अवशेची कविता बिविता....
लेखनविषय:
फेक प्रोफाइल्सच्या मागे दबल्या गेल्यात असंख्य भावना....
सुखाच्या महालात दडली आहे अस्वस्थ वेदना ..
मनाच्या गाभाऱ्यात वंदिल्या मी अबोल निष्ठा ...
कुणाला कळणार हा अंतरीचा मनोकंप ...
अशा बेफाम ,काळ्या रात्रीच प्रसवतात...
शोधत फिरावे जन्माची गुपिते..असंबंध फरफट....
मायेचे असंख्य धागे ....आयुष्याच्या वस्त्रात सापडावेत ....
काही क्षण काही धाग्यांनी बांधून दूर निघून गेलीत अनेक माणसे....
कोण कुठले अनामिक आहोत आपण....
एका अद्वैताने बांधलेले...
(अमवाश्येच्या काळात माझ्या मनात अशेच इचार येतात याची नोंद घ्यावी.)
वाचने
2717
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
मुक्तक वाटतय. अजून जरा प्रयत्न करुन कवितेचा बाज आणता आला असता. :)
'अमवाश्येच्या काळात' भटकणार्या त्रस्त समंधाचे मनोगत ?! ;)
(हघ्या)
In reply to 'अमवाश्येच्या काळात' भटकणार् by डॉ सुहास म्हात्रे
समंधाचे मनोगत संमंलाच कळत असावे का? :-)
In reply to एक कुशंका by एस
अवसेच्या रात्री बाहेर पडून पहा, मग नीsssट समजावतो. ही ही ही... हा हा हा... *DIABLO* :biggrin:
In reply to अवसेच्या रात्री बाहेर पडून by डॉ सुहास म्हात्रे
येत्या आवशेला तोरण्यावरती कट्टा करू. :-))
In reply to चला by एस
इस्पीकचा एक्का हा आयडी अत्रुप्त आत्म्याने झपाटलाय का काय अशी शंका आली आधीची प्रतिक्रिया बघून! :-/
In reply to अत्रुप्त आत्म्याला पण बोलवा! by पैसा
उगाच भुताभुतांमध्ये भांडणं लावून देता आणि मग मजा बघत बसता. असेच असतात काय हो संमंध? :-P
In reply to तुम्ही येताय का ते बोला आधी by एस
अत्रुप्त आत्म्याला यिचारा. तो येस्पट हाय. भ्येट घ्यान्यासाठी यात्या आमोशेला शिंव्वगड रोडवरच्या ढोसा क्यांद्रावर भ्याटा.
In reply to अत्रुप्त आत्म्याला यिचारा. तो by धन्या
आनी त्याच्या प्रतिक्रियांवर एक अग्यावेताळ पण यायचा प्रतिक्रिया द्यायला फ्रीमधे!
@स्वॅप्स, संमंध म्हटलं का ते सगळं आलंच की वो! भुतांसारखेच झाडं शोधत फिरत अस्तात बघा मिपावर! :-/
कवितेवर अमावस्येचा प्रभाव जाणवतो आहे .
>>अमवाश्येच्या काळात माझ्या मनात अशेच इचार येतात याची नोंद घ्यावी.
हायला!! सेम पिंच!!
पहिले २ शब्द वाचून एकदम दचकले होते. नंतर हे मुक्तक समष्टीसाठी नसून व्यष्टीसाठी आहे हे लक्षात आले. (म्हणजे काय ते विचारू नका.)
अमावस्या झाल्यावर, चांगल्या डागदरला...
मनाच्या गाभाऱ्यात वंदिल्या मी अबोल निष्ठा .ह्या कडव्यावर ठेचकाळलो ना राव ...म्हणलं यमक जुळवताय की काय आता *biggrin*
In reply to निष्ठा by प्रसाद गोडबोले
प्रगो राव,तुमच्या आवडत्या खाद्यपदार्थांची यादी पाहिली आणि तुमच्या 'ठेचकाळत सरकणाऱ्या यमकाची' कल्पना आली..
कविता.
अजून जरा व्यवस्थित करता आली असती. पण बहुतेक तुम्ही घाईत लिहिली असावीत.
मुक्तक वाटतय. अजून जरा