माझ्यात राहुन जगतात बाबा..!
१७ ऑगस्ट ...! माझ्या वडिलांचा (कै. अनंतराव जोशी यांचा) जन्मदिवस. त्या निमित्ताने....
फोटोमधुनही बघतात बाबा..!
बिनधास्त जग तू, वदतात बाबा..!
नाहीत बाबा, हे मान्य नाही;
माझ्यात राहुन जगतात बाबा..!
झोळी रिकामी माझी तरीही;
प्रेमास हृदयी भरतात बाबा..!
पाठीवरी तेंव्हा हात फिरला...
तो आठवा, मग कळतात बाबा..!
तू मान किंवा मानू नको, पण..
असतेच आई, असतात बाबा..!
वाचन
2443
प्रतिक्रिया
11
आवडली !!!
च्यायला!
हृदयस्पर्शी !
हृदयस्पर्शी.
आवडली. अजून प्रयत्न करावा.
बापो. छान आहे कविता.
नाहीत बाबा, हे मान्य नाही;
रचना आवडली असं कसं म्हणु ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisisधन्यवाद
खुप आवडली कविता.. खरच छान..
साधी सरळ