माझ्यात राहुन जगतात बाबा..!
१७ ऑगस्ट ...! माझ्या वडिलांचा (कै. अनंतराव जोशी यांचा) जन्मदिवस. त्या निमित्ताने....
फोटोमधुनही बघतात बाबा..!
बिनधास्त जग तू, वदतात बाबा..!
नाहीत बाबा, हे मान्य नाही;
माझ्यात राहुन जगतात बाबा..!
झोळी रिकामी माझी तरीही;
प्रेमास हृदयी भरतात बाबा..!
पाठीवरी तेंव्हा हात फिरला...
तो आठवा, मग कळतात बाबा..!
तू मान किंवा मानू नको, पण..
असतेच आई, असतात बाबा..!
वाचने
2443
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
आवडली !!!
मला वाटलं साईबाबांवर कविता केली काय!
खूप छान भावना !
हृदयस्पर्शी.
कविता चांगली आहे. अजून भावपूर्ण बनवू शकाल ह्याची खात्री आहे.
बापो. छान आहे कविता.
नाहीत बाबा, हे मान्य नाही;
माझ्यात राहुन जगतात बाबा..!छान, आवडली
रचना आवडली असं कसं म्हणु ? डोळ्यात पाणी आले...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisisधन्यवाद मित्रांनो.
खुप आवडली कविता.. खरच छान..
छान रचना
आवडली !!!