मुळीच नाही
लेखनविषय:
काव्यरस
मुळीच नाही
शहाणेच सर्व जितके, तितका मुळीच नाही
वेडा असून तुमच्या इतका मुळीच नाही
सच्चा न मी तरीही, लुच्चा मुळीच नाही
माझे न जे तयाची, इच्छा मुळीच नाही
तत्वास जे न जपती, जपती कसे स्वतःला
स्वतःवरीच ज्यांची, निष्ठा मुळीच नाही
किती वेगळाच आहे, हा हर्ष तुझ्या डोळी
परका जरी न असला, सख्खा मुळीच नाही
त्या विठ्ठलास जातो भेटावयास जेंव्हा
माझ्या शिवाय तेथे दुसरा मुळीच नाही
पुढती कुणी कुणाच्या, मागे कुणी पडे
माझ्या समोर असली चर्चा मुळीच नाही
इच्छा मनात यावी, लावून वेड जावी
मग कोण काय म्हणतो, पर्वा मुळीच नाही
हा कोण रे समोरी, आहे अपूर्व माझ्या
या आरशात माझी, प्रतिमा मुळीच नाही
- अपूर्व ओक
वाचने
2679
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
क्या बात है वेल्लाभट! फक्त ते 'तत्वास' हे 'तत्त्वास' असे पाहिजे.
गज्जलांजलि ही तुमची, आवडली अम्हांला
पुसली मनातून अमुच्या, जाणार कधीच नाही... :-)
बादवे, मी पयला! :-P
In reply to वा! by एस
आभार. संपादन पर्याय या क्षणी दिसत नाहीये, आला की बदल करतो. बाकी धन्यवाद :)
फारच छान. :)
>>या आरशात माझी, प्रतिमा मुळीच नाही
हे आवडलं!!
मुक्त गझल म्हणू का याला ?
आवडली
इच्छा मनात यावी, लावून वेड जावी
मग कोण काय म्हणतो, पर्वा मुळीच नाही
हा कोण रे समोरी, आहे अपूर्व माझ्या
या आरशात माझी, प्रतिमा मुळीच नाही
जबराट... यकदम!
In reply to इच्छा मनात यावी, लावून वेड by अत्रुप्त आत्मा
+१
या ओळी विशेष आवडल्या.
In reply to +१ या ओळी विशेष आवडल्या. by इनिगोय
मलाही अगदी याच ओळी आवडल्या.
मस्त हि भटोबा..
झकास रे
आवडली
आवडली कविता!
कविता आवडली!
म्हणूनही छान.
मात्र, अजून सफाईदार रचना हवी असे वाटते.
वा!