे आला? शिवाय तो राजकारणी तर वैयक्तिक आयुष्यात अत्यंत प्रामाणिक आहे. मग आता?मुळात दुसर्यावर सत्ता गाजवण्याची वृत्तीच इन्फिरिऑरिटी काँप्लेक्सचा परिणाम आहे. थोडक्यात, स्वतःला सिद्ध करण्यासाठी राजकारण्यांना जनतेच्या शिक्कामोर्तबाची (नितांत) गरज असते. त्यामुळे (जवळजवळ) सर्व राजकारणी कमालीच्या न्यूनगंडानं पछाडलेले असतात. कधी पराभूत राजकारणी पाहिला तर तो हवा गेलेल्या टायरसारखा बिनकामाचा झालेला असतो. त्याची सगळी उर्जा जनमतावर अवलंबून असते आणि जनतेनं पराभूत केल्यावर त्याला लोकात मिसळायची देखिल शरम वाटू लागते. लाखात एखादी व्यक्ती राजकारण, जनतेची सेवा या प्रामाणिक हेतूनं अंगिकारते. अशा व्यक्तीला जनता आपण होऊन मदत करते, त्याला कुणाकडे याचना करावी लागत नाही. ज्याला अशी याचना करावी लागते तो फक्त पक्षाच्या नांवाखाली स्वतःचाच स्वार्थ साधण्याचा अप्रामाणिकपणा करत असतो. स्वच्छ चारित्र्याच्या एकाही राजकारण्याला कधीही खोटेपणा करावा लागत नाही. थोडक्यात, ज्याचा हेतू प्रामाणिक आहे त्यानं तत्त्वाशी तडजोड करण्याचा प्रश्नच येत नाही कारण जनहिताच्या त्याच्या (मूळ) प्रामाणिक हेतूतच, त्याच्या सर्व तत्वाचीं एकरुपता झालेली असते. असा प्रामाणिक राजकारणी कायम निर्धास्त असतो कारण त्याला नेतृत्व न देण्यात जनतेचाच तोटा असतो. त्यामुळे, यदाकदाचित तो पराभूत झाला तरी त्याला जनतेची सेवा करण्याची एक संधी हुकली यापलिकडे खेद होण्याची शक्यता नसते.
In reply to दिनेशश्री! चर्चा अत्यंत नेमक्या वळणावर आणल्याबद्दल आभार! by संजय क्षीरसागर
सत्य म्हणजे प्रामाणिकपणा (इक्कानी म्हटलंय तो `मनाचा खरेपणा'). प्रामाणिकपणा हा गुण आहे त्यामुळे तो व्यक्तिपरत्वे बदलत नाही. थोडक्यात, प्रामाणिकपणा महत्त्वाचायं आणि तो सर्वांसाठी एकच आहे.यावर विचार करण्यासाठी मी वर राम आणि रावणाचं उदाहरण दिलं. आता आर्य आणि अनार्य यांचं उदाहरण पाहू. (इथे मुद्दामच हिंदू राजे विरुद्ध मुस्लिम आक्रमक हे उदाहरण घेतले नाही, कारण त्याला इतर फाटे फुटू शकतात.) आर्यांच्या दृष्टीने अनार्य हे यज्ञाचा विध्वंस करणारे, म्हणून त्यांना नामशेष केलं पाहिजे. तर अनार्यांच्या दृष्टीने आर्य हे आक्रमक, त्यांचे किल्ले पाडणारे. दोघेही आपल्या जागी बरोबर आहेत. दोघेही प्रमाणिकपणे आपल्या सत्याच्या रक्षणासाठी संघर्ष करत आहेत. आणि दोघांच्या दृष्टीने दुसरा असत्याची बाजू घेत आहे. दोघांनाही आपण अप्रामाणिक म्हणू शकणार नाही. आता या घटनेत सत्य एक दिसतं का? तर नाही. इथे सत्य विभागलेलं दिसतं. इथे तुम्ही कोणाला प्रामाणिक्/सत्याच्या बाजूने म्हणणार? मानवी स्वभावाचा आणि व्यवहाराचा जिथे प्रश्न येतो तिथे अन्यत्र विटेकर बुवांनी म्हटल्याप्रमाणे "सूर्य पूर्वेला उगवतो" यासारखं २+२=४ असं उत्तर दरवेळी देता येत नाही.
In reply to इक्काजी, उगीच बावन भागांची सिरियल कशाला काढतायं? by संजय क्षीरसागर
In reply to माझ्या दोन साध्या प्रश्नांची by डॉ सुहास म्हात्रे
In reply to इकाश्री, आता मात्र हद्द झाली! by संजय क्षीरसागर
In reply to बर मग मी माझे प्रश्न by डॉ सुहास म्हात्रे
In reply to इतिहास उगाळण्यात मला रस नाही by संजय क्षीरसागर
In reply to चला भाग १ वर कोणथी उत्तर देण by डॉ सुहास म्हात्रे
In reply to @इस्पीक चा एक्का - by पिंपातला उंदीर
In reply to @इस्पीक चा एक्का - by पिंपातला उंदीर
In reply to @इस्पीक चा एक्का - by पिंपातला उंदीर
उत्तम.