मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पेन्सिल शेडींग - स्मिता पाटील

बबन ताम्बे · · मिपा कलादालन
smita

वाचने 40586 वाचनखूण प्रतिक्रिया 63

प्रभाकर पेठकर 26/08/2014 - 13:49
सुंदर. जीवणी, किंचित मोठी वाटते आहे का?

एस 26/08/2014 - 15:00
मुळात चित्र किती हुबेहूब आहे ह्यापेक्षा पेन्सिल शेडिंगच्या मूलभूत तत्त्वांचा वापर किती खुबीने केलाय आणि त्यातून त्या व्यक्तीची अनुभूती किंवा चित्रकाराला जे दाखवायचं आहे ते प्रेक्षकांपर्यंत किती परिणामकारकतेने पोहोचतेय हे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने स्मिता पाटील खूपच बोलकी उतरलीय ह्या चित्रात. मस्त. अगदी छायाचित्रच आहे की काय असे वाटावे इतके हुबेहूब चित्र काढण्याला हायपररिअलिस्टिक पेंटिंग म्हणतात. हे तैलरंग आणि ग्राफाईट (पेन्सिल्/पावडर) या माध्यमांत चांगले जमते. जलरंगात मात्र रिअलिस्टिक परिणाम त्यांच्या तरलतेने आणि पारदर्शकपणामुळे आणणे अवघड असते. तसा प्रयत्न केल्यास त्या चित्रातील मजाही निघून जाते. म्हणून माध्यमाच्या मर्यादा आणि शक्तिस्थळे दोन्ही नीट समजून घेऊन त्यातून चांगले काहीतरी फुलवणे. मग नंतर हळूहळू आपली स्वतःची स्वतंत्र शैली विकसित करणे हे महत्त्वाचे. हायपररिअलिस्टिक पेन्सिल शेडिंगबद्दल तुम्हांला कबूल केल्याप्रमाणे अजूनही व्यनि न केल्याबद्दल खरंच सॉरी. खूप सविस्तर सांगूया असे म्हणता म्हणता ते राहून गेलेय. काही हायपररिअलिस्टिक तैलरंगचित्रे: http://imanmaleki.com/index.htm (कलाकार इमान मलेकी) काही हायपररिअलिस्टिक पेन्सिल शेडिंगः http://midtel.net/~imaginee/artgalleries.html (कलाकार लिंडा ह्युबर) काही हायपररिअलिस्टिक जलरंगचित्रे http://fineartblogger.com/steve-hanks-realistic-watercolor-paintings/ (कलाकार स्टीव हँक्स)

In reply to by एस

स्टीव हँक्स ची चित्र अप्रतीम आहेत! धन्यवाद. काही अप्रतीम पेन्सील शेडींगची चित्रं - कलाकारः Xiaonan Sun - https://www.theportraitart.com/artvideo काही हायपर रिअ‍ॅलिझम पेंटींग्स - कलाकारः Jung Hwan - http://www.artnet.com/artists/an-jung-hwan/ हे दोघेही आपापल्या क्षेत्रात ग्रेट आहेत.

इरसाल 26/08/2014 - 16:43
पर्फेक्तो !!!!

स्वप्नालीसा 26/08/2014 - 20:02
*good* *THUMBS%%_%%UP* :GOOD: :good: *GOOD* *THUMBS UP*

श्रीरंग_जोशी 26/08/2014 - 20:50
चेहर्‍यावरचे भाव, केवळ अप्रतिम.

खटपट्या 26/08/2014 - 23:00
मस्त जमलंय. वेगवेगळ्या लिंका दिल्याबद्दल स्वैप यांचे धन्यवाद

In reply to by खटपट्या

एस 26/08/2014 - 23:16
लोक माझ्या एकुलत्या एका आयडीचेपण किती डुआयडी करताहेत हे पाहून मजा वाटली. स्वैप, स्वॅप, स्वाप, स्वाप्स, स्वॉप अन् अजून कायकाय. बघा, मला किती स्कोप आहे मिपावर डुआयडींनी वावरायला! :-)) गंमत म्हणजे विचित्र काहीतरी आयडी नको म्हणून हा घेतला होता. हाहाहाहा! (ह. घ्या.) ओ वल्लीशेट, ते 'मी पयला' घेऊन टाकू का हो?

मुक्त विहारि 26/08/2014 - 23:43
जमल्यास अजून काही चित्रे असतील तर ती पण टाका....

डॉ सुहास म्हात्रे 26/08/2014 - 23:49
स्केच खूप छान आहे ! @ स्वॅप्स : सर्वच दुव्यातील चित्रे "हायपररिअलिस्टिक" या संबोधनाला पुरेपूर जागून आहेत. आधी सांगीतले नसते तर छायाचित्रे म्हणून सहज खपून गेली असती ! दुव्यांसाठी धन्यवाद !

कुसुमावती 27/08/2014 - 12:10
हुबेहुब जमलयं चित्र

संजय क्षीरसागर 27/08/2014 - 12:31
बबनश्री, लगे रहो! स्मिता पाटील देखिल चित्र पाहून हरखून गेली असती.

In reply to by बबन ताम्बे

सखी 27/08/2014 - 21:42
मलाही कालपासुन चित्र दिसत नव्हते. धन्यवाद लिंक दिल्याबद्द्ल. स्मिता पाटीलचे अतिशय बोलके चित्र काढलं आहे.

चौथा कोनाडा 28/08/2014 - 12:29
सुंदर आलेय ! डोळे तर एकदम जिवंत ! ताम्बेसाहेब, चांगलाच जोर धरलायत ! तुमची चित्रे पाहून खरोखरच मजा येतेय ! पुढील कलाक्रुतीसाठी आमच्या "लै भारी" शुभेचछा !