भा.रा.तांबे यांच्या निवडक कविता - १. रिकामे मधुघट
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
नमस्कार लोकहो,
राजकवि श्री. भास्कर रामचंद्र तांबे हे मराठी साहित्यातील अमोल रत्न. आमचे अत्यंत आवडते कवि.
दिनांक ७ डिसेंबर १९४१ रोजी हा प्रतिभावंत काळाच्या पडद्याआड गेला. मराठी काव्याचे 'मधुघट रिकामे' झाले. खरे तर भास्कररावांना आदरांजली म्हणून आम्ही "रिकामे मधुघट" ही मालिका ७ डिसेंबर रोजीच सुरू करणार होतो. पण ते जमले नाही.
भास्कररावांनी मराठीला दिलेल्या अमूल्य ठेव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून हा लेखनप्रपंच आहे. या मालिकेच्या माध्यमातून भास्कररावांच्या काही निवडक कविता 'मिसळपाव' वर जतन करण्याचा आमचा संकल्प आहे.
आज तांब्याच्या कविता वाचायला मिळणे ही गोष्टच दुर्लभ झाली आहे. आमचा हा संकल्प आमचे कुलदैवत श्री व्याडेश्वराच्या कृपेने सिद्धीस गेल्यास 'मिसळपाव'वर मराठी भाषेतील ही रत्ने कायमस्वरूपी जतन होतील.
हा संकल्प सिद्धीस जावो हीच श्री व्याडेश्वरचरणी प्रार्थना.
भा.रा. तांबे यांच्या पुण्यस्मृतीस आमचे विनम्र अभिवादन.
आपला,
(भा.रा.वलेला) धोंडोपंत
रिकामे मधुघट
मधु मागशि माझ्या सख्या, परिं
मधुघटचि रिकामे पडति घरीं !..... ध्रु.
आजवरी कमळाच्या द्रोणी
मधू पाजिला तुला भरोनी,
सेवा ही पूर्विची स्मरोनी
करिं रोष न सखया, दया करी.....१
नैवेद्याची एकच वाटी
अता दुधाची माझ्या गांठीं;
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणीं कशी तरी......२
तरुण-तरुणिंची सलज्ज कुजबुज,
वृक्षझर्यांचे गूढ मधुर गुज,
संसाराचे मर्म हवें तुज,
मधु पिळण्या परि रे बळ न करीं !......३
ढळला रे ढळला दिन सखया
संध्याछाया भिवविति हृदया,
अता मधूचें नांव कासया?
लागले नेत्र रे पैलतिरीं........४
मधु मागशि माझ्या सख्या, परी
मधुघटचि रिकामे पडति घरीं !
राजकवि भास्कर रामचंद्र तांबे
लेखनकाळ - १९३३ , ग्वाल्हेर.
वाचने
48851
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
सहर्ष स्वागत!
वा! अभिनंदन
In reply to वा! अभिनंदन by ऋषिकेश
लवकरच काही बदल..
चांगला संकल्प
भा. रा. तांबे
उत्तम/श्लेष
In reply to उत्तम/श्लेष by नंदन
सहमत!
संकल्पास शुभेच्छा !!!
धन्यवाद
या कवितेबद्दल थोडेसे
In reply to या कवितेबद्दल थोडेसे by धोंडोपंत
सुरेख रसग्रहण!
कवितेचा जन्म..
In reply to कवितेचा जन्म.. by सुनील
असेच ऐकले होते
जन पळ भर वर कव्हा लिव्हणार
In reply to जन पळ भर वर कव्हा लिव्हणार by बाबुराव
बाबूराव
उत्कृष्ट !!!!!
तांबे आणि संगीतकार
वा..
रसग्रहण आवडले.
वा
वा
In reply to वा by केशवसुमार
अवश्य..
हे कोण गे आई!?
In reply to हे कोण गे आई!? by कर्नलतपस्वी
ही कविता माझ्या मुलीला
निरागस बालकविता